Wednesday, June 4, 2025

 भारतीय कालगणनेचा प्रश्न भाग चौथा श्रीधर तिळवे नाईक 

भारतात सुरुवातीच्या कालखंडात शैव कालगणना फार काही वर्षांचे काउंटिंग ठेवत होती शैवलोक शतकांचे काउंटिंग ठेवत जगत होते असे वाटत नाही कारण मुळातच त्या काळात शतकाची किंवा सहस्त्रकाची संकल्पना अस्तित्वात होती की नाही याबद्दल शंका आहे नंतरच्या कालखंडामध्ये मात्र ही गणना अस्तित्वात आलेली असावी  


ब्राह्मणी कालखंडामध्ये मात्र कलियुगाची जी कल्पना आहे ती मात्र भारतात प्रचलित झाली मात्र तिचे लिखित पुरावे हे फार उशिराचे आहेत त्यामुळेच कलियुगाची कालगणना करायची म्हणजे नेमके काय करायचे याबद्दल खुद्द ब्राह्मण धर्मातच वादविवाद आहेत सर्वसाधारणपणे इंग्रजांच्या आगमनानंतर आपला कालखंड हा इसवी सन पूर्व 3000 च्या आसपास ठेवणे आवश्यक झाले कारण हळूहळू ग्रीक लोकांचा इतिहास हा इसवीसन पूर्व हजार दीड हजार पर्यंत भिडायला लागला आपण त्यांच्यापेक्षा प्राचीन आहोत हे सांस्कृतिक पातळीवर सिद्ध करण्यासाठी ब्राह्मणांनी हा उद्योग अवलंबला पराभूत झालो तरी आम्ही तुमच्यापेक्षा श्रेष्ठ आणि गिरे तो भी टांग उपर तसा हा प्रकार नेहमीच चाललेला असतो प्रत्यक्षात मात्र विजेत्याचे अनुकरणच केले जाते. साहजिकच युरोपियन लोकांच्या आगमनानंतर साहजिकच धर्मपुरुषाच्या मृत्यूपासून व जन्मापासून कालगणना सुरू करण्याचे उद्योग सुरू झाले याची प्रेरणा प्रामुख्याने जीजस पूर्व ईसा पूर्व आणि ईसा नंतर ही कालगणना करण्याची युरोपियन पद्धत होती आणि तिचा संबंध थेट येशू ख्रिस्ताशी त्याच्या जन्ममृत्यूशी होता साहजिकच आपल्याकडे बुद्धाच्या मृत्यूनंतर एक कालगणना सुरू झाली असा दावा पुढे आला आणि मग तो सिद्ध करण्याचेही प्रयत्न झाले त्यानंतर मग राम जन्म आणि कृष्ण जन्म अशा अंगाने मांडणी करणारे लोक आले शिवा बाबत मात्र सर्वांचीच मांडणी ही तो अनादी आणि अनंत आहे कालभैरव आहे महाकाल आहे अशीच आहे अगदी कट्टर ब्राह्मण आणि वैदिक म्हणवून होणारे लोक सुद्धा अनेकदा शिवाचे हे स्वरूप स्वीकारतात


पण त्यामुळेच शैव कालगणनेचा प्रश्न अधिक गुंतागुंतीचा होतो


प्राचीन काळात शैव धर्मात कालगणना ही चंद्राच्या आधारे होती मात्र जो एक एक्स्ट्रा दिवस होता 31 दिवसांच्या महिन्याचा तो मुळात अमावस्या आणि पौर्णिमा यांच्यात ऍडजेस्ट होत होता त्यातून मास संकल्पना आली एक अमावस्या अधिक एक पौर्णिमा म्हणजे एक मास महिना होय आठवडा ही संकल्पना भारतीय आहे की नाही याबद्दल मला प्रचंड शंका आहे भारतीयांच्यात नेहमीच अमावस्या आणि पौर्णिमा रूढ होत्या आणि प्रथमा द्वितीया तृतीया ते पौर्णिमा किंवा अमावस्या अशा तऱ्हेनेच तिथी गणना होत होती बारा वर्षाने एक तप होत होते आणि अशा 12 तपांचे मिळून एक मन्वंतर होत होते 144 वर्षांनी मानवी मन मानवी समाजाचे मन बदलते अशी समजूत त्यामागे आहे आपण तिला अंधश्रद्धाही म्हणू शकतो .


या शैव काळातील मनुष्य हा प्रामुख्याने ऋतू बघत होता आणि हे ऋतू सहा आहेत आणि प्रत्येक दोन मासांचा एक ऋतू बनतो याची त्याला कल्पना होती आणि ऋतू पुन्हा पुन्हा येतात त्यावरूनच त्याला वर्षाची संकल्पना सुचलेली आहे म्हणजेच पावसाळा हा ज्येष्ठ आषाढ या दोन महिन्यात येतो याची कल्पना त्याला होती आणि मग श्रावण आणि भाद्रपद या दोन महिन्यांमध्ये पावसाळा थोडा वेगळा होतो याची त्याला कल्पना होती साहजिकच जुन्या काळामध्ये शैव लोकांच्या मध्ये दोन काळ महत्वाचे होते पहिला सृष्टीच्या जन्माचा फुलणे पूर्ण झाले की मग चैत्र महिना होतो म्हणून तिथे वर्ष सुरू केले जात होते किंवा साधू लोकांचा सत्संग फार महत्त्वाचा असल्याने तिथूनच काळ सुरू करत हा महिना साधारणपणे ज्याला आज आपण श्रावण म्हणतो तो आहे आणि अशोक त्याचा उल्लेख करताना शीलवन असा करतो कारण त्याचा संबंध शील जागृत करणारा आणि शिलाचे वन निर्माण करणारा असाच आहे श्रावण हा सावन म्हणून सुद्धा ओळखला जातो कारण साव या शब्दाचा अर्थ चांगला असाच होतो श्रावण या शब्दाचे मूळ सुद्धा श्रवण करणारा असा आहे हा सर्वकाळ गुरु च्या सानिध्यात राहण्याचा मोक्ष मिळालेल्या लोकांच्या सानिध्यात राहण्याचा काळ आहे आज सुद्धा श्रावण पाळणे याचा खरा अर्थ हाच आहे अनेकदा श्रावण महिन्यात मास मच्छी त्यामुळे सोडली जाते हा शैव लोकांचा संस्कार आहे सूर्याकडे बघून वर्ष सुचलेले नाही आपल्याकडे ही गैरसमजुत खूप लोकांची झालेली दिसते प्रत्यक्षामध्ये सहा ऋतूंनी मिळून एक वर्ष असे हे कॅल्क्युलेशन आहे आणि ऋतुचक्र सुरू होते आणि पूर्ण होते हे या लोकांनी पूर्ण पणे बघितलेले दिसते एक ऋतू मग दोन महिन्यात विभागला जातो म्हणजेच प्रत्येक ऋतू म्हणजे चार अमावस्येत आणि चार पोर्णिमेत विभागले गेला आणि त्याला चंद्रानुसार विभागले म्हणजेच ज्याला आज आपण शैव कालगणनांना म्हणतो ती चंद्र आणि ऋतू यांच्या आधारे उभी आहे तिचा आरंभ श्रावण महिन्यापासून म्हणजे शीलवन महिन्यापासून सुरू झाला होता का हा खरा प्रश्न आहे अशोकाच्या कालगणनेचा विचार आपल्याकडे अलीकडे सुरू झालेला आहे पण अशोकाने कालगणना काही बौद्ध लोकांच्याकडून घेतलेली नाही किंबहुना आयुष्याची 75 टक्के वर्षे त्याने शैव म्हणून घालवलेले आहेत याचा अनेकांना विसर पडलेला आहे खुद्द बौद्ध धर्म ग्रंथच त्याचा उल्लेख कालाशोक म्हणजेच कालीचा भक्त असलेला अशोक किंवा चंडाशोक म्हणजेच चंडीचा भक्त असलेला अशोक असा करतात हे आपण विसरता कामा नये पण त्याचबरोबर अशोक बौद्ध नव्हताच असा सुद्धा जो प्रचार चाललाय तो चुकीचा आहे अशोकाने बौद्ध धर्म स्वीकारला आणि तो स्वीकारताना त्याने तो धर्म म्हणून स्वीकारलेला नाही तर धम्म म्हणून स्वीकारलेला आहे आणि शाक्य मुनी म्हणूनच त्याने उल्लेख केलेला आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे प्रत्येक राजाला स्वतःला कायद्याची संहिता तयार करण्याची अनुमती शैव-धर्मामध्ये आहे आणि म्हणूनच एखाद्या शैव राजाने जर का बौद्धाच्या धम्माला अनुसरून एखादी नीती संहिता स्वीकारली असेल तर त्यात आश्चर्य मानायचे काहीच कारण नाही मुळात शैव परंपरेमध्ये गौतम बुद्ध हा एक सिद्ध आहे जणू काय शैव ह्या काळामध्ये बौद्ध धर्माशी भांडत होते अशा तऱ्हेने चित्र उभे केले जाते त्यात तथ्य नाही या काळात बौद्ध धर्माचे भांडण असले तर ते जैन धर्माशी आहे साहजिकच अशोकाने जी कालगणना स्वीकारली ती शैव कालगणना आहे आणि त्याने सांगितलेले बारा महिने हे शैव महिने आहेत हे आपण लक्षात घेतले पाहिजे जे मुळातच युरेशियन लोकांनी स्वीकारले होते मुळात सहा ऋतूंची संकल्पना ही फक्त भारतातच प्रामुख्याने त्या काळात अस्तित्वात होती युरेशियन लोक ती सोबत घेऊन आलेले नव्हते हे आपण लक्षात घेतले पाहिजे 


ब्राह्मणी संकल्पनेत युग ही संकल्पना किती वर्ष ठेवावी याविषयी प्रचंड वाद आहेत 


नंतर आलेली क्षत्रिय कालगणना ही प्रामुख्याने वैश्य आणि शूद्र यांच्यातून आलेल्या राजांनी निर्माण केलेली आहे आणि नंतर या राजांना वैदिक पद्धतीने किंवा पौराणिक पद्धतीने राज्याभिषेक करत देवाचा अवतार मानत आणि त्यांना यज्ञ करायला लावत वैदिक करण्याचा उद्योग इथल्या ब्राह्मणांनी केलेला आहे आणि मग अनेकदा राज्याभिषेक झाल्यानंतर कालगणना सुरू झालेली आहे शिवाजी महाराज हे याचे उत्तम उदाहरण आहे.प्रत्यक्षात या लोकांनी स्वकर्तृत्वावरच आपली राज्ये स्थापन केली होती आणि ही राज्ये स्थापन करण्यापासून त्यांना कोणीही रोखू शकलेला नाही कारण मुळात तथाकथित ब्राह्मणी वर्णव्यवस्था कधीही या देशांमध्ये प्रभुत्व गाजवत नव्हती हे सगळे चित्र ब्राह्मणांनी सातव्या शतकात बदलले आणि त्यांनी कृत्रिम चंद्रवंश आणि सूर्यवंशी निर्माण करत या शैव लोकांना आणि बाहेरून आलेल्या आणि शैव झालेल्या लोकांना क्षत्रिय दर्जा देऊन त्यांना देव बनवले किंवा देवाचा अवतार बनवले त्याची नशा इतकी चढली गेली की हे लोक खरोखरच स्वतःला क्षत्रिय समजू लागले वास्तविक हे तेच लोक होते ज्यांच्या पैकी जवळ जवळ किमान 50 टक्के लोक युरेशियन लोकांच्यातूनच आलेले होते पण वैदिक धर्माने आणि ब्राह्मणी धर्माने त्यांना सामावून घेण्यास नकार दिला होता त्यामुळे हे सुरुवातीला शैव होते आणि मग युरेशियन लोकांनी आपला धर्म त्यांना द्यायला सुरुवात केली याची सुरुवात प्रामुख्याने शैव ,जैन आणि बौद्ध धर्माने सुरू केली म्हणजे आपण जर काय शक कनिष्क राजवटीचा विचार केला तर सुरुवातीला हे लोक शैव होते मग ते बौद्ध झाले असे दिसते सातव्या शतकानंतर या बाहेरून आलेल्या आक्रमक लोकांचे प्रमाण प्रचंड वाढत गेले गोरा रंग जो फारसा दिसत नव्हता तो आता दिसायला लागला या आक्रमक लोकांना प्रथम शैव-धर्मानेच सामावून घेतले परंतु हे लोक नंतर कृतघ्न झाले आणि त्यांनी त्यांना वर्णव्यवस्थेत उच्च स्थान देणारे ब्राह्मण धर्म आणि वैष्णव धर्म स्वीकारायला सुरुवात केली आपल्याकडे बाहेरून आलेल्या लोकांच्या बाबतीत केवळ ते ब्राह्मण धर्मी होते अशी समजूत आहे ती खरी नाही अनेक क्षत्रिय आणि वैश्य झालेल्या बाहेरून आलेल्या लोकांना सुद्धा सुरुवातीला शैव लोकांनी सामावून घेतले परंतु दुर्दैवाची गोष्ट अशी की या लोकांनी त्याबद्दलची कसलीही कृतज्ञता नोंदवलेली नाही आज सुद्धा या लोकांच्यातून येणारे विचारवंत याबाबतीत प्रामाणिक असतीलच याची कसलीही खात्री आता उरलेली नाही उलट आपण बाहेरून आलोय त्याचा माज किंवा आर्य असल्याचा माज काही लोकांना चढलाय की काय अशी आता शंका येते मुळात सुरुवातीला बाहेरून आलेले युरेशियन लोक सुद्धा तीन वर्णात विभागले गेलेले होते आणि त्यांच्यात आपापसात मारामाऱ्या होतच होत्या त्यांच्यातल्या वर्ण युद्धाबद्दल संघर्षाबद्दल आपल्याकडे सोयीस्करित्या मौन पाळले जाते अनेकदा तर ब्राह्मण आणि क्षत्रियांच्या ऐवजी वैश्यच विजयी झालेले दिसतात पण आश्चर्यकारकरीत्या वैश्य लोकांनी आपला इतिहास न लिहून ठेवल्याने युरेशियन लोकांचा इतिहास सुद्धा प्रामाणिक उरलेला नाही अर्थातच या काळामध्ये शूद्र ,अति शूद्र आदिवासी राजे (खरे तर ही संज्ञा त्यांच्यासाठी वापरणेही चूक आहे कारण ते स्वतःला शूद्र अति शूद्र वगैरे काही म्हणवून घेत नव्हते )त्यांच्या त्यांच्या क्षेत्रामध्ये राज्य करत होते आणि हे राज्य प्रामुख्याने शैव पद्धतीने सुरू होते आणि त्यांचे त्यांचे स्वतःचे कायदे हे लोक स्वतःच करत होते मनुस्मृती नावाची गोष्ट त्यांना माहीतच नव्हती 


त्यांच्या कालगणनांना ते स्वतंत्र पणाने सुरू करत होते आणि राज्यभर तीच कालगणना अस्तित्वात असायची मात्र ब्राह्मणांनी ज्यांची नोंद केलेली आहे ते सूर्यवंशी आणि चंद्रवंशी राजेच फक्त कालगणना सुरू करत होते अशी आपल्याकडे सर्वांची सोयीस्कर समजूत ब्राह्मणी इतिहासकारांनी करून दिलेली आहे यांना आपणाला आणि आपल्या कालगणनांना वैदिक वा क्षत्रिय कालगणना सुद्धा म्हणतात हे त्यांना माहीत नव्हते इतके ते क्षत्रिय भानगडी पासून वेगळे आहेत शैव धर्मी लोकांची स्वतःचा इतिहास न लिहिण्याची खोड त्यांना प्रचंड महागात पडलेली दिसते आणि म्हणूनच आता सर्वाधिक इतिहास लिहिण्याची गरज शैव लोकांना आणि शैव धर्माला आहे याला अपवाद फक्त पंडित लोक आहेत आणि पंडित लोकांनी जेव्हा जेव्हा इतिहास लिहिलेला आहे तेव्हा तेव्हा आपणाला काही ऐतिहासिक नोंदी सापडतात शर्मा आणि वर्मा हे प्रमुख पंडित उत्तर भारतात काम करत होते आणि त्या खालोखाल कायस्थ समाजातून आलेले पंडित होते महाराष्ट्रात त्यांना पंत म्हणून ओळखले जाते हे प्रामुख्याने स्वतःला गुप्त ही संज्ञा वापरत उदाहरणार्थ अभिनव गुप्त वसू गुप्त वगैरे ते पंडित असल्याने ते ब्राह्मण होते असा फार मोठा गैरसमज मुद्दाम म्हणून हल्ली पसरवला जातो लेखन कामाठी करणाऱ्या समाजाला शैव लोकांच्या मध्ये कायस्थ असेच म्हटले जात होते कारण ते इतिहासाला कायेचे रूप कायेचे स्थळ देत होते हिशेब ठेवणे ही गोष्ट त्या काळात महत्त्वाची होती आणि तो ठेवण्यासाठी आपोआपच इतिहास ठेवला जात होता शिवाय आपल्या पूर्वजांच्या नोंदणी ठेवण्याची नैसर्गिक प्रेरणा त्यामध्ये आहेच 


भारतीय इतिहास लिहिताना पंडितांनी लिहिलेल्या ग्रंथांना डावलणे सातत्याने घडले आहे दुर्दैवाने याची साधी चौकशी सुद्धा कोणी करत नाही अनेकदा पंडितांनी लिहिलेले ग्रंथ पद्धतशीरित्या भ्रष्ट केलेले आहेत याचे सर्वाधिक उत्तम उदाहरण अभिनव गुप्ताचे नाट्यशास्त्र आहे अभिनव गुप्ताने लिहिलेले हे नाट्यशास्त्र त्याने निर्माण केलेले भरत हे पात्र केंद्रस्थानी आणत भरताच्या नावाने हे नाट्यशास्त्र खपवण्याचा उद्योग करत ब्राह्मण लोकांनी ते युरेशियन करून टाकलेले आहे जर का ते भरताने लिहिले असते तर इतर ब्राह्मणांनी त्याची परंपरा चालवत अनेक नाट्यशास्त्रे घडवली असती पण हे घडलेले नाही कारण मुळात नंतर वैष्णव धर्माने या नाट्यशास्त्राचा वापर करत त्यात घाल घुसड करत सर्व नटांना शूद्र केले याचे कारण स्पष्ट आहे शंकर हा स्वतः नट आहे नटराज आहे त्याला शूद्र करायचा असेल तर एकच उपाय उरतो सर्व नटांना शूद्र करून टाकणे एकदा नट शूद्र झाले की शैव लोकांचा मुख्य कला वांग्मय प्रकारच आपोआप बंद पडतो कारण शैव महाकाव्य लिहिण्याऐवजी नाटक लिहीत आणि तीच त्यांची प्राचीन कला होती प्राचीन काळापासून समरसतेच्या नावाखाली हे उद्योग केले गेले जेणेकरून शैव नाटके बंद पडावित आणि शैव धर्माचा प्रचार बंद पडावा नंतरच्या काळामध्ये शैव नाटके का लिहिली गेली नाही कि ती नाटके पद्धतशीरपणे बंद पाडली गेली याची एकदा ऐतिहासिक चौकशी आपणाला करावी लागणार आहे प्राचीन काळातल्या सर्व शैव ग्रंथाबाबत असेच घडताना दिसते याचे कारण मुळात शैव धर्मी लोकांना आपल्या ग्रंथांच्या विषयी असलेली अनास्था होय परिणामी अनेक फक्त शैव असलेले आणि कुठलाही वर्ण आणि जात न पाळणारे आणि सांगणारे लोक ब्राह्मण धर्माच्या इतिहासात मात्र ब्राह्मण होऊन बसतात आठव्या ते दहाव्या शतकामध्ये हे वारंवार घडताना दिसते आणि मग वर्तमान काळातल्या लोकांनाही हे त्यांच्या मृत्यूनंतर ताबडतोब केले जाते मग ज्ञानेश्वर यांच्या समाधी बाबत तिथे असलेले सिद्धेश्वर लिंग जे ज्ञानेश्वरांनी स्वतः सिद्ध झाल्यानंतर स्थापन केले होते आपोआपच बाजूला जाते आणि आळंदीची समाधीची जागा त्यांच्या स्थापन केलेल्या शिवलिंगापेक्षा महत्त्वाची बनत जाते आणि ती वारकरी बनत जाईल याची काळजी घेतली जाते 


शैव लोकांचा इतिहास डावलण्याचा प्रकार हा वारंवार घडतो आणि दुर्दैव हेच आहे की शैव लोकांना याची कसलीही खंत नाही 


श्रीधर तिळवे नाईक


भारतीय इतिहासातील कालगणनेचा प्रश्न भाग पाचवा श्रीधर तिळवे नाईक 


शैव कालगणनेमध्ये अमावस्येला कधीही अमावस्या म्हटले गेलेले नाही हा नंतर डेव्हलप झालेला शब्द आहे प्रत्यक्षात शिवरात्र हाच खरा शब्द होय आणि तो आजही पंचांगात अनेकदा वापरला जातो शुक्ल हा शब्द शक्तीपासून येतो कारण ती गौरी आहे आणि दिवस गोरा असतो अगदी शुक्लकाष्ठ हा शब्द सुद्धा निगेटिव्ह अर्थाने येतो तो या अर्थानेच की शक्ती म्हणजेच संसार प्रपंच मागे लागला आहे आणि त्यातून सुटका नाही प्रश्न असा आहे शुक्ल आणि शिव यांचे रूपांतर शुक्ल आणि कृष्ण कुणी केले ?


तर हा कृष्ण हा शब्द काळा या अर्थाने म्हणजेच अमावस्या कडे चाललेला या अर्थाने आलेला आहे 


सर्वसाधारणपणे 

१चैत्र 

२वैशाख 

३ज्येष्ठ 

४आषाढ 

५श्रावण 

६भाद्रपद 

७अश्विन 

८कार्तिक 

९मार्गशीष 

१०पौष

११माघ 

१२फाल्गुन

हे बारा महिन्यांची नावे भारतामध्ये जवळजवळ सर्वच धर्मानी स्वीकारलेली आहे या महिन्यांच्या नावामध्ये फक्त एकच नाव असे आहे जे एका व्यक्तीशी संबंधित आहे आणि ती व्यक्ती आहे शिवपुत्र कार्तिकेय ! ही नवीन कालगणना त्यानेच अस्तित्वात आणली आणि ही बारा महिन्यांची नावे ही त्याच्यामुळेच अस्तित्वात आली आणि त्याची आठवण राहावी म्हणूनच एका महिन्याचे नाव कार्तिक असे देण्यात आले त्यामुळेच इतिहास आहे आपल्याला या महिन्यांची नावे असलेले लोक आठवत नाहीत फक्त श्रावण हे नावच त्यातल्या त्यात प्रचलित आहे कार्तिक व कार्तिकेय हे नाव मात्र अखंड भारतात सर्वत्र आहे श्रावण हे नाव सुद्धा नंतर महिन्याचे नाव प्रस्थापित झाल्यानंतर देण्यात आलेले आहे कारण रामायणात बारा महिने दिसतात म्हणजेच रामायणाच्या काळामध्ये बारा महिने प्रस्थापित झाले होते 


या शब्दातूनच पुढे कीर्ती आणि कर्ता आणि कर्ती असे शब्द पुढे आलेले दिसतात याचे कारण स्पष्ट आहे कार्तिक किंवा स्कंद हा क्रिया तंत्राने मोक्ष मिळवणारा पहिला मनुष्य आहे गणपती हा ज्ञानतंत्राने जातो पण स्कंद मात्र क्रिया तंत्राने जातो म्हणूनच तो नंतर देवांचा सेनापती म्हणून मान्यता पावलेला दिसतो कारण त्याला सामावून घेण्यासाठी हे करणे आवश्यक वाटत होते आपल्याकडे मूळ स्कंद पुराण हे नाहीसे झालेले आहे आणि आता जे शिल्लक आहे ते थोतांड आहे त्याच स्कंद विषयीची मूळ माहिती मिळत नाही आपल्याकडचा खंडोबा म्हणजेच स्कंद होय स्वतःचा कंद म्हणजे स्वतःचा गाभा अबाधित राखणारा तो स्कंद होय महाराष्ट्र वरचा खंडोबाचा प्रभाव खोडून काढण्यासाठी अनेक खोट्या दंतकथा नंतर रचल्या गेल्या वास्तविक संपूर्ण दख्खन भर म्हणजेच दक्षिण भर खंडोबा हाच मुख्य देव आहे याचे कारण खुद्द भगवान शंकरानीं त्याला दक्षिण दिली होती त्याने आणि परशुरामाने जो दुसरा क्रिया तंत्राने मोक्षाला उपलब्ध झालेला शिव शिष्य होता आणि ज्याचा वैष्णवा अवताराशी काडीचाही संबंध नाही मिळून संपूर्ण दक्षिण राखलेली आहे यातील किनाऱ्यावर किनाऱ्याचे रक्षण करण्याची जबाबदारी परशुरामावर होती आणि त्यानेच जंगले तोडून हा प्रदेश शेतीसाठी योग्य बनवला ग्रीकमधून आलेल्या लोकांना सामावून घेण्याची नंतरची परशुरामी परंपरा वैष्णव कशी झाली हा महाराष्ट्राच्या इतिहासातला सर्वात मोठा प्रश्न आहे मी नेहमीच म्हणतो की ज्यांनी आश्रय गेला त्या शैव लोकांच्या वरच अनेक बाहेरून आलेले लोक उलटले त्यात हे परशुराम वैष्णवावतार मानणारे लोक आहेत बाहेरून यायचे शैव लोकांशी घरोबा करायचा स्वतःचा आश्रय घ्यायचा आणि मग शैव लोकांची घरे तोडायची असेच धंदे परदेशातून आलेल्या लोकांनी केलेले आहेत का असे आता विचारायची वेळ आलेली आहे कारण आठव्या ते बाराव्या शतकात जो काही शैव धर्मी लोकांचा पाडाव होत गेला त्याला जबाबदार हेच लोक आहेत घर का भेदी लंका जलाये तसा प्रकार घडलेला आहे किंबहुना बिभीषणाचा गौरव करण्याचे कारण तेच आहे याच लोकांनी शैव पंचांगातून हळूहळू वैष्णव आणि वैदिक पंचांगे तयार करायला सुरुवात केली आणि ती प्राचीन आहेत असेही सांगायला सुरुवात केली अन्यथा सातव्या शतकापर्यंत वैदिक पंचांगांचा कसलाही पुरावा मिळत नाही प्राचीन काळापासून पंचांगे ही नेहमीच गुरव किंवा पंडित यांच्याकडे असत महाराष्ट्रातले जवळ जवळ सर्वच ब्राह्मण हे मूळचे पंडित आहेत आणि दुर्दैवाची गोष्ट अशी की हे सर्व पंडित हळूहळू कारण नसताना वर्णव्यवस्था स्वीकारून बसले आणि ह्याचे एकमेव कारण त्यांना वर्णव्यवस्थेत मिळणारे सर्वोच्च स्थान होते याच लोकांनी प्रथम शैव राजांना फिरवले आणि त्यांचे यादव करण केले अन्यथा महाराष्ट्रातले यादव घराणे हे यादव घराणे नाही हे आपण लक्षात घेतले पाहिजे इथूनच महाराष्ट्रातील पंचांगे बदलायला सुरुवात झालेली दिसतात आणि महाराष्ट्र यादव झाल्यानंतर वैष्णव झाल्यानंतर खिलजींच्याकडून पराभूत झाला ही वस्तुस्थिती आहे वारकरी पंथाची सुरुवातच अल्लाउद्दीन खिलजीच्या विजयाला सुरुवात करून देणारी ठरली होती 


महाराष्ट्रातल्या पंचांगांचा इतिहास हा या कालखंडात बदललेला आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे ग्रीकांच्या राशी सुद्धा आपण ह्याच काळामध्ये संपूर्णपणे स्वीकारल्या आठवडा ही व्यवस्था ही स्वीकारली 


याच काळामध्ये आपणाला सर्व कालगणना ही शालीवाहन कालगणना झालेली दिसते शैव असलेल्या सातवाहनांचे मूळ उखडून टाकणे आणि वैष्णव बनलेल्या यादवांचे आरंभ म्हणून स्थान ठसवणे हा या शालिवाहन शके चा उद्देश आहे आजही आपल्या पंचांगात विशेषत: कॅलेंडरात शालीवाहन शक विलसत असतो 


हा एकच शक असा आहे जो अतिशय जुना आहे तो भगवान शंकरांच्यापासून सुरू होत बुद्धमार्फत प्रवेश करत अशोकातून स्थलांतर करत आपल्यापर्यंत पोहोचताना दिसतो मात्र त्याचे प्रचंड मोठ्या प्रमाणात ब्राह्मणीकरण झालेले आहे ते आता पुन्हा एकदा शैविकरण करून शुद्ध केले पाहिजे मुख्य म्हणजे राशी हटवल्या पाहिजेत आणि २७ नक्षत्रे आणली पाहिजेत 27 नक्षत्रांचा व दोन पंधरवड्यांचा महिना प्रस्थापित केला पाहिजे आणि राशीनुसार स्वभाव सांगण्याऐवजी पुन्हा एकदा महिन्यानुसार स्वभाव सांगितला पाहिजे तिथीनुसार स्वभाव सांगितला पाहिजे काही लोकांना ही सूचना आवडणार नाही परंतु कॅलेंडर प्रस्थापित करण्यासाठी ज्योतिषी लोकांचा खूप फायदा होतो हा माझा अनुभव आहे 


थोडक्यात काय आपण शैव कालगणना सुरू करताना २२००० वर्षापासून सुरुवात करावी त्यामुळे भारताचा इतिहास नीट मांडता येऊ शकतो मुख्य म्हणजे अनेक उत्खननातून येऊ घातलेले नवे संदर्भ त्यामुळे नीट सामावून घेता येतील खुद्द युरोपमध्ये सुद्धा आता जुन्या संस्कृतींचे अवशेष नव्या उत्खननांच्या मधून सापडत आहेत त्यामुळे खुद्द त्यांचा इतिहास सुद्धा आता जीजस पासून सुरू होऊ शकत नाही तो त्यापेक्षा अधिक प्राचीन होत गेलेला आहे त्यामुळेच आता तिकडे जीजस पूर्व जीजस नंतर अशी विभागणी टाळावी असे मत प्रस्थापित झालेले आहे ख्रिश्चन धर्माच्या प्रभावामुळे आणि पुरोगामी इतिहासकार सुरुवातीच्या कालखंडात ख्रिश्चन असल्याने हे घडलेले दिसते मला वाटते आता हे बदलण्याची गरज निर्माण झालेली आहे 


श्रीधर तिळवे नाईक

भारतीय इतिहासातील कालगणनेचा प्रश्न भाग सहावा श्रीधर तिळवे नाईक 


भारतीय कालगणनेचा निश्चित कालखंड हा लोक शैव धर्माचा आद्यसम्राट महापद्मशालीनंद आणि त्याचा वारसदार धनानंद यांच्या पासून सुरू होतो त्या दोघांच्या विषयी जे लिखाण आहे ते शैवेतर लोकांनी केलेले असल्याने साहजिकच या लोकांनी नंद घराण्याचा इतिहास हा स्वतःच्या सोयीने मांडलेला आहे एक गोष्ट नक्की आहे ती म्हणजे हे लोक ज्यांना अलीकडे वैश्य म्हणतात परंतु प्रत्यक्षात पणी होते वाणी होते मुळात या काळामध्ये मगध क्षेत्रावर शैवधर्मी लोकांचा प्रभाव असल्याने साहजिकच कोणीही राजा होत होता आणि कोणीही पणी आणि वणी होत होता या धनानंदाचा घात चाणक्य नावाच्या एका ब्राह्मणाने केला इतकीच माहिती आपणाला महावंश देतो याच्या व्यतिरिक्त कसलीही चाणक्य विषयीची माहिती आपणाला भेटत नाही हा नंतर कुठे गेला त्याचे काय झाले हे आपणाला माहीत नाही अनेक लोकांनी याच्या आधारे नंतर कथा रचल्या असल्या तरी प्रत्यक्षात नेमके काय झाले हे कोणालाच माहीत नाही चंद्रगुप्त हा धनानंदाला मुरा नावाच्या स्त्रीपासून झालेला होता ती स्त्री सत्ताक टोळी राज्यात होती साहजिकच मातृसत्ताक राजवटीत चंद्रगुप्त हा आपल्या आईकडे वाढला आणि मामाकडून त्याचे संगोपन झाले शैव लोकांच्यात मातृसत्ताक राजवटीचा प्रभाव त्या काळामध्ये टिकलेला होता त्यामुळे साहजिकच आपल्या आईचे नाव त्याने वंश म्हणून पुढे वापरले त्यात आश्चर्यकारक काहीच नाही ती दासी होती असे अनेक इतिहासकारांचे म्हणणे असले तरी ठोस विधान करता येईल असे वाटत नाही त्या काळातील टोळीतून येणारी प्रत्येक स्त्री दासी असायची हा ब्राह्मण्यक इतिहासकारांचा रोमँटिसीजम आहे 


या घराण्याचा कालखंड निश्चित होतो त्याचे कारण बौद्ध वांग्मय आहे आंबेडकर यांनी २५०० वर्षे पूर्ण झाली म्हणून योग्य वेळ साधत बौद्ध धर्म स्वीकारला होता आणि त्यामुळेच आंबेडकर करांना प्रमाण मानले तर बुद्धाचा जन्म इसवी सन पूर्व ५५६ तर त्याचा मृत्यू ४७७ ते ४९१ असा मानता येतो आणि नंदवंश हा साधारणपणे ६५६ पासून सुरू करता येतो नकुलीशाचा कालखंड हा साधारणपणे इसवी सन पूर्व ९०० वर्ष आहे कपिल हा बुद्धाच्या आधीचा आहे हे निश्चित आहे आणि कपिलाच्या आधी नकुलिश होऊन गेला आहे कारण तो हिरण्याचा गुरु आहे आणि या हिरण्याच्या वंशात हिरण्य कश्यपू निर्माण झालेला आहे याला अलीकडे बळी वंश म्हटले जात असले तरी हा मूळचा हिरण्य वंश आहे जो पुराणे म्हणतात त्याप्रमाणे पाशुपत धर्माचा कट्टर पुरस्कार करत होता किंबहुना त्यामुळेच हिरण्यकशपूची नंतर हत्या झालेली आहे याच्याच वंशात नंतर एकापेक्षा एक तत्त्वज्ञानी राजे निर्माण झालेले आहेत हा लोकशैव कालखंडाचा आद्य सम्राट आहे आणि ह्या राजवंशातच कपिल यांचा जन्म झाला आणि त्यांनीच षष्ठीतंत्र लिहिले जे नंतर आर्य लोकांनी सांख्य तत्त्वज्ञान म्हणून फेमस केले आणि ज्याचा थेट प्रभाव हा महावीर आणि गौतम बुद्ध दोघांच्यावरही पडलेला आहे


नंदवंशाच्या राजवटीतील चंद्रगुप्ताने सर्वात प्रथम एकसंध साम्राज्य उभे करायला सुरुवात केली या काळामध्ये जैन स्वतंत्र धर्म नव्हता तो शैव-धर्मातील ज्ञानतंत्राचा व नाथधर्माचा भाग होता त्यातून स्वतंत्र धर्म निर्माण केला तो भगवान महावीरांनी ! अन्यथा तोपर्यंत मोक्ष प्राप्त झालेले जैन लोक हे साधारणपणे स्वतःला नाथ म्हणवूनच घेत होते हे वृषभनाथांच्या पासून पार्श्वनाथापर्यंत चाललेले होते अगदी अशोकाच्या अनेक लेखांमध्ये सुद्धा बुद्धाचा उल्लेख शाक्यमुनी आणि जीन असा आहे चंद्रगुप्त मौर्याने जैन म्हणजेच ज्ञान तंत्र स्वीकारले(उत्तर भारतात विशेषता पंजाब मध्ये आजही ज्ञानी माणसाला जैन आदमी म्हटलं जातं )आणि नंतर जेव्हा महावीरांच्या पासून स्वतःचा स्वतंत्र धर्म काढणे सुरू झाले तेव्हा साहजिकच चंद्रगुप्ताने जैन धर्म स्वीकारला होता असा प्रचार सुरू झाला प्रत्यक्षात चंद्रगुप्त हा शैव होता बिंबिसार ही शैव होता आणि अशोक ही शैव होता यातील अशोक गौतम बुद्धांना शाक्य मुनी म्हणत होता आणि मुळातच गौतम बुद्ध हा सिद्ध असल्याने तो आपल्यापेक्षा काही वेगळा आहे ही भावनाच मुळात त्या काळात शैव लोकांच्यात नव्हती अशोकाच्याच काळात एका अर्थाने लिखित संहितांचे निर्माण बौद्ध धर्माने केले आणि त्यामुळे हळूहळू जैन आणि बौद्ध असे दोन नवे धर्म निर्माण झाले अशोक हा नंतरच्या काळात अधिकाधिक कट्टर बनत गेला त्याचाही फार मोठा वाटा बौद्ध धर्माच्या निर्मितीत आहे हिंसा करणारा मनुष्य आता त्याच्या धर्माविरुद्ध असणाऱ्या लोकांची हिंसा करू लागला त्याला अहिंसेचे प्रतीक मानणारे लोक इतिहास नीट वाचतात असं वाटत नाही खुद्द बौद्ध धर्म ग्रंथ त्याने बौद्ध धर्मासाठी किती हत्या केल्या याचे उदाहरण देत असतात पण अशोकामुळेच आपल्या उत्खननात्मक पुराव्यांची ऑथेंटिक सुरुवात होते आणि त्यामुळेच भारतीय इतिहासाला एक आधार शिला प्राप्त होते हे आपण लक्षात घेतले पाहिजे सुरुवातीच्या काळामध्ये गौतम बुद्धाची मूर्ती बनत नव्हती तर स्तूप आणि बोधी वृक्ष ही परंपरा चालत होती आणि ही शैव परंपरा आहे जिथे स्तूप शिवलिंगा जागी आलेला आहे आणि वटवृक्ष ऐवजी बोधीवृक्ष आलेला आहे खुद्द बुद्धाच्या काळामध्ये फक्त यज्ञात हिंसा होत होती असे नाही आपण जर का या काळातले शैव राजे पाहिले तर ते प्रचंड हिंसक होते विशेषत: बिंबिसार आणि अजात शत्रू यांचा वंश हा पितृघातकी वंश होता अशी प्रतिमा बौद्ध धर्मग्रंथांनी निर्माण केलेली आहे आता हे खरे की खोटे हे ठरवणे अवघड आहे कारण आपल्या शत्रूला जास्तीत जास्त हिंसक दाखवणे बौद्ध धर्मीय लोकांना आणि इतिहासकारांना आवडते आपल्याकडे बौद्ध इतिहासकार म्हणजे कोणी सज्जन सद्गुनी आणि विज्ञाननिष्ठ लोक होते असा एक फार मोठा गैरसमज आहे प्रत्यक्षामध्ये आपल्या धर्मप्रचार च्या आड येणाऱ्या प्रत्येकाला अधिकाधिक हिंसक ठरवणे हा बौद्ध इतिहासाचा अजेंडा आहे अगदी अशोक सुद्धा यातून सुटलेला नाही तो बौद्ध धर्म स्वीकारल्यानंतर हिंसक होतो पण आश्चर्यकारक रित्या जेव्हा इतर धर्मांचा प्रश्न येतो तेव्हा मात्र तो हिंसक होतो हे सुद्धा कितपत खरे आहे हे तपासले पाहिजे शैव धर्माला मांसाहार मान्य होता व आजही आहे परिणामी शैव हे हिंसेमुळे मांसाहारामुळे कसे मागासलेले आहेत हेच दाखवणे बौद्ध धर्मीय जैन धर्मीय लोकांना आवश्यक वाटले आणि पुढे ब्राह्मणधर्माने हेच केले मांसाहार करणाऱ्या लोकांना अस्पृश्य करण्यात आले का आणि हे अशोकाने केले का हा भारतीय इतिहासातील एक अत्यंत वादग्रस्त प्रश्न आहे ज्याच्या विषयी अनेक लोक सोयीस्कर मौन पाळत असतात ज्यांना आज-काल पूर्वाश्रमेचे अस्पृश्य म्हंटले जाते ते योगायोगाने सारेच कसे शैव आहेत हा प्रश्न एकदा पूर्वाश्रमीच्या अस्पृश्य लोकांनी विचारायला पाहिजे ज्या लोकांच्या टाक मध्ये कधीही गौतम बुद्ध नव्हता पण शैव दैवते मात्र होती ते लोक आपल्या देव्हाऱ्यातला ढळढळीत पुरावा नाकारत स्वतःला आता पूर्वाश्रमीचे बौद्ध म्हणवून घेतात हे आश्चर्यकारक आहे  


मात्र मांसाहाराविरोधात जी मोहीम सुरू झाली त्याची सुरुवात बौद्ध आणि जैन धर्माने केलेली आहे हे लक्षात घेतले पाहिजे अहिंसेचे स्तोम शैव धर्मी लोकांच्या शत्रूंनी माजवलेले आहे असो 


पण ही जैन आणि बौद्ध धर्मग्रंथातील सगळी वर्णने जैनबौद्ध इतिहास असतात आणि त्यातून आपणाला कालखंडाचे काही पुरावे मिळत राहतात यानंतरच आपणाला नाणी मिळत असल्याने आपला इतिहास अधिक ऑथेंटिक बनवता येतो या संदर्भातला सर्वात महत्त्वाचा वंश हा कनिष्काचा आहे आणि तो नाण्यांच्या इतिहासावरून असे दिसते की सुरुवातीला शैव होता आणि मग बौद्ध झालेला आहे हा प्रवास अनेकदा घडलेला आहे म्हणजे यादव वंश सुरुवातीला शैव आहे मग तो वारकरी वैष्णव होत जातो तरीही अनेक ठिकाणी शिवलिंगाची स्थापना ही यादववंशानेच केलेली असते कारण महाभारतातला कृष्ण सुद्धा शिवभक्त असतो 


भारतात साधारणपणे इसवी सन पूर्व १५०० च्या आसपास वैदिक लोक आले आणि इसवी सन पूर्व ११०० च्या आसपास त्यांनी ब्राह्मण धर्म निर्माण करायला सुरुवात केली त्याला प्रतिकार म्हणून शैव परंपरेमधून आपणाला नकुलिश यांनी पाशुपत धर्म निर्माण केलेला दिसतो आणि हा साधारणपणे इसवी सन पूर्व ९०० च्या आसपास निर्माण झालेला आहे आणि पुढे त्यांचेच अनुकरण करत महावीरांनी आणि गौतम बुद्धांनी बंड केलेले दिसते  


प्रश्न असाय आहे की भागवत धर्म हा मग कधी निर्माण झाला आज सुद्धा भागवत धर्मामध्ये ब्राह्मणधर्म आधी होता की भागवत धर्म आधी होता हा एक मोठा वाद आहे कारण अनेक भागवतधर्मी लोक महाभारताचा कालखंड इसवी सन पूर्व ११०० असा मानतात मुळातच मला असे वाटते की मथुरेच्या आसपास वासुदेव नावाचा धर्म जन्मला असावा आणि त्यातूनच पुढे भागवत धर्म उदयाला आला असावा जरासंध हा शिवभक्त होता हे सर्वश्रुत आहे आणि अनेक मगध राजे सुरुवातीला शैवच दिसतात आणि त्यांच्या विरोधात कदाचित हा आर्य लोकांनी वासुदेव धर्म निर्माण केला असावा आर्य लोकांच्यातील सामान्य माणसांचा हा धर्म होता का हा प्रश्न एकदा विचारणे आवश्यक आहे


असो थोडक्यात काय आपणाला नंदांच्या पासून काल निश्चिती करता येते आणि त्या पुढचा कालखंड एका विशिष्ट पद्धतीने मांडता येतो मी या विषयाची सुरुवात करताना म्हटले होते की प्रत्येक जण आपापला इतिहास मांडतो आहे आणि हे अटळ आहे ज्याचा त्याचा इतिहास आणि बाकी इतिहास हे विसाव्या शतकाचे फार मोठे वैशिष्ट्य आहे असं म्हणायला हरकत नाही 


श्रीधर तिळवे नाईक

भारतीय इतिहासातील कालगणनेचा प्रश्न भाग सातवा श्रीधर तिळवे नाईक 


आपण इथे कालगणनेची आणि इतिहासाची चर्चा करत आहोत आता प्रश्न असा येतो की कालगणनेचा उपयोग नेमका कशासाठी होतो आणि आपले पूर्वज संदर्भात नेमके काय विचार करत होते 


भारतातले सर्वच अध्यात्मिक विचारवंत असे सांगतात की आपण नेहमी इतिहासापासून दंतकथा तयार करतो याचे कारण आपण त्या दंत कथेद्वारे जीवनाचा इसेन्स सांगतो अलीकडे ही मांडणी भगवान ओशो रजनीश यांनी अधिक प्रभावीपणाने केलेली आहे शैव परिभाषेत सांगायचे तर ज्ञानाचा काहीही उपयोग नसतो. ज्ञान शहाणपण देऊ शकत नाही त्यामुळेच इतिहास शहाणपण देऊ शकत नाही शहाणपणासाठी तुम्हाला मोक्ष मिळवावा लागतो किंवा किमान मोक्षाची साधना करत सविकल्प समाधी पर्यंत पोहोचावे लागते साहजिकच भारतामध्ये इतिहासापेक्षा गोष्टींच्याद्वारे शहाणपण सांगणे हेच प्रस्थापित झालेले आहे त्यामुळे अगदी बौद्ध इतिहास सुद्धा हे आरंभिक दंतकथांचे नमुने असतात जिथे जैन आणि बौद्ध सुद्धा दंतकथांच्याद्वारेच भूतकाळ सांगत बसतात महावंश आणि इतर बौद्ध धर्म ग्रंथातला इतिहास हा जितका वस्तुनिष्ठ भासतो तितका तो वस्तुनिष्ठ नाही हे स्पष्ट आहे जर बौद्ध लोकांची स्थिती असेल तर तिथे इतरांच्या विषयी काय बोलावे? शैवांचा तर स्पष्टपणे स्टान्स असा आहे की ज्ञानाचा फारसा मोक्षासाठी उपयोग नाही विशेषता शक्ती तंत्रामध्ये ज्ञानाचा अस्त झाल्याशिवाय मोक्ष मिळत नाही अशी संकल्पना आहे साहजिकच याचा एक सखोल परिणाम आपणाला 19 व्या शतकामध्ये थिऑसॉफिकल सोसायटीमध्ये दिसतो आणि पुढे तो जे कृष्णमूर्ती आणि नंतरचे युजी कृष्णमूर्ती यांच्यापर्यंत फोफावलेला दिसतो या दोघांनीही सातत्याने ज्ञान नाकारले आहे आणि जे कृष्णमूर्ती यांनी कायमच ज्ञान नाकारत शहाणपणाचा पुरस्कार केलेला आहे दोघेही कळत नकळत इथे शैव झालेले दिसतात इतिहासाचे काम शहाणपण सांगणे हे असले पाहिजे हे शैव लोकांना फार क्लिअर आहे 


प्रश्न असा आहे की मग इतिहास दंतकथेद्वारेच सांगायला हवा का तर नाही तुम्ही तो निवेदनात्मक पद्धतीनेही सांगून शेवटी शहाणपण सांगू शकता मोक्ष कालातीत आहे साहजिकच इतिहास हा कालातिततेकडे नेणारा असला पाहिजे मात्र तुम्ही इतिहास लेखन करता तेव्हा तुम्ही काललेखनच करत असता ही शैवधर्मी लोकांची मुख्य संकल्पना आहे शैव इतिहास प्रामुख्याने युरेशियन लोकांनी कसे नष्ट केले हे पाहावे लागते याबाबतीत उत्खननांच्यावर अवलंबून राहण्याशिवाय शैव इतिहासकारांच्या पुढे पर्याय नाही पुराणे आणि इषद म्हणजेच इशविषयी ईश्वराविषयी लिखाण करणारा सूत्र वा सुत समाज हा शैव समाज होता तो काही युरेशियन समाज नव्हे मुळात लाकडांच्या वर कोरीव काम करून सूत्र लिखाण करणे हा त्याचा मूळ धंदा यांच्यावरूनच पुढे सुतार ही संकल्पना विकसित होत गेली आणि लाकडावर काम करणारे आणि लाकडी काम करणारे सर्व लोक सुतार बनले धातूंचा शोध लागण्याआधी भारतामध्ये सर्व शैवलोक लाकडापासून अनेक गोष्टी तयार करत होते हे आपण लक्षात घेतले पाहिजे यात घरापासून सूत्र लिखाणापर्यंत अनेक गोष्टी येतात त्या लाकडाच्या असल्यामुळेच टिकल्या नाहीत आणि त्याचे शैव इतिहासकारांना प्रचंड नुकसान सोसावे लागले ही सूत्रे म्हणजे दुसरे तिसरे काही नसून इतिहास म्हणजे शहाणपण सांगण्याची कला याच्या आधारे केले गेलेले अविष्कार आहेत नंतर हे सर्व सूत्रलेखन तंत्र सूत्रांच्या स्वरूपात वेगवेगळ्या नावांनी येत गेले मी मागेच म्हटलेले आहे की शैव मोक्षकारांचा इतिहास थोडा इतरांच्या पेक्षा वेगळा आहे जगात सर्वत्र जो मोक्षाचा किंवा धर्माचा उपदेश देतो त्याचे नाव संहितेला असते शैव-धर्मामध्ये नेमके उलटे घडते इथे गुरूच्या ऐवजी शिष्याच्या नावाने संहिता ओळखली जाते त्यामुळेच भैरवनाथाला केला गेलेला इतिहास हा विज्ञान भैरव तंत्र या नावाने येतो आणि त्याची मांडणी शिव आणि देवी अशा स्वरूपात येते ती मूळची शिव आणि शक्ती यांची मांडणी आहे किंवा नंदीला केला गेलेला उपदेश नंदी सूत्र म्हणून पुढे येतो आणि हाच पुढे नारद सूत्र बनतो हे आपण लक्षात घेतले पाहिजे अपवाद फक्त असला तर तो शिवसूत्रांचा आहे कारण ही सर्व सूत्रे शिवाच्या आठवणीतच नंतरच्या लोकांनी जतन केलेली आहेत आणि शिवसूत्राचे सर्वात महत्त्वाचे सूत्र म्हणजे ज्ञान हा मोक्षामध्ये बाधा आहे वा मोक्ष म्हणजे ज्ञानाचा अस्त ! तुम्ही जर का जे कृष्णमूर्ती वाचाल तर त्यामध्ये या वाक्याचे प्रचंड पडसाद दिसतील आणि पुढे पुढे युजी कृष्णमूर्ती या ज्ञानाचा अंतच करायला धडपडतात 


आता ज्ञानाचीच ही जर अवस्था असेल तर मग इतिहासाचे काय ? इतिहासही ज्ञान आहे आणि ते भूतकाळ आहे आणि भूतकाळाचे ज्ञान माणसाला वर्तमान सुधारायला काडीचाही वाव देत नाही विशेषता मोक्षाच्या संदर्भामध्ये हे आपण लक्षात घेतले पाहिजे 


मात्र जिथे अर्थ येतो तिथे काय करायचे ? तर अर्थ आणि काम या दोन अक्षांच्या मध्ये इतिहास हा मुख्य आधार बनतो जगातल्या सर्व कला आणि ज्ञान प्रणाली यांचा स्वतःचा इतिहास असतो साहजिकच हा इतिहास माहिती असल्याशिवाय तुम्ही कसलेही योगदान देऊ शकत नाही तुम्ही काहीही नवीन निर्माण करू शकत नाही आणि मुळातच समाज म्हणजे विशिष्ट क्षेत्राचा एका समुदायाने आत्मसात केलेला इतिहास आणि त्याची वर्तमानात केलेली एप्लिकेशन्स ही स्थिती असते आपण जेव्हा कुंभार समाज म्हणतो सुतार समाज म्हणतो तेव्हा या समाजातील लोक त्या त्या क्षेत्रातील सर्व इतिहास सर्व होऊन गेलेली यंत्रे मंत्रे तंत्रे आत्मसात करत त्यांचे वर्तमान काळातले इनोव्हेटिव्ह काम करत असतात अनेकदा समाज हा मौखिक इतिहासाने चालत राहतो साहजिकच लिखित स्वरूपात इतिहास हा फार उशिरा अवतरलेला दिसतो मात्र ज्याप्रमाणे युरेशियन लोक आपल्या स्मृती लादतात त्याप्रमाणे कुठलीही स्मृती शैवलोक लादत नाहीत प्रत्येक समाजाचा वर्तमान हा वेगळा असतो याची जितकी स्पष्ट आणि स्वच्छ जाणीव शैव लोकांना जगात होती तेवढी इतर धर्मी लोकांना नव्हती असे स्पष्ट दिसते त्यामुळे मोक्षतंत्र बाबत सुद्धा एकच एक ग्रंथ प्रमाण मानला जात नाही आणि धर्म नावाचा अक्ष शैव वैचारिकतेत उपलब्ध नाही तो नंतर आला आणि झरतृष्टामुळे मान्यता पावला अगदी भावतंत्र सुद्धा भावतंत्र म्हणूनच येते आणि पूजा म्हणजे पूज्य होणे म्हणजे शून्य होणे हेच भावतंत्राचे मुख्य सूत्र आहे हे प्राचीन काळातल्या शैव लोकांना नीट माहिती आहे या पूजेचे रूपांतर युरेशियन लोकांनी कर्मकांडात केलेले आहे आणि आत्ताच्या अनेक पूजा म्हणजे पुरोहित लोकांचे धंदे होय मग हे पुरोहित वैष्णव धर्मी असोत किंवा शैव धर्मी असोत 


ही सूत्रे जतन करण्याची जबाबदारी पंडित लोकांच्यावर सोपवली गेली होती आणि नवव्या शतकापर्यंत त्यांनी ती उत्तम पार पाडलेली दिसते. नंतर मात्र पंडितांना युरेशियन धर्म चावला आणि मग शैव-धर्माला सुद्धा सूत्रांचे असलेले अधिष्ठान नष्ट होत गेले आणि याच पंडित लोकांनी ब्राह्मण बनून शैव धर्माचे रूपांतर ब्राह्मण धर्मात करण्याचे काम सुरू केले याच वेळेला गोरखनाथांनी त्याला ठाम विरोध केला किंबहुना गोरखनाथ म्हणजे आद्य शंकराचार्यांच्या विरोधात ठाकलेले शैव तंत्र होय परंतु हा विरोध सुद्धा हळूहळू वैदिक करण्यात आला जेव्हा पंडित ब्राह्मण लोकांचे उद्योग नको तितके वाढत गेले तेव्हा त्याला बसवेश्वर यांनी ठाम नकार देत पुन्हा एकदा नवशैव धर्माची स्थापना केली आणि शैवधर्म पुन्हा एकदा रिस्टोर केला


लोकशैव धर्माची सुरुवात ही नकुलीश यांच्यापासून झाली आणि त्याची अखेर ही नाथ संप्रदाय नवनाथ संप्रदायामध्ये झाली ज्याची सुरुवात मच्छिंद्रनाथांनी केली परंतु ज्याची मांडणी स्पष्ट आणि स्वच्छपणाने गोरखनाथांनी केली हे सर्वच पंडित घराण्यातून आलेले लोक होते हे आपण लक्षात घेतले पाहिजे त्यांना ब्राह्मण होणे मान्य नव्हते दुर्देवाची गोष्ट अशी की त्यांचेही ब्राह्मणीकरण करण्यात आले आणि साहजिकच अनेक नाथांच्या संदर्भात नव्या नव्या दंतकथा ब्राम्हण लोकांनी रचल्या त्यांचे जन्म अलौकिक करण्यात आले हे सर्व पंडित अनेक वेगवेगळ्या समाजातून आलेले होते म्हणजे गोरख हे सरळ सरळ पशुपालक वर्गातून समाजातून आलेले पंडीत होते तर मच्छिंद्रनाथ हे मासे पकडणाऱ्या कोळी समाजातून आलेले पंडित होते गोरखनाथांचा समाज गोरक्ष समाज होता जो पशुपालनात आणि दुग्ध पालनामध्ये निपुण होता या समाजातून फार प्राचीन काळापासून वेगवेगळे पंडित तयार झालेले आहेत गोरखनाथ हे त्यामधले अत्यंत अव्वल दर्जाचे पंडित होय त्यांनीच आत्ताच्या हिंदी भाषेची स्थापना केली संस्कृत येत असून सुद्धा स्वतःच्या देशी भाषेत लिखाण करण्याची परंपरा गोरखनाथ यांनी पाळली दक्षिणेत ती आधीपासूनच पाळली जात होती या नाथ संप्रदायाचे एक झाड निवृत्तीनाथ ज्ञानेनाथ सोपाननाथ मुक्ताबाई यांच्या रूपाने महाराष्ट्रात उगवलेले आहे यांचा प्रभाव नष्ट करण्यासाठी मग ज्ञानेश्वरांच्या नंतर जन्माला आलेल्या ज्ञानदेवांना केंद्रस्थानी आणून आणि हे दोन्ही एकच आहेत असे सांगत वारकरी संप्रदाय निर्माण करण्यात आला पुन्हा एकदा वर्ण व्यवस्था आली आणि मग मध्ययुगीन भारताची सुरुवात झाली ज्ञाननाथांनी लिहिलेली गीता ही कुठे गुप्त झाली हा आजही प्रश्न आहे मात्र ज्ञानेश्वरी मध्ये मात्र तिचे थोडे थोडे लिखाण सापडते ज्ञानदेवाची ज्ञानदेवी आणि ज्ञानानाथांची शैव गीता यांच्यातून ज्ञानेश्वरी हा ग्रंथ जन्मलेला आहे एका अर्थाने तो हिंदू ग्रंथ आहे आणि कदाचित आद्य हिंदू ग्रंथ आहे हा ग्रंथ एकनाथ यांनी निर्माण केला असे आता म्हणता येते कारण एकनाथ हे स्वतः सुरुवातीला शैव होते नंतर वैष्णव होत गेले साहजिकच त्यांनी त्यांच्याकडे असलेल्या दोन्ही परंपरांचा समन्वय केला याची प्रेरणा अभिनव गुप्ताच्या लेखनामध्ये आहे हे तर उघडच आहे तिथेही ब्राह्मण लोकांनी असाच समन्वय घडवून आणलेला दिसतो आणि मूळची शैव गीता गायब झालेली दिसते हा समन्वयच नंतर मुसलमानांच्या पुढे महागात पडलेला आहे कारण वैष्णव गीता वर्णव्यवस्थेचा पुरस्कार करते 


प्रश्न असा आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या सर्व घडामोडी घडत असताना शैवधर्म लोकांचा इतिहास का लिहिला गेला नाही जसा काश्मिरी शैव आगमाचा इतिहास काश्मिरी पंडितांनी लिहिला गेला आणि आज थोडा का होईना पण तो आपल्याला उपलब्ध होतो तसे महाराष्ट्रात का घडले नाही अगदी वामन पंडित आणि मोरोपंत यासारखे कवी पंडित असून सुद्धा का वैष्णव लिखाण करतात? अनेकदा तर वैयक्तिक पातळीवर सर्व उपासना आणि लिखाण शैव मात्र लिखाण प्रामुख्याने वैष्णव हे का घडलेले आहे ? की यांचे शैव लेखन नष्ट केले गेलेले आहे ? फक्त शिवाजी महाराजांनी संभाजी महाराज यांच्याच कालखंडामध्ये का वस्तुनिष्ठ लिखाण करण्याचा प्रयत्न झालेला आहे ? नानासाहेब पेशव्यांच्या नंतर जे पंडितांचे साहित्य येते ते सर्वच्या सर्व इतके वैदिक का ? याचे कारण उघड आहे नानासाहेब पेशवे यांच्यापासून शिवशाही शिवशाही राहिली नाही आणि पेशवाई बनली मुख्य म्हणजे पेशवाईला जो प्रतिकार झाला तो होळकरांचा झाला पण होळकरांचा तत्कालीन मराठी साहित्यामध्ये positive उल्लेखच दिसत नाही याचे कारण काय ? की ते शैव होते म्हणून नकोसे झाले ? 


जोपर्यंत महाराष्ट्र शैव पद्धतीने महाराष्ट्राला बघत नाही महाराष्ट्राचा इतिहास पुन्हा मांडत नाही भारताचा इतिहास पुन्हा मांडत नाही तोपर्यंत शैव कालगणना ही प्रस्थापित होणे अशक्य आहे आणि आता ती प्रस्थापित करण्याची वेळ आलेली आहे कारण ब्राह्मण धर्म अत्यंत वेगाने स्वतःचा विस्तार करत सुटलेला आहे तो तसाच राहिला तर नानासाहेब सत्तेवर आलेले आहेतच ते पेशवे होणारच नाहीत याची कसलीही खात्री आता या क्षणी नाही नानासाहेब पेशव्यांच्या काळापासून महाराष्ट्रातला शैव मराठा समाज थंड पडला तो अजूनही जागा झालेला नाही अपवाद काहीसा शाहू महाराज आणि सयाजीराव गायकवाड यांचा आहे आपण पेशवाईला वाट करून देतोय याचीही या लोकांना शंका आलेली नाही शिवाजी महाराजांचे नाव घ्यायचे मात्र सेवा पेशव्यांची करायची अशा प्रकारचा दुतोंडी कारभार या काळात चाललेला दिसतो अपवाद फक्त शिंदे आणि होळकर आहेत 


आता तशीच स्थिती निर्माण झाली आहे का हा खरा प्रश्न आहे 


ज्ञानाचा अस्त हा मोक्षाबाबत उत्तम परंतु काम व अर्थाबाबत अत्यंत वाईट हे प्रथम आपण स्वीकारले पाहिजे इतिहास ही युजलेस गोष्ट आहे हे प्रथम डोक्यातून काढले पाहिजे इतिहास एक तर डोक्यावर बसवुन घ्यायचा किंवा मग युजलेस म्हणून फेकून द्यायचा असा काहीतरी उद्योग महाराष्ट्रात होतो तो परवडणारा नाही अगदी कुठल्याही गोष्टीला युजलेस म्हणणारे लोक सुद्धा वापरत असलेली भाषा त्यांना इतिहासापासून प्राप्त झालेली असते ती काही त्यांनी निर्माण केलेली नसते हे लक्षात घेतले पाहिजे किंबहुना भाषा म्हणजे प्रत्यक्षात भाषेचा इतिहासच असतो जो वर्तमान काळामध्ये ॲक्टिव्ह राहत वर्तमान निर्माण करायला लागतो तो जितका भूतकाळापासून मुक्त राहतो तितका तो वर्तमान बाबत अधिक जागृत राहतो 


इतिहासाचे मुख्य काम शहाणपण देणे आणि सतत समाजाला जागृत ठेवणे आणि भूतकाळापासून प्राप्त झालेली यंत्र तंत्र मंत्र प्राप्त करणे आणि त्यातून नवीन वर्तमान निर्माण करत नवीन यंत्रे तंत्रे मंत्र निर्माण करणे होय नवीन यंत्र तंत्र मंत्र निर्माण करताना जर का प्राचीन यंत्र तंत्र मंत्र नष्ट करावे लागत असेल तर ते नष्ट करावे परंपरेच्या नावाखाली त्याचे जतन करणे घातक असते येथे मंत्र हा शब्द वैज्ञानिक नियम म्हणून वापरलेला आहे याची कृपया नोंद घ्यावी जर इतिहास भविष्यकाळ घडवण्यासाठी वापरला जात नसेल आणि तो जर का समाजाला भूतकाळात बुडवण्यासाठी वापरला जात असेल तर तो इतिहास अडगळ असतो ज्यांना अडगळ समृद्ध वाटते ते अडाणी असतात महाराष्ट्रात आणि भारतातही अनेकदा इतिहास हा परंपरेच्या नादाला लागून आडगळच निर्माण करत राहतो आणि भारतीय समाजाच्या पायातली बेडी बनतो हा इतिहास आहे ज्ञानाचा अस्त झाला पाहिजे याचा इतिहासातला अर्थ वेळप्रसंगी जर एखादे ज्ञान आऊटडेटेड झालेले असेल तर त्या ज्ञानाचा अस्त झाला पाहिजे असा होतो किंबहुना मोक्ष विषयी प्राप्त झालेले जुने ज्ञान जोपर्यंत अस्त पावत नाही तोपर्यंत मोक्ष मिळू शकत नाही हेच भगवान शंकरांना सांगायचे होते म्हणून त्यांनी ते सूत्र दिले होते शैव लोकांना याचा विसर पडला आहे म्हणून आता त्याची आठवण करून देणे भाग आहे इतिहासाचे मुख्य कार्य लहानपण देणे नसून शहाणपण देणे असेल तर काही गोष्टी तातडीने करणे आवश्यक आहे 


श्रीधर तिळवे नाईक


इतिहास , परंपरा, एस्टॅब्लिशमेंट, संरचना , जालना आणि भूतकाळ श्रीधर तिळवे नाईक 


इतिहासकारापुढचे जे काही प्रश्न असतात त्यामध्ये नेहमीच एक प्रश्न इतिहास नेमका कोणत्या विरोधात लिहिला जातो हा असतो आणि त्याचबरोबर तो कशाचे समर्थन करतो हा असतो अनेकदा इतिहासकार याबाबतीत गाफील असतात आणि आपण काय करतो हे त्यांना कळत नाही उदाहरणार्थ रोमँटिसीजम विचार प्रणाली म्हणून इतिहास लेखनामध्ये जेव्हा दाखल झाला तेव्हा त्याने जे चरित्र लेखन केले त्यालाच इतिहास लेखन मानले जाऊ लागले किंवा जे इतिहास लेखन केले ते प्रत्यक्षात ग्लोरीफाय करणारे हिरोचे चरित्र लेखन होते कारलाईल हा इतिहासकार अशा तऱ्हेने लिखाण करतो किंवा हेगेल ची सर्व मांडणी ही तुझ्या राजकीय संस्थेसाठी काम करत होता तिचे समर्थन करताना दिसते त्या धरतीवर सावरकरांनी कळत नकळत पुढे ब्रिटिश लोकांचे ब्रिटिश शासनाचे समर्थन केले का असा प्रश्न आपणाला विचारता येतो अगदी गांधी आणि नेहरू सुद्धा ब्रिटिश शासनाच्या प्रचंड विरोधात होते असे म्हणता येत नाही कळत नकळत ब्रिटिश आहे विचारप्रणालीनिष्ठ असल्याने त्यांच्या विचारप्रणालिष्ट असण्याचा या सर्वच इतिहासकारांच्या वर दबाव पडलेला दिसतो साहजिकच नेते सुद्धा या दबावाखाली आहेत 


अर्थात् आपण हे सर्व काही रोमँटिसीझमच्या प्रभावाखाली करतो आहे याची जाणीव या लोकांना कितपत होती याबद्दल आता शंका आहे उदाहरणार्थ बुद्धाचे चरित्र कसे उभे केले गेले हे पाहण्याजोगे आहे किंवा अवताराची संकल्पना नेमकी या काळामध्ये इतकी का महत्त्वाची झाली आणि ती चरित्रात्मक असल्यासारखी का सादर केली गेली असाही प्रश्न निर्माण होऊ शकतो विष्णूचे एक काल्पनिक का होईना चारित्र्य आणि चरित्र त्याच्या अवतारा मधून सादर होते हे आपण लक्षात घेतले पाहिजे किंबहुना विसाव्या शतकातले रामायण आणि महाभारत हे प्रामुख्याने या अवतारांचे चारित्र्य आहे चरित्र आहे सावरकरांच्या इतिहास लेखनावर या हिरो केंद्री रोमँटिसीझमचा प्रचंड प्रभाव आहे हे लक्षात घ्यायला हवे म्हणूनच इतिहासाची पाने फक्त पाने असत नाही तर ती सोनेरी पाने असतात असाच प्रभाव मार्क्सवादी इतिहास लिखाणावर सुद्धा (हा रोमॅण्टिक प्रभाव )आहे मात्र मार्क्सवादी लोकांना आपण रोमँटिक आहोत ते पटत नसते एवढाच काय तो फरक आहे 


पुरोगामी. इतिहासकार इतिहास लिहिताना एकतर परंपरेचे समर्थन करतो किंवा परंपरांना विरोध करतो विशेषतः पुरोगामी कालखंडामध्ये विज्ञाननिष्ठता आली आणि या विज्ञाननिष्ठतेने परंपरांना आव्हान देणे सुरू केले कारण परंपरा ही नेहमीच धर्मयुगाशी संबंधित असते आणि युरोपमध्ये इतिहास प्रथम धर्मयुगाशी लढला अगदी कार्ल मार्क्सलासुद्धा अर्थशास्त्राची चर्चा करताना धर्माविषयी लिहावेसे वाटले याचे कारण त्याचे पुरोगामीत्व सिद्ध करण्यासाठी हे आवश्यक होत गेले भारतात त्यामुळेच हिंदू परंपरांचा प्रचंड द्वेष वाढत गेला त्या समजून घेण्याऐवजी अनेकदा तर विरोधासाठी विरोधी झाला याची कळत नकळत एक रिएक्शन म्हणून हिंदुत्ववाद निर्माण झालेला दिसतो पंडित जवाहरलाल नेहरू हिंदूंच्याकडे बघताना कळत नकळत त्यांच्या परंपरांना सातत्याने इतिहास मांडणीमध्ये विरोध करताना दिसतात आणि पुरोगामी वादाला पूरक असणारे सम्राट अशोकांच्यासारखे लोक गौतम बुद्धांच्या सारखे लोक त्यांच्या आंतरराष्ट्रीय प्रभावाखाली येऊन मोठे करत जातात गूढवादालाही त्यांचा ठाम विरोध दिसतो तरीही ते महात्मा गांधी यांचे शिष्य असतात या उलट सावरकर अधिक विज्ञान निष्ठा असून सुद्धा चक्क हिंदू परंपरांचे समर्थन करतात हिंदू एकत्र येण्यासाठी परंपरा हा एकच घटक त्यांना पोषक वाटतो मात्र त्यांचा भर परंपरे इतकाच इतिहासावर राहतो आणि एका समान इतिहास आणि बांधला गेलेला समुदाय म्हणजे राष्ट्र अशा निष्कर्षापाशी ते पोहोचत जातात.


जेव्हा पुरोगामी विचारप्रणाली राज्यसंस्थेने स्वीकारायला सुरुवात केली आणि त्यांनी विज्ञाननिष्ठ इतिहासाला प्रोत्साहन द्यायला सुरुवात केली तेव्हा साहजिकच इतिहास लेखन एक कळत नकळत तत्कालीन पुरोगामी राज्यकर्त्यांच्या राजदरबारी लिहिले गेलेले आणि त्यांच्या व्यवस्थेचे समर्थन करणारे असे इतिहास लेखन बनत गेले यामध्ये इंग्लंडच्या व जर्मनीच्या राजदरबारी असणारे अनेक इतिहासकार येतात पुढे मार्क्सवादी असलेल्या स्टालिन च्या राजवटीतही राज्यकर्त्यांनी त्यांना सोयीस्कर असलेले मार्क्सवादी इतिहास लिहून घेतले आज सुद्धा भारतामध्ये क्षत्रियत्वाचा ज्यांना अहंकार आहे असे क्षत्रिय इतिहासकार सरळ सरळ आपल्या राजे लोकांचा जितका प्रचार करता येईल तितका प्रचार करत असतात आणि जर कोणी त्यांचे वस्तुनिष्ठ असे इतिहास लेखन केले तर तुटून पडत असतात एका अर्थाने विचार प्रणालींच्या मधून निर्माण झालेल्या एस्टॅब्लिशमेंटच्या समर्थनासाठी चाललेली ही इतिहासाची धडपड असते आव विज्ञाननिष्ठतेचा पण ताव मात्र क्षत्रिय मनाचा किंवा राजेशाहीकरणाचा असा हा सगळा प्रकार चाललेला असतो त्यातूनच मग कादंबऱ्यांना इतिहास मानणारे काही लोक जन्मतात आपल्याकडे या अंगाने इतिहास म्हणजेच कादंबऱ्या लिहिणारे लोक खूप आहेत आणि त्यामध्ये रणजीत देसाई, शिवाजी सावंत ते विश्वास पाटील यांच्यासारखे अनेक लोक क्षत्रिय असण्याचे अत्यंत व्यवस्थितपणे समर्थन करत असतात उदाहरणार्थ तुम्ही जर काय मृत्युंजय ही कादंबरी पाहिली तर कर्णाचे क्षत्रियत्व सतत पानापानावर येत असते आणि जणू काय त्याला जे काही प्राप्त झालेले आहे ते तो जन्माने क्षत्रिय असल्यामुळे प्राप्त झालेले आहे असे छुपे समर्थन चाललेले असते त्या काळामध्ये राजकारणात डावलला गेलेला जो मराठा वर्ग होता जो क्षत्रिय म्हणवून घेत होता पण ज्याला कधीही सत्तेत सहभाग मिळत नव्हता त्यांचे प्रतिनिधित्व मृत्युंजय मधला कर्ण करत होता आणि आजही करत असतो आणि म्हणूनच आजही मराठा समाजामधील या कादंबरीची लोकप्रियता वाढतेच आहे ज्याला सत्ता प्राप्त होते तो श्रीकृष्ण किंवा अर्जुन आणि ज्याला ती मिळत नाही तो कर्ण अशी मराठा समाजाची विभागणी झालेली दिसते कादंबरी सारखा पुरोगामी फॉर्म हा कसा क्षत्रियत्वाच्या समर्थनासाठी जगभर वापरला गेला हे पाहण्या जोगे आहे आपल्या समाजाला या क्षत्रियत्वाच्या बाहेर काढण्यासाठी नेमाडे यांनी वर्तमानातील शैक्षणिक व्यवस्थेकडे फोकस सरकवत न्हेला आणि हे त्या काळामध्ये खूप क्रांतिकारक होते. पौराणिक कालखंडामध्ये भेलकांडणाऱ्या लोकांना थेट वर्तमान काळात या असे आवाहन कळत नकळत त्यामुळे केले गेले आणि त्याचा एक पॉझिटिव्ह परिणाम आपणाला मराठी कादंबरीवर झालेला दिसतो अर्थात यामागे सुद्धा आपणाला इतिहासाची पार्श्वभूमी दिसते कारण 1950 नंतर इतिहास लेखनाच्या सर्व परंपरा या हळूहळू वास्तववादी होत गेल्या आणि एहिक जीवनातले तपशील महत्त्वाचे होत गेले साहजिकच 1960 नंतरच्या बऱ्याचश्या मराठी कादंबऱ्या हळूहळू का होईना पण वास्तववादी बनत गेल्या आणि हे सर्व वास्तववादी इतिहास लेखनाचे झालेले साईड इफेक्ट आहेत 


मात्र मराठी कादंबऱ्यांचा मूळ कल हा कायमच रोमँटिक राहिला त्यामुळेच मृत्युंजय मधली प्रस्थापित वर्णव्यवस्था ही कुठेही वैज्ञानिक तत्वांच्या आधारे धुडकवली जात नाही किंबहुना अनेकदा कर्ण केवळ मान्यतेसाठी तळमळत आहे की काय अशी शंका यायला लागते आता ही तत्कालीन क्षत्रिय समाजाची अवस्था होती का मृत्युंजय मधला कर्ण हा प्रत्येकामध्ये असा साचलेला होता का ज्याला शिवाजी सावंत यांनी आवाज दिला असा प्रश्न आपण निर्माण करू शकतो .


हिंदुत्व या संकल्पनेची मांडणी करताना कळत नकळत परंपरेचा आग्रह धरला जातो कारण वर्तमान हा गुलामगिरीचा असतो आणि तो घाणा ओढायला लावत असतो एका बाजूला वैचारिक मांडणीमध्ये परंपरे कडे जाणारे सावरकर प्रत्यक्ष माझी जन्मठेप मध्ये वर्तमानामध्ये असतात आणि या दोन्ही गोष्टी ते एकाच वेळी करत असतात 


यातूनच इतिहासकाराच्या एस्टॅब्लिशमेंट कडे पाहण्याच्या दृष्टिकोनाची चर्चा करावी लागते ब्रिटिश एस्टॅब्लिशमेंट पेक्षा मुस्लिम एस्टॅब्लिशमेंट ही सावरकरांना जास्त धोकादायक का वाटली असा प्रश्न विचारायला पाहिजे या उलट गांधी नेहरू मात्र ब्रिटिश एस्टॅब्लिशमेंट विरोधात लढले पाहिजे याविषयी जास्त जागृत होते या काळात लोकांना तातडीने मिळणारा जो अनुभव होता तो ब्रिटिश एस्टॅब्लिशमेंटचा होता साहजिकच मुस्लिम एस्टॅब्लिशमेंट ही एका अर्थाने अस्तित्वात नव्हती आणि या काल्पनिक एस्टॅब्लिशमेंटशी सावरकर लढत होते आणि म्हणूनच त्यांना जनतेचा पाठिंबा कधीही मिळालेला दिसत नाही अपवाद फक्त सनातनी कर्मठ लोक जे प्रत्यक्षात ब्रिटिशांची चाकरी करत आपल्या धर्माचे रक्षण करत होते सावरकरांना स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मुस्लिम हिंदूंना गिळतील का असा प्रश्न पडला होता तर गांधी नेहरू मुस्लिमांचे जाऊ द्या आधी जे ब्रिटिश बोडक्यावर बसलेले आहेत त्यांना आपण हाकलून काढले पाहिजे या मताशी ठाम होते मुळातच या काळामध्ये इस्लाम फार धोकादायक कोणालाच वाटत नव्हता आया तुला खोमणे याची राजवट आली आणि मग जेव्हा हळूहळू इस्लामिक राजवटी सर्वत्र पसरू शकतात हे लक्षात यायला लागले तेव्हा मग इस्लामच्या विरोधामध्ये पाठिंबा वाढत चालला आणि त्याचाच फायदा पुढे हिंदुत्ववादाला झालेला आहे पाकिस्तान आणि बांगलादेश आणि अफगाणिस्तान मध्ये जे झाले ते भारतात मुस्लिम घडवून आणतील का असा एक फार खोल प्रश्न कायमच आता सर्व जनतेला सतावतो आहे आणि या प्रश्नाची दखल घेण्याऐवजी मुस्लिम एस्टॅब्लिशमेंट कशी भारतामध्ये अस्तित्वात नाही हे नेहरू गांधींचे प्रमेय सामान्य जनतेला पटवण्यात पुरोगामी लोक व्यस्त आहेत जनता जे एकेकाळी या गृहीतकाच्या प्रमेयाच्या मागे होती ती आता उभी नाही हे ह्या लोकांच्या लक्षातच येत नाही साहजिकच यांना हिंदुत्ववादी लेखकांनी लिहिलेल्या इतिहास हा काल्पनिक वाटतो दंतकथा वाटतो प्रत्यक्षामध्ये यामध्ये जी भीती आहे ती हिंदुत्ववादी लोक सादरच करत नाहीत ते काहीतरी तिकडचे तिकडचे बोलत बसतात आणि त्यांचा मोह हेतू व ब्राह्मणी राजवटांनी हा आहे का असा प्रश्न निर्माण होतो म्हणजेच मुस्लिमांच्या विषयीचे मुस्लिमांच्या इस्लामिक राजवटी जगभरात येण्याचे जे भय पसरलेले आहे त्याचा फायदा या देशांमध्ये ब्राह्मणी राजवट आणण्यासाठी ब्राह्मण करणार आहेत का असा हा प्रश्न आहे परंतु तो थेट पुरोगामी लोक ऍड्रेस करत नाहीत याचे कारण इतिहासामध्ये एस्टॅब्लिशमेंट म्हणजे नेमके काय याच्या विषयीच्या स्पष्ट आणि स्वच्छ कल्पना भारतीय इतिहासकार यांच्याकडे नाहीत जागतिक पातळीवर इस्लामिक एस्टॅब्लिशमेंट हीच आता प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये व्याप्ती वाढवलेली एस्टॅब्लिशमेंट आहे तुम्हाला ही गोष्ट आवडो अगर नको न आवडो पण हे सत्य आहे पण भारतात त्याचा पडणारा प्रभाव हा थांबवता येण्याजोगा आहे पण दुर्दैवाने हिंदुत्ववाद्यांच्याकडे हे कसे थांबवावे हा प्रभाव कसा नेसूनाबत करावा याविषयीचे कसलेही प्लॅनिंग नाही इतिहासाचे काडीचेही आकलन नाही नुसते इमोशन लोभाळे काढले म्हणजे इतिहास लेखन सार्थक होत नाही सिद्ध होत नाही 


सावरकरांच्या इतिहास लेखनामध्ये मुस्लिमांशी असलेल्या शत्रुत्वाचा कळत नकळत प्रभाव ब्रिटिशांशी असलेल्या शत्रुत्वासंदर्भात पडतो कारण मुस्लिमांशी झालेल्या सर्व शिवशाहीच्या लढाया या हिंसेने आणि मनगटाच्या बळावर जिंकल्या गेल्या होत्या साहजिकच ब्रिटिश सुद्धा मुस्लिमांच्या पेक्षा काही वेगळे नाहीत असा सावरकरांचा ठाम समज आहे किंवा आकलन आहे शत्रू हा फक्त शत्रू असतो आणि त्याला फक्त मनगटाचीच भाषा कळते अशी मांडणी जेव्हा सावरकर करतात तेव्हा त्यांच्यावर असलेला इतिहास प्रभाव स्पष्टपणे आपणाला प्रतीत होत असतो शत्रूकडे मित्र म्हणून पाहणारे गांधी नेहरू आणि शत्रूकडे शत्रू म्हणून पाहणारे सावरकर ही त्यामुळेच दोन टोके वाटायला लागतात त्यामुळेच नेहरूंनी डिस्कवरी ऑफ इंडिया या ग्रंथात मांडलेला इतिहास आणि सावरकरांनी सहा सोनेरी पाने किंवा हिंदुत्व या ग्रंथात मांडलेला इतिहास यांच्यामध्ये फरक पडत जातो नेहरू सॉफ्ट आहेत तर सावरकर कडक असे स्पष्ट दिसते प्रत्यक्षामध्ये चीन आणि पाकिस्तान यांच्याशी लढताना सावरकरच यासंदर्भात बरोबर होते हे आता स्पष्ट झालेले आहे नेहरूंच्या सगळ्या सॉफ्टनेसने संपूर्ण परराष्ट्रीय धोरण चुकीच्या दिशेने न्हेले हे अधिकाधिक स्पष्ट होत चाललेले दिसते मात्र ब्रिटिशांच्या संदर्भामध्ये सावरकर नेमके कसे बघत होते जर काय त्यांना ते मुस्लिमांच्यासारखे वाटत होते तर मग ते तलवार घेऊन क्रांतिकारक होऊन हातात बॉम्ब घेऊन ब्रिटिश साम्राज्याच्या विरोधात लढण्यासाठी का उतरले नाही की कृती करताना प्रत्यक्षामध्ये महात्मा गांधी कळत नकळतपणे त्यांच्या मनात काम करत राहिले ? भगतसिंग यांच्यासारखे त्यांनी आपले प्राण का पणाला लावले नाही हा प्रश्न सहजासहजी डावलता येईल असे मला वाटत नाही त्यांना कदाचित तात्पुरती माघार घेऊन पुढे काही खेळी खेळायची ही असेल हे नाकारता येणार नाही पण तरीही त्यांचे स्वस्थ बसणे कळत नकळत ब्रिटिशांच्या बाबतीत महात्मा गांधींचा दृष्टिकोन ब्रिटिश सभ्य आहेत हा जो होता त्याला पुष्ट करणारा आहे प्रश्न असा आहे की मुस्लिम इतिहासाचा अभ्यास करता करता कळत नकळत महात्मा गांधींना विरोध असे समीकरण तयार होत गेले का ? सावरकरांची महात्मा गांधीनी मुस्लिमांशी शत्रू म्हणून वागले पाहिजे अशी कळत नकळत अपेक्षा होती का ? की महात्मा गांधी हे मुस्लिमांच्या बाबतीत भाबडे आहेत असे मुस्लिमांचा इतिहास वाचून त्यांचे मत झाले होते ? तर दोन्ही गोष्टी ऍक्टिव्ह आहेत 


पुरोगामी इतिहासकारांच्या समोर ब्रिटिश हे एक एस्टॅब्लिशमेंट म्हणून या काळात स्थिर झालेले होते साहजिकच या एस्टॅब्लिशमेंटचे आकलन कसे करून घ्यायचे की परंपरेचा झगा पुन्हा ओढून घ्यायचा हा एक फार मोठा तात्विक प्रश्न होता आणि तो तत्कालीन राजकीय नेत्यांना पद्धतशीरपणे सोडवता आला असे वाटत नाही विशेषतः हिंदू नेत्यांना जीना काय करतायेत हे शेवटपर्यंत कळलेले दिसत नाही माझे स्वतःचे मत असे की सावरकरांना मुस्लिम कळाले परंतु ब्रिटिश कळाले नाहीत किंवा ब्रिटिश कळले तरी ते त्यांनी ते आकलन अंगाला लावून घेतले नाही पुढे पुढे तर सावरकरांचे मुख्य शत्रु मुस्लिम आहेत असेच वाटायला लागते त्यामुळेच गांधीजींच्या लढायां त्यांना भोळसटपणा वाटत होता म्हणूनच पाठिंबा देण्याची संधी मिळताच त्यांनी सुभाष चंद्र बोस यांना पाठिंबा दिलेला दिसतो कारण त्यांना बोस जे करतायेत ते जास्त अचूक वाटत होते 


थोडक्यात काय आपण जर का हा काळ बघितला तर तो परंपरेच्या बरोबर जातो किंवा परंपरेच्या विरोधात जातो एस्टॅब्लिशमेंटच्या बरोबर जातो किंवा एस्टॅब्लिशमेंटच्या विरोधात जातो खरा प्रश्न निर्माण झाला तो प्रतिसृष्टीच्या कालखंडात कारण आता इतिहास हा व्यवस्थेच्या बाजूने किंवा व्यवस्थेच्या विरोधात लिहिला जात नव्हता तर प्रत्यक्षात मॅनेजमेंटच्या संरचने विरोधात किंवा समर्थनात लिहिला जाऊ लागला म्हणजेच इतिहासच असा लिहायचा ज्याचा फायदा भारतीय उद्योगपतींना होईल अशा प्रकारचे उजवे इतिहास भारतामध्ये किती निर्माण झाले हा एक संशोधनाचा विषय आहे महाराष्ट्रामध्ये सहकार चळवळींचे जे इतिहास लिहिले गेलेले आहेत ते अनेकदा सहकार सम्राटांचे समर्थन करतात आणि अपवादात्मक वेळेला या चळवळीतली भोके दाखवतात यालाच मी मॅनेजमेंट म्हणून लिहिला गेलेला इतिहास म्हणतो अगदी चळवळीचा इतिहास लिहिताना सुद्धा मॅनेजमेंट वादी दृष्टिकोन प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये इतिहासकारांच्या भोकाळलेला दिसतो नेहरूंच्या भारतामध्ये या काळामध्ये कुठलेही सरकार मॅनेजमेंट मध्ये पडत नव्हते अपवाद फक्त गांधीजी होते आणि त्यांचा मृत्यू झाला होता या काळातला प्रत्येक जण एक तर नेहरू वा काँग्रेसच्या डेमोक्रॅटिक सोशालिजमच्या व्यवस्थेमध्ये होता किंवा विरोधात होता मॅनेजमेंटच्या अंगाने या काळामध्ये फार ऐतिहासिक चर्चा झाल्या असे दिसत नाही १९८० नंतर मात्र हळूहळू भारतामध्ये सुद्धा संरचना उदयाला यायला लागल्या आणि साहजिकच या सरचना इतिहास लिहून घेणार का असा प्रश्न निर्माण झाला या कालखंडामध्ये वास्तविक सुरचना आणि विरचना अशा दोन इतिहासाच्या इतिहास शैली निर्माण झाल्या पण भारतामध्ये अशा प्रकारचे इतिहास किती लिहिले गेले हा एक फार मोठा प्रश्न आहे आयडियालॉजी ऐवजी एक सरचना म्हणून इतिहास उभा करणे भारतीय इतिहासकारांना कितपत साधले हा एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे ज्या पद्धतीचा इतिहास फुको याने लिहिला त्या पद्धतीचा इतिहास भारतात कोणी लिहिला का ? किंवा इतिहासाच्या किती विरचना आपण सादर केल्या ? किंवा आपण भारताची काही आरकीओलॉजी केली का ?


चौथ्या नवतेत रचना,सुरचना जाऊन विरचना जाऊन जालना, सुजालना आणि विजालना आलेल्या आहेत इतिहासाला एक नेटवर्क म्हणून सादर करणे हे आता अत्यंत आवश्यक आहे पण ते फार काही लोकांना जमते आहे असे दिसत नाही 


कुठल्याही कालखंडाप्रमाणे याही कालखंडामध्ये परंपरा, व्यवस्था आणि रचनात सु रचना आणि विरचना सुजालना आणि वि जालना यांचा प्रभाव आहेच पण त्याचबरोबर नेटवर्क प्रोसेसिंगचा सुद्धा प्रभाव उमटलेला आहे आणि प्रस्थापित जालना त्यांना सोयीस्कर भूतकाळ निर्माण व्हावा म्हणून काम सुद्धा करत आहेत आपल्या नेटवर्क मध्ये जास्तीत जास्त लोकांना ओढून घेण्याचा सर्वोत्तम प्रयत्न करणे हे जालनाचे मुख्य वैशिष्ट्य असते ते फक्त हिंदुत्ववाद्यांनीच प्राप्त केल्याने त्यांना दैदीप्यमान यश मिळालेले दिसते काँग्रेसला या बदलत्या प्रवाहाची जाणीवच न झाल्याने ते स्वतःची जालना आणि स्वतःचे नेटवर्क निर्माण करण्यामध्ये पूर्णपणे फेल गेलेले दिसतात व्यवस्थेत अडकून पडल्याने तिचा व्यवस्थित गेम झालेला दिसतो अशा या कालखंडामध्ये इतिहास लिखाण करणे म्हणजे काय परंपरेच्या विरोधात कुठे टाकायचे आणि परंपरेच्या कुठल्या बाजू आत्ताच्या समकालाला खूप योग्य वाटतात ते पाहायचे आत्ताच्या व्यवस्थेचे गुणदोष काय आणि रचनांचे गुणदोष काय हे कसे तपासायचे वगैरे वगैरे अनेक प्रश्न जालनेच्या संदर्भामध्ये निर्माण होत असतात जालन म्हणजेच नेटवर्किंग हे आता वर्तमानाचे प्रमुख वैशिष्ट्य बनत जात असताना हे नेटवर्किंग नेमके कसे कोण वापरत असते याचाही धांडोळा घेणे आवश्यक आहे डी नेटवर्किंगची आवश्यकता त्यातूनच निर्माण होते डी नेटिंग ची प्रोसेस सुद्धा त्यामुळेच महत्त्वाची होत जाते आत्ताच्या नेटवर्किंग सिस्टीमला कुठला इतिहास पुरवायचा आणि का पुरवायचा याचे जर भान नसेल तर आजच्या काळामध्ये इतिहासकार होणे व्यर्थ ठरुन जाते त्यामुळेच केवळ ज्ञान असून चालत नाही तर आता माहितीच्या साठ्या इतकेच ज्ञानाइतकेच मोक्षाचे शहाणपण जास्त गरजेचे बनत जाते दुर्दैवाने याबाबत फारशी जागृती नाही आणि आजच्या इतिहास लेखनाचे हे सर्वात मोठे दुर्दैव आहे 


श्रीधर तिळवे नाईक

Sunday, June 1, 2025

 भारतीय इतिहासातील कालगणनेचा प्रश्न भाग ३ श्रीधर तिळवे नाईक 


भारतातील भक्ती संप्रदाय हा फार प्राचीन भावतंत्राचा भाग आहे आणि तो प्रामुख्याने शैव तंत्राचा भाग आहे जैन आणि बौद्ध हे दोन्ही धम्म ज्ञानतंत्रातले आहेत साहजिकच तिथे मूर्ती पूजेची शक्यताच निर्माण झालेली नव्हती असे असताना सुद्धा भारतीय इतिहासामध्ये अनेकदा काही अति शहाणे इतिहासकार बुद्ध आणि महावीर यांच्यापासून शिवाची आणि विष्णूची मूर्ती निर्माण झाली असे भासवत असतात वास्तविक शैव-धर्मामध्ये भक्ती किंवा भावतंत्राचे जे तंत्र आहे त्यात शिवलिंगाची पूजा केली जात होती. पर्शियन आणि ग्रीक लोकांच्या आक्रमणानंतर मात्र आपल्याकडे ही मंदिरातील मूर्ती पूजा सुरू झाली त्यापूर्वी शैवधर्मी लोकांच्यात फक्त देव्हाऱ्यातच मूर्ती ठेवली जात होती 


आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे शिवाची मूर्ती पूजा ही वेगळी गोष्ट आहे आणि शिवाची लिंग पूजा ही वेगळी गोष्ट आहे पण या गोष्टीतला फरक जाणीवपूर्वक समजून न घेता भावतंत्र किंवा भक्ती संप्रदाय हा जैन आणि बौद्ध धर्मातून निर्माण झालेला आहे अशा प्रकारची मांडणी काही लोक करत असतात त्यामुळे ही भारतीय कालगणना अधिक गुंतागुंतीची बनते वास्तविक यासंदर्भातले सत्य इतकेच आहे की युरेशियन लोकांनी शैवधर्म संस्कृतीकडून लोकांच्याकडून भक्ती स्वीकारली भाव स्वीकारला भाव तंत्र स्वीकारले आणि मूर्ती पूजा ही स्वीकारली मूळ बौद्ध धम्मामध्ये मूर्ती पूजा नाही हे आपण लक्षात घेतले पाहिजे खुद्द जिवंत असताना सुद्धा गौतम बुद्धांनी कधीही आपली पूजा अलाव केली नाही किंबहुना स्वतःलाच प्रमाण मानाने हा त्यांचा उद्देश आहे उपदेशही आहे मग बौद्ध धर्मामध्ये मूर्तिपूजा कशी आली ?


बौद्ध धम्मातील आद्य असलेल्या गौतम बुद्धाच्या मूळ उपदेशातून निर्माण झालेल्या ज्ञानतंत्राचा जसा जसा पराभव होत गेला त्याचा प्रभाव कमी होत गेला तसा तसा भावसंप्रदाय स्वीकारून गौतम बुद्धाची आणि महावीराची पूजा प्रस्थापित केली गेली जेणेकरून जैन आणि बौद्ध धम्मातले लोक धम्म सोडून जाऊ नयेत आजही आपण हे पाहू शकतो की इस्लामची लोकसंख्या प्रचंड वाढते आहे याचे कारण बहुतांशी लोक अजूनही भावतंत्रामध्येच अडकलेले असतात मुख्य म्हणजे तिथे मोक्षाच्या ऐवजी अनेकदा नवस बोलणे मन्नत मागणे अशा प्रकारच्या श्रद्धांजन्य गोष्टी करता येतात ज्या इतर तंत्रांच्या मध्ये अशक्य आहे ज्ञानतंत्रामध्ये नवस बोलणे बसत नसल्याने पुढे पुढे बुद्धाला नवस बोलणे शक्य व्हावे म्हणून बुद्धाच्या मूर्ती निर्माण करण्यात आल्या धर्म टिकवण्यासाठी हे आवश्यक आहे हे तत्कालीन बौद्ध धर्म गुरूंना वाटले आजही हे योग्य होते की नाही हे ठरवणे अवघड आहे त्यातूनच मग बौद्ध धर्मामध्ये सुद्धा स्वर्ग आणि नरकाच्या कल्पना निर्माण झालेल्या दिसतात 


सगुण ईश्वर हा प्रत्येक माणसाला हवासा का वाटतो हा एक फार मोठा प्रश्न आहे प्रत्येक माणसाला मोठा बिग ब्रदर किंवा बिग फादर आवश्यक वाटतो आणि त्यातूनच भावतंत्र हे प्रभावी बनत जाते मूळ भाव तंत्रामध्ये फक्त शिवलिंगाचीच पूजा अपेक्षित होती आणि आजही ज्यांना मोक्ष हवा आहे त्यांना फक्त शिवलिंग किंवा शक्ती लिंग यांचीच पूजा करण्याची अनुमती आहे पुढे या दोन्ही लिंगांचा समन्वय करून ईश्वरलिंग निर्माण करण्यात आले आणि आज भारतातल्या बहुतांशी शैव मंदिरामध्ये ईश्वर लिंगच आहे म्हणूनच या लिंगांची नावे ओंकारेश्वर त्रंबकेश्वर अशी असतात बाकीच्या सर्व पूजा यानंतर पंडित , गुरव आणि नंतर ब्राह्मणांनी आणलेल्या आहेत आणि त्या सर्व शैव पुरोहितांनी म्हणजेच गुरव किंवा सर्व पंडित शैवाचार्य यांनी स्वीकारलेल्या आहेत भारतात गणपतीची पूजा तर अत्यंत पद्धतशीरपणे आणली गेली आणि बाप से बेटा सवाई अशा तऱ्हेने फेर रचना करण्याचा प्रयत्न करण्यात आला जेणेकरून शंकर ही देवता बाजूला व्हावी आणि गणपती हा देव अधिकाधिक बळकट व्हावा आता तर अवस्था अशी आहे की गणपती ही देवता ब्राह्मणांचीच देवता होऊन गेली आहे आणि यामध्ये पेशवाईचा वाटा प्रचंड होता कारण त्यांचे ते कुलदैवत होते आत्ताचा गणपती हा शैव कमी आणि हिंदु जास्त आहे त्याच्या निर्मिती कथेपासून सर्व काही बदलण्यात आलेले आहे आणि बरेचसे काल्पनिक आहे ही वस्तुस्थिती आहे पण ही काल्पनिकता हीच ब्राह्मण धर्माची सर्वात मोठी ताकद असते दंतकथा निर्माण करून इतिहास नष्ट करणे हा ब्राह्मणांचा सनातन धंदा आहे 


भारतातील सर्वात प्राचीन कालगणना ही शैव कालगणना आहे आणि तिचे स्वरूप नेमके आजही स्पष्ट होत नाही भारताला मिळालेले पहिले नाव हे इंदू आहे आणि चिनी लोक याच अंगाने भारताचे नाव घेताना दिसतात दुसरे नाव अर्थातच मेरू पर्वत म्हणजेच सह्याद्री या अंगाने येते आणि त्यातूनच मेरूहाचे मेलूहा झालेले दिसते मेरू पर्वतापाशी राहणाऱ्या सर्व लोकांना उद्देशून म्हणजे सह्याद्रीच्या आसपास राहणाऱ्या सर्व लोकांना उद्देशून हे नाव आहे जे प्रामुख्याने दक्षिण भारतासाठी वापरले जात होते समुद्रमंथन करताना हिमालय पर्वताची कधीही रवी झालेली नाही कारण हिमालय समुद्रापासून प्रचंड दूर आहे पण मेरू पर्वत मात्र अनेकदा समुद्र ढवळताना दिसतो याचे कारण तो दक्षिण भारतात आहे आणि दक्षिण भारतीय लोक खरोखरच या काळामध्ये समुद्र ढवळून काढत होते आणि आफ्रिकेला पोहोचत होते आणि कदाचित अमेरिका या खंडा पाशी ही पोहोचत होते इंदू या शब्दाचा अर्थच चंद्र असा होतो आणि चंद्राप्रमाणे कालगणना करणारे ते इंदू अशी ही मूळ व्याख्या आहे या इंदूचाच अपभ्रंश होऊन पुढे हिंदू हा शब्द उदयाला आलेला आहे भारताचा इतिहास लिहिताना कायम उत्तर भारताच्या अंगाने लिखाण करणे ही उत्तर भारतीय लोकांची खोडी आहे ती आपण स्वीकारण्याची काही कारण नाही विशेषतः मराठी लोकांनी तरी भारतीय इतिहास कायम महाराष्ट्र आणि दक्षिण भारत यांच्या संदर्भात पाहिला पाहिजे उत्तर भारतीय धर्म ज्यामध्ये वैष्णव जैन बौद्ध असे धर्म येतात ते जास्तीत जास्त दक्षिण भारतात मोठे करून दाखवणे ही उत्तर भारतीय लोकांची आणि इतिहासकारांची गरज आहे कारण त्यामुळे ते हल्ली दक्षिण भारतात आणि महाराष्ट्रात करत असलेल्या स्थलांतराला आधार मिळतो त्यामुळेच ते इतिहासाच्या नावाखाली त्यांचे हितसंबंध सांभाळण्यासाठी अनेक दंतकथा लिहित असतात त्या आपण स्वीकारण्याची गरज नाही 


आठव्या शतकानंतर उत्तर भारतीय इतिहासाचा प्रभाव फारसा पडलेला दिसत नाही आणि म्हणूनच मग दक्षिणेतून शंकराचार्य उदयाला येताना दिसतात याचे कारण कळत नकळत उत्तर भारतामध्ये एक प्रकारचा अनागोंदी कारभार झालेला दिसतो त्या उलट 800 ते 1200 या कालखंडात ब्राह्मण धर्माला मदत करणारे जे काही घडले ते दक्षिण भारतात घडले असे दाखवले जाते आणि या काळामध्ये उत्तर भारतात नवनाथांचा विशेषता गोरखनाथांचा जो प्रभाव वाढत गेला शैव प्रभाव वाढत गेला त्याविषयी अवाक्षर सुद्धा काढले जात नाही हिंदी भाषेची सुरुवात गोरखनाथांनी केली हे सुद्धा डावलले जाते  


या काळात दक्षिण भारतात विशेषता केरळमध्ये वैष्णव धर्म वाढीला लागला आणि वैष्णव धर्म वाढीला लागला म्हणूनच वर्णव्यवस्था वाढीला लागली आणि वर्णव्यवस्था वाढीला लागली म्हणून तिथे हळूहळू वर्ण व्यवस्थेला शह देणारा धर्म म्हणून आचार्य शंकर यांच्या अवस्था दर्शनाचा आणि ख्रिश्चन धर्माचा उदय झाला आणि आज केरळमध्ये 30 टक्के लोक ख्रिश्चन झालेले आहेत याला कारण इथला वैष्णव प्रभाव आणि त्या धर्माने आणलेली अत्यंत कडक वर्णव्यवस्था होय ब्राह्मण धर्माने दक्षिण भारतात बळकावलेला हा पहिला भूप्रदेश आहे आणि तो त्यांनी व्यवस्थित तामिळनाडूमध्ये फूट पाडून तामिळनाडू मधून केरळ नावाचा स्वतंत्र प्रांत निर्माण करून मल्याळम नावाची स्वतंत्र भाषा निर्माण करून प्रभाव निर्माण करत बळकावलेला आहे आज दक्षिण भारतामध्ये सर्वाधिक महत्त्वाची वैष्णव मंदिरे ही केरळामध्ये आहेत हा योगायोग नाही तिथली मूळची सर्व मातृसत्ताक पद्धत कशी पद्धतशीरपणे ब्राह्मण धर्माने ताब्यात घेतली हा एक करूण इतिहास आहे वर्ण व्यवस्थेचे सर्वाधिक घृणास्पद रूप आपणाला उत्तर भारतात दिसण्याएवजी केरळमध्ये दिसते याहून दक्षिण भारताला लाज वाटणारी कुठली गोष्ट असू शकते ? साहजिकच या वर्णव्यवस्थेच्या विरोधात इथे कम्युनिस्ट पक्ष सुद्धा आपोआप वाढीला लागला कारण इथल्या बहुजन लोकांना कम्युनिजम स्वीकारण्याशिवाय पर्याय नव्हता आज अवस्था अशी आहे की केरळ मधून असा एक सिद्धांत उदयाला येतो आहे की भक्ती संप्रदाय भारतामध्ये ख्रिश्चन लोकांनी सुरू केला हे असे का घडते याच्या मुळात सुद्धा जाण्याची गरज हिंदुत्ववादी लोकांना वाटत नाही कारण त्यांना इथे पुन्हा एकदा कशी वर्णव्यवस्था आणता येईल हेच पाहायचे आहे ख्रिश्चन लोकांच्या प्रभावाचा सखोल मागोवा घेण्याऐवजी हिंदुत्ववादी कार्ड घेऊन प्रश्नाला बगल देणे चाललेले आहे जर का खरोखर हिंदुत्ववादी लोकांना केरळमध्ये काही करायचे असेल तर सर्वात प्रथम त्यांनी केरळमध्ये वर्णव्यवस्थेवर प्रचंड अटॅक केला पाहिजे पण असे काही न करता सनातन धर्माचा घोष करत हिंदुत्ववादी धार्मिक कार्ड खेळत असतात त्यामागे पुन्हा एकदा ब्राह्मणी सत्ता आणायची अशी इच्छा आहे की काय अशी आता शंका यायला लागलेली आहे या सगळ्याची जर का बीजे आपण शोधायला गेलो तर ती आठव्या शतकापासून 12 व्या शतकापर्यंत पसरलेल्या केरळच्या इतिहासात आहेत आणि याच कालखंडामध्ये आद्य शंकराचार्य नावाची व्यक्ती होऊन गेली किंवा निर्माण केली गेली हा योगायोग नाही आचार्य शंकर होऊन गेले याबद्दल माझ्या मनात शंका नाही परंतु त्यांनी सांगितलेला पंचायतन उपदेश हा शैव होता हा उपदेश आणि आद्य शंकराचार्यांच्या सहाय्याने सांगण्यात येणारा ब्राह्मणधर्मी उपदेश याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे किंबहुना केरळ मधील सर्व शैव व्यवस्था ताब्यात घेण्याचे जे काही प्रयत्न झाले त्यातला हा आद्य प्रयत्न होय तो यशस्वी झाला आणि केरळची वाट लागत गेली तिथली वर्णव्यवस्था अधिकाधिक बळकट होत गेली 


या कालखंडाबाबत नेहमीच इतिहासकार एक प्रश्न विचारत असतात तो म्हणजे या कालखंडामध्ये नेमके पुरातत्वीय पुराव्याचे काय होते ? आपण या कालखंडाकडे जर पाहिले तर हा कालखंड भावतंत्राच्या प्रचंड प्रभावाचा आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे त्यामुळे इथले पुरातत्वीय पुरावे हे प्रामुख्याने मंदिरांच्यावर कोरले गेलेले शिलालेख किंवा इतर लेख आहेत त्यामुळे जमिनीत पुरावे शोधण्याऐवजी जमिनीवर उभा करण्यात आलेल्या मंदिरामध्ये पुरावे शोधणे योग्य होय या कालखंडाचा अभ्यास करण्यासाठी मंदिर शास्त्र हे अधिक उपयुक्त आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे आणि त्याचबरोबर मंदिरामध्ये लिहिले गेलेले धार्मिक वाङ्मय व धार्मिक शिलालेख दान शिलालेख राजकीय शिलालेख आपण नीट तपासले पाहिजेत कारण त्यामध्येच या कालखंडाचा खरा इतिहास लपलेला आहे 12 व्या शतकानंतर मात्र मुस्लिम इतिहासकारांनी अनेक गोष्टी तपशीलवार लिहिणे सुरू केले आणि त्याचा प्रभाव पडून भारतात सुद्धा अशा प्रकारचे वृत्तांत लेखन सर्व राजदरबारी सुरू झाले असे दिसते या लेखनामध्ये दंतकथांचा प्रचंड प्रभाव आहे किंबहुना भारतातल्या अनेक दंतकथा ह्या मुळात या कालखंडात निर्माण झालेल्या आहेत राज दरबारी असलेले इतिहासकार आपल्या राजाची अनेकदा देवासारखी स्तुती करत असतात त्याचा प्रचंड प्रभाव इस्लामिक इतिहासकारांच्या वर आहे आणि भारतीय दरबारी इतिहासकारांच्यावरही होता आणि आहे आणि त्यांनीच या कालखंडाचा इतिहास राज्यव्यवस्थेत आणि राजाच्या स्तुतीत बुडवत बुडवत धुसर केलेला दिसतो या कालखंडामध्ये पुरातत्व शास्त्र आपणाला जास्त मदत करत नाही त्याऐवजी लेखनशास्त्र ज्याला आज काल ग्रॅमॅटोलॉजी असे म्हटले जाते आणि मंदिर शास्त्र असे म्हटले जाते तेच जास्त उपयुक्त ठरण्याची शक्यता आहे आपल्याकडचे काही इतिहासकार आजकाल 800 ते 1200 या कालखंडामध्ये पुरातत्वीय पुरावे नाहीत म्हणून खूपच शोक करत असतात म्हणून हे सांगावे लागते 


महाकाव्ये आणि पुराणे बलवान होण्याचा हा कालखंड आहे याचे कारण मंदिरांची सातत्याने होत गेलेली निर्मिती ! शैव मंदिर हे फक्त कधीच भक्तांसाठी नव्हते तर त्यामध्ये अनेक सिद्ध आणि साधना करणारे साधक व दरम्यानचे साधू हे सुद्धा मुक्काम ठोकत असत हे आपण लक्षात घेतले पाहिजे अगदी जैन मंदिरे सुद्धा शैव मंदिरांनाच फॉलो करत होती जैनांच्यात सुद्धा सिद्ध साधू आणि साधक ही व्यवस्था आपणाला दिसते आणि त्यांच्या मूलमंत्रामध्ये हे स्पष्टपणे सिद्ध झालेले आहे या सर्व मंदिरांच्या मध्ये तपस्या करणाऱ्या लोकांना सुद्धा प्रचंड जागा होती विशेषता जी मंदिरे डोंगरामध्ये वसत तिथे तर अनेक साधू तपस्या करताना आजही दिसतात शैव मंदिरांच्या मध्ये शरीर ,ज्ञान,भाव , क्रिया आणि शक्ती अशी पंचतंत्रे कार्यान्वित असत आणि ती तशीच असली पाहिजे अनेक मंदिरांना याचा हल्ली विसर पडलेला आहे निदान पक्षी शैव मंदिरांच्या मध्ये तरी ही सर्वच्या सर्व पंचतंत्रे आपण इंट्रोड्यूस केली पाहिजेत अन्यथा पुन्हा एकदा फक्त भक्तीचा सुळसुळाट सुरू राहील आणि ते भारताच्या विकासाला परवडणारे नाही भारतातली सर्वात प्राचीन मंदिरे ही सुद्धा शैव मंदिरे आहेत आणि पुढे त्यांना शह देण्यासाठी म्हणूनच वैष्णव मंदिरे उभी करण्यात आली किंवा मग शैव मंदिरे राजवटींच्या साहाय्याने ताब्यात घेऊन त्याच्यात वैष्णव देवतांची प्रतिष्ठापना करण्यात आली. अगदी अलीकडे सुद्धा कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरामध्ये पद्धतशीरपणे महालक्ष्मीची स्थापना करण्यात आलेली आहे किंबहुना अंबाबाईच्या जागी कशी महालक्ष्मी येते हे पाहिले की वैष्णव धर्मीय लोक 800 ते 1200 या कालखंडात आपले राजकारण कसे खेळत असतात ते स्पष्टपणे कळू शकते या कालखंडातले बहुतांश शिलालेख आणि अनेक सोकार्ड पौराणिक लेखन हे काल्पनिक असल्याचा संशय सर्वच इतिहासकारांनी व्यक्त केलेला आहे आणि त्यामध्ये तथ्य आहे अनेक काल्पनिक पुराणे अत्यंत जाणीवपूर्वक देवळांशी जोडली जाऊन किंवा स्थलस्थळ पुराणे निर्माण करून त्या देवळांचा इतिहास पूर्णपणे बळकावण्याचा प्रकार आपल्याकडे घडलेला दिसतो अलीकडे तर बाळूमामासारखा शैव बहुदा लिंगायत संत वैष्णव करण्यात आलेला दिसतो हे सर्व ब्राह्मण धर्मीय लोक कसे पद्धतशीरपणे खेळी खेळत असतात त्याचे नमुने आहेत तरीसुद्धा बहुजन समाजाला काही xxx येते असे दिसत नाही 800 ते 1200 या कालखंडामध्ये हेच घडलेले आहे यामध्ये आपले विठ्ठल मंदिर सुद्धा येते जे मूळचे शैव होते पण नंतर वैष्णव करण्यात आले आणि तिथले मूळचे महादेव कोळी पुजारी हटवून त्या जागी वेगळे पुजारी आणले गेले जे विठ्ठलाला वैष्णव अवतार मानतात. जेव्हा दहाव्या शतकानंतर विष्णू सारख्या वैदिक देवतेला बहुजन समाजाकडून मान्यता मिळतच नाही हे लक्षात आले तेव्हा मग अत्यंत पद्धतशीरपणे राम आणि कृष्ण यांचे महत्त्व ब्राह्मण लोकांनी वाढवणे सुरू केले ते आजही वाढवणे सुरू आहे या कालखंडामध्ये सुद्धा जी कालगणना पद्धत अस्तित्वात आली ती अशीच स्थानिक राज्यकर्त्यांच्या कडून निर्माण झालेली दिसते 


भारतातल्या सर्वात प्राचीन कालगणना या ऋषीमुनींची निगडित करणे ही ब्राह्मणांची गरज होती साहजिकच सप्तर्षीची कल्पना अत्यंत पद्धतशीरपणे वाढवण्यात येऊन सप्तर्षी कालगणना आणण्यात आली त्यासाठी अनेकदा शैव-धर्मामध्ये सुद्धा ढवळाढवळ केलेली दिसते म्हणजे शंकराला सर्वात प्रथम मोक्ष मिळाला हे मान्य करायचे मात्र त्याचे सर्वात पहिले सात शिष्य कोण तर हे सात ऋषी होते अशी मांडणी करायची प्रत्यक्षामध्ये हे सात ऋषी नव्हते तर ते सात शिष्य होते आणि त्यांची नावे वेगळी आहेत अपवाद फक्त अगस्ती असेल या सात शिष्यांना बळकावून त्यांना सप्तर्षी अशी संज्ञा देण्यात आलेली आहे आणि त्यांच्या नावाने मग कालगणना सुरू झालेली दिसते इथे मूळ आद्यशैव कालगणना बळकावण्याचा प्रयत्न झालेला आहे 


पुढे मग जेव्हा समाजात अनागोंदी कारभार वाढत गेला तेव्हा त्याचे समर्थन करण्यासाठी महाभारताच्या कालखंडामध्ये म्हणजेच सर्वसाधारणपणे इसवी सन पूर्व 1000 या कालखंडामध्ये चार युगांची संकल्पना विकसित करण्यात आली आणि त्यातूनच आज-काल कलियुग कालखंड सुरू झालेला दिसतो 


पुढे मात्र क्षत्रियांनी कालगणना ताब्यात घेतलेली दिसते त्यातूनच मग वेगवेगळ्या राजांच्या कालगणना , वेगवेगळ्या राज्यांच्या कालगणना सुरू झालेल्या आहेत भारत हा एकसंध राष्ट्र नव्हता त्यामुळे साहजिकच वेगवेगळ्या राज्यांच्या राजांनी आपल्या नावे कालगणना सुरू केल्या याचे आश्चर्य नाही म्हणजेच सर्वसाधारणपणे भारतामध्ये आपणाला असे दिसते की एक आद्यशैव कालगणना आहे त्यानंतर ब्राह्मणधर्मी ब्राह्मणांनी निर्माण केलेल्या दोन ब्राह्मणी कालगणना आहेत आणि मग क्षत्रिय लोकांनी आपल्या नावे निर्माण केलेल्या क्षत्रिय कालगणना आहेत महाराष्ट्रात प्रामुख्याने सातवाहन लोकांनी सुरू केलेली शक कालगणना शके दिसते तिच्याबद्दलचा वादविवाद अजूनही संपलेला नाही ह्या इतक्या सगळ्या चाळीसच्या आसपास असलेल्या कालगणना घेऊन आपण नेमके काय करू शकतो ? त्यामुळेच एक तर आपण इसवी सन पूर्व 20000 पासून कालगणना सुरू करावी हे उत्तम त्यामध्ये भारतातल्या सर्व प्राचीन पुरातत्वीय उत्खननांना न्याय देता येतो आणि शैव लोकांना स्वतःची कालगणना पुन्हा एकदा पुनर्जीवित करण्याची संधी मिळते सर्वसाधारणपणे वीस हजार वर्षांपूर्वी भगवान शंकर (आदिवासी साहित्य प्रमाण मानल्यास आपणाला शंभू असे नाव द्यावे लागेल शिव हे तत्व आहे शंभू हा होऊन गेलेला पुरुष आहे) यांचा मृत्यू किंवा जन्म इथून ही कालगणना सुरु होते म्हणजे आपणाला इसवी सन 2000 असे न म्हणता इसवी सन 22000 असे म्हणावे लागेल आपल्या लोकांना हे कितपत झेपेल याविषयी मला शंका आहे पण आपले प्राचीनत्व सिद्ध करण्याची आणि ते व्यवहारात वागवण्याची कालगणना हीच एक संधी असते आपणाला अजूनही ही गोष्ट कळलेली नाही वैदिक लोकांच्या प्रचंड ब्राह्मक कालगणना आपल्या कामाच्या नाहीत कारण त्या बनावट वाटायला लागतात उत्खननशास्त्रामध्ये भारतामध्ये विशेषता दक्षिण भारतामध्ये जेव्हा उत्खनन होईल तेव्हा आपणाला इसवी सन पूर्व दहा हजार पर्यंत तरी किमान जावे लागेल असा माझा अंदाज आहे कदाचित त्या आधीचे ही उत्खनन शास्त्रीय पुरावे सापडू शकतात त्यांना जागा असावी म्हणून इसवी सन पूर्व 20000 ही काल गणना स्वीकारलेली आहे भगवान शंभू हे प्रामुख्याने पशुपालक कालखंडात जन्मलेले आहेत हे अत्यंत निर्विवाद आहे आणि पशुपालन हे साधारणपणे २५००० वर्षांपूर्वी सुरू झालेले आहे म्हणूनच इतकी प्राचीन सुरुवात करावी लागते 


या कालगणने विरोधात लढणे आपणाला शक्य नाही हे लक्षात आल्यानंतर मग ब्राह्मण लोकांनी वेगळी स्ट्रॅटेजी अवलंबलेली दिसते वेदांचा कालखंड आजकाल लाखो वर्षांपूर्वी नेण्याचा जो प्रयत्न होत आहे तो आत्ताचाच नाही तर पौराणिक महाकाव्यीक काळापासून चाललेला उद्योग आहे आणि यामागे उद्देश एकच आहे तो म्हणजे शैव कालगणनेला शह देणे बौद्ध आणि जैन कालगणनेला शह देणे प्रत्यक्षात हे साधलेले दिसत नाही याचे कारण वैदिक संशोधनामध्ये युरोपियन लोकांनी घेतलेला इंटरेस्ट ! युरोपियन संशोधक काही केल्या वेदांचा कालखंड हे इसवी सन पूर्व पंधराशे च्या पूर्वी घेऊन जात नाहीत त्यामुळेच अलीकडे युरोपियन लोकांच्या इतिहासाबद्दल शंका निर्माण करणे सुरू झालेले आहे 


थोडक्यात काय जैन आणि बौद्ध धर्माला शह देता यावे म्हणून आणि शैव लोकांचा प्रभाव कमी करावा म्हणून 800 ते 1200 या कालखंडात रामायण आणि महाभारत यांचा दबदबा आणि गवगवा वाढवण्यात आला राम आणि कृष्ण यांची मंदिरे उभी करण्यात आली आज सर्वांनाच माहिती आहे की इसवी सन सातव्या शतकापूर्वी आपणाला एकही राम मंदिर किंवा एकही कृष्ण मंदिर दिसत नाही कारण रामायण आणि महाभारत या दोन महाकाव्यांतून उदयाला आलेल्या या देवता आहेत आणि भारतीयांनी जेव्हापासून या महाकाव्यिक देवतांचा स्वीकार केला तेव्हापासून त्यांचे पतन सुरू आहे ते अजूनही थांबलेले नाही जगात सर्वत्रच महाकाव्य लिहिली गेली तशी ती भारतातही लिहिली गेली परंतु जगातल्या सर्व लोकांनी आपल्या आपल्या महाकाव्यातून निर्माण झालेल्या देवता नंतर सोडून दिल्या भारतात मात्र अशा प्रकारचा त्याग करता आला नाही किंबहुना भारतातल्या ब्राह्मण पुरोहितांनी स्वतःच्या स्वार्थासाठी हा त्याग होणार नाही याची काळजी घेतली याचे कारण एकच ते म्हणजे पौराहीत्य व्यवसाय आणि वर्ण व्यवस्थेला या रामायण आणि महाभारतातून मिळणारा सपोर्ट !


रामायण आणि महाभारतामुळे आठव्या शतकापासून वैष्णव धर्म प्रभावी होत गेला मात्र त्याला शैव-धर्मावर शेवटपर्यंत मात करता आली नाही आणि म्हणूनच मग भावतंत्र भक्ती संप्रदाय स्वीकारून हिंदू धर्माची निर्मिती अत्यंत पद्धतशीरपणे करून विष्णू आणि शिव या दोघांना सन्मान देणे सुरू झाले भारतात भक्ती संप्रदायाच्या अंगाने जर का आपण हिंदू या शब्दाची व्याख्या करायची ठरवले तर शिव शक्ती विष्णू लक्ष्मी गणपती आणि स्कंद या सा देवतांची पूजा किंवा त्यांच्या अवतारांची किंवा रुपांची पूजा करणारे लोक अशी करता येते भारतात ब्रह्मदेवाची पूजा आजही केली जात नाही कारण ब्राह्मणांनी त्याची हकालपट्टी केली कारण ब्राह्मणांच्या क्रिएशन सिद्धांतामध्ये ब्रह्मदेव जे काही करतो आहे ते स्वीकारणे इस्लामिक कालखंडामध्ये अशक्य बनत गेले ब्रह्मदेव आपल्या मुलीच्या मागे लागल्याने आणि तिच्यापासून संतती झाल्याने त्याच्यावर बंदी घालणे हे ब्राह्मणांसाठी आवश्यक झाले 

आज आपण जर का दैनंदिन व्यवहारात हिंदू काय करतो हे पाहिले तर तो या सहा लोकांची सहा देवतांची त्यांच्या विविध रूपांची आणि अवतारांची पूजा करतो असे आपणाला म्हणता येते हे करताना पद्धतशीरपणे शिव आणि शक्ती यांचे सामर्थ्य कसे कमी करता येईल हे पाहिले जाते अलीकडे तर महालक्ष्मीलाच शक्ती म्हणण्याची आणि तशी प्रथा रूढ करण्याची चाल निघालेली आहे ब्राह्मणांचा उद्देश साफ आहे सर्वात प्रथम शैव धर्मी लोकांना बहुजनांना गोंजारायचे आणि हळूहळू सर्व शैव धर्म नष्ट करून टाकायचा असा हा प्लॅन आहे दुर्दैवाची गोष्ट अशी की बहुजन समाजाला यातल्या काहीही गोष्टी कळत नाहीत तो हे सर्व होऊ देत आहे त्यासाठी मग अनेक कथा वापरल्या जातात उदाहरणार्थ स्वामी विवेकानंद काश्मीरमध्ये गेले तर तिथे कालीच्या मंदिराची अवस्था पाहून त्यांना वाईट वाटले तर स्वप्नात किंवा दृष्टांतात येऊन त्यांना काली म्हणाली की माझी काळजी तू करू नकोस माझी काळजी घ्यायला मी समर्थ आहे आता ही कथा वारंवार सांगितली जाते कारण शैव लोकांनी कालीच्या रक्षणासाठी काहीच करू नये काली स्वतः स्वतःचे रक्षण करायला समर्थ आहे असे म्हटले की कालिचे स्वतःच्या धर्माचे रक्षण करण्याची जबाबदारी शैव लोकांच्यावर येत नाही ही मुद्दाम ठेवलेली पळवाट असते जेणेकरून शैवाने काही कृतीच करू नये हे अत्यंत पद्धतशीरपणे केले जाते त्यातच स्वामी विवेकानंद यांचे नाव असल्याने आणि हे कथन बहुदा सत्य असल्याने त्याचा प्रभाव ताबडतोब पडतो जर काली इतकी समर्थ होती, तर मग काश्मीरमध्ये सगळे मुसलमान झालेच नसते की कालीमातेनेच सर्व शैव लोकांना मुसलमान होऊ दिले ? शैव लोकांनी आता स्वतःची जरा बुद्धी वापरणे फार आवश्यक आहे आणि स्वतःच्या धर्माचे आणि स्वतःच्या नीतिमत्तेचे रक्षण करणे आवश्यक आहे श्रद्धा किती ताणायची याचा पोच बाळगावा लागतो सर्व काही देव बघून घेईल या गोष्टीवर विश्वास ठेवून चालत नाही कारण जीव हाच शिव असतो आणि शिव हे आपणच या जगामध्ये जगताना अमलात आणायचे असते मुळात सर्व देवता या माणसाने त्या अमूर्त शून्यापाशी जाण्याकरता निर्माण केलेल्या असतात मोक्षासाठी निर्माण केलेल्या असतात किंवा निसर्गापुढे झुकून निर्माण केलेल्या असतात त्या संकल्पना असतात त्यामुळेच त्या संकल्पना काय आहेत त्या कशा विकसित होत गेल्या यांचा अत्यंत जमिनीवर राहून अभ्यास करावा लागतो शिव,शक्ती, संसार किंवा पसारा , ईश्वर आणि मोक्ष हे आदिपंचायतन सत्य आहे परंतु ते तुमचा इतिहास घडवतं या भ्रमात राहू नका ते इतकं अफाट आहे की पृथ्वी ही त्यांच्या संदर्भात नगण्य आहे इतिहास माणसाला माणसाचा घडवावा लागतो सध्या शैव धर्म दोन बाजूंनी संकटात आहे पहिले संकट भारत देशापुरते ब्राह्मण धर्माचे आहे तर दुसरे संकट जगामध्ये आणि भारतामध्ये इस्लाम धर्माचे आहे आणि एकाच वेळी या दोन्ही संकटांचा मुकाबला करावा लागणे अटळ आहे अशा वेळी नेमके काय पाऊल टाकायचे हे ठरवायचे असेल तर बसवेश्वर ,शिवाजी महाराज, संभाजी महाराज , पहिला बाजीराव , यशवंतराव होळकर , महात्मा फुले यांच्या इतके उपयुक्त मार्गदर्शन कोणीही करू शकत नाही 

हे करतानाच आपणाला आपली इतिहास गणना निर्माण करावी लागेल कालगणना निर्माण करावी लागेल आणि ती किमान 22 हजार वर्षांपूर्वी पर्यंत न्यावी लागेल असे केले तरच आपणाला स्वतःचा स्वतंत्र शैव इतिहास लिहिता येईल अन्यथा इरोशियन कालगणनेमध्येच आपणाला घटन खाव्या लागतील  गटांगळ्या खाव्या लागतील

श्रीधर तिळवे नाईक

Sunday, July 16, 2023

 शैवलिंगांचे प्रकार श्रीधर तिळवे नाईक 


भारतात सर्वाधिक प्रचलित जी साकारपूजा आहे ती शैव लिंगांची आहे मात्र अनेकांना लिंगाविषयी खूप कमी माहिती असते लिंग म्हणजे सेक्स अवयव किंवा जेंडर अशीच अनेकांची समजूत असते पण ती खरी न्हवे त्यासाठी वृषण शिस्न आणि योनी असे स्वतंत्र शब्द आहेत वैदिकांनी अर्धवट ज्ञानातून शिवाची शिस्नदेव अशी हेटाळणी केली आणि त्यातून अनेक गैरसमज निर्माण झाले लिंग म्हणजे फॅलिक पूजाही न्हवे अनेकांनी विशेषतः युरोपियन अर्धवटरावांनी ग्रीकांच्यात अशी पूजा होती म्हणून भारतातील शैवांना ती लागू केली प्रत्यक्षात लिंग म्हणजे शैव तत्वांची  साकार अभिव्यक्ती ! आणि ह्या अभिव्यक्तीतील पूज्य म्हणजे शून्य म्हणजेच शिवाकडे जाण्यासाठी केली जाणारी अवलंबली जाणारी तंत्रे म्हणजे पूजा होय . 

लिंगाचे अनेक प्रकार होतात त्यातील मुख्य बारा प्रकार इथे देतो आहे 

१ शिवलिंग ह्यात फक्त आकाशाच्या दिशेने जाणारा स्तंभ उभा केला जातो जो अनंत व शून्य दिशेने जातो 

२ शक्तिलिंग ह्यात योनीसारखे दिसणारे अर्धे मंडल जे खुले असते किंवा पूर्ण मंडल वर्तुळ काढले जाते 

३ ईश्वरलिंग वा ज्योतिर्लिंग ह्यात स्तंभ व मंडल दोन्ही असते हल्ली सर्वत्र हेच दिसते आणि हेच शिवलिंग म्हणून ओळखले जाते 

४ सूर्यलिंग ह्यात ईश्वरलिंग असते पण त्याचबरोबर त्याच्यावर सूर्याचे वर्तुळ किंवा सूर्य स्त्री व पुरुष चेहऱ्याचा काढला जातो कधीकधी सूर्य सिंह , हत्ती ह्यासारख्या जीवांच्या आकाराचा असतो हस्तमुखी गणपती हे सूर्यलिंग आहे हेसुद्धा लोक आता विसरून गेलेत सूर्याच्या अवस्थांनाही नंतर पुजले जाऊ लागले 

पहाटेचा सूर्य ब्रह्म पृथ्वी भूमी  ब्रह्ममुहूर्त सर्वांना माहीत आहेच 
सकाळचा सूर्य राम व पृथ्वी सीता 
दुपारचा सूर्य मार्तंड मल्हार व पृथ्वी धरा  
संध्याकाळचा सूर्य कान्हा वा श्याम व पृथ्वी श्यामा वा श्यामल वा राधा  (ह्या दोघांचा रोमान्स हा महाराष्ट्रातून उत्तर भारतात निर्यात झाला आहे )
रात्रीचा सूर्य नारायण व नारायणी  (ह्या दोघांचा रोमान्स हा महाराष्ट्रातून उत्तर भारतात निर्यात झाला आहे )
पूर्ण सूर्य यम व पृथ्वी यमी यमाचा मूळ अर्थ आहे प्रकाशाचा स्रोत सत्य अहिंसा अचोर्य सुकाम हे यम व स्वच्छता वैग्रे नियम म्हणून ओळखले जातात यमपालनाशिवाय मोक्ष मिळत नाही पुढे ह्या पंचसूर्यांना देहालिंगेही मिळू लागली 


५ पृथ्वीलिंग वा मातृलिंग ह्यात लिंग अर्ध्या किंवा पूर्ण मंडलाच्या आकाराचे असते ते स्त्रीच्या योनीच्या आकाराचे दिसते म्हणून अनेकांना ती योनीपूजा वाटत असते प्रत्यक्षात ते योग्य न्हवे 

६ मुखलिंग ह्यात शिवलिंगावर वा ईश्वरलिंगावर चौमुखी त्रिमुखी द्विमुखी एकमुखी असे मुख किंवा अनेक मुखे काढली जातात भारतात काही लिंगे अशी आहेत कि ज्यांच्यावर शंकर , भैरव आदी मोक्ष मिळवलेल्या लोकांची मुखे काढली जातात अपवादात्मकवेळा शंकर , कपिल , महावीर , गौतम बुद्ध ह्यांच्या मुखांची चौमुखी लिंगेही निर्माण केली गेली आहेत कारण महावीर बुद्ध हे शैवांच्या दृष्टीने सिद्धपुरुष आहेत गौतम बुद्धाचे नावच मुळात सिद्धार्थ होते  अनेकदा पृथ्वी ही मातृदेवता म्हणून किंवा सात आसरा म्हणून पुजली जाते ती देहलिंग म्हणूनच असते ह्यातील सहा आसरा ह्या सहा ऋतूच्या प्रतीक असून सातवी ऋतूच्या पलीकडची संपूर्ण अखंड पृथ्वी आहे 

७  मोक्षलिंग  किंवा सिद्धलिंग  ह्यात जे जीव शिवात मोक्ष मुक्ती मिळवून सिद्ध झाले अशा मुक्त झालेल्या सर्व सिद्ध स्त्री आणि पुरुषाची मूर्ती बनवून पूजा केली जाते उदा भोलेनाथ(भोला ह्या शब्दाचा मूळ अर्थ भलं करणारा असा आहे निरागस असा नाही )  , आदिनाथ , गणपती , स्कंद , नंदी , अय्यप्पा , रवळनाथ,  भूतनाथ , बाबुलनाथ , गोरखनाथ , वेताळनाथ( हा वेळाल व वेताळ ह्या शेतकरी भटक्या गणाचा प्रमुख होता आणि शेतात जे बुजगावणे म्हणून उभे केले जाते ते प्रत्यक्षात ह्याचे देहलींग आहे आणि ते काळ्या कपड्यात असायचे तो शेतीचे रक्षण करतो ही ह्यामागची धारणा ह्यालाच प्रथम शंकराने आपला त्रिशूळ नांगर म्हणून कसा वापरायचा ते शिकवलं आमच्या दोन कुलदेवतांपैकी हे एक आहे दुसरी अर्थात शांतादुर्गा शेती करता करता हा मोक्षाला पोहचला ह्याला काही ठिकाणी वेतोबा म्हणतात कारण काही ठिकाणी ह्याचे मोक्षलिंग वेतापासून बनवले जाते  )  , भैरवनाथ , पंढरीनाथ , ज्योतिबा , खंडोबा , रेणुका , यल्लमा , चामुंडा , मुरुगन , कार्थिकेयन , सुब्रमण्य , कुमारनं भैरोबा बिरोबा योगिनी योगी 

८ तत्वलिंग ह्यात शिव, शक्ती  ,ईश्वर, सूर्य व  तंत्रे (ह्यात अनेकदा यंत्रे काढून)  ह्या तत्वांची त्यातल्या एका विशेषाची त्यांना देहरूप देऊन पूजा केली जाते उदा  देह तत्वाची सुंदर सुंदरा सुंदरी प्रचण्डेश्वर प्रचंडी बुद्धितत्त्वाची शंभू व शाम्भवी भावतत्वाची भवानी भुवनेश्वर सृजनतत्वाची अंबा जगदंबा गौरी अवकाशतत्वाची दुर्गा दुर्गेश्वर सृजनतत्वाची माया शरीरतत्वाची मीनाक्षी तंत्रतत्वांची भैरव भैरवी मुक्तस्थितीची हरा हरेश्वर कालतत्वाची महाकाली महाकाल अवस्था तत्वाची (प्र)चंडी प्रचंड प्रचंडेंश्वर गौरेश्वर विद्या वैद्यनाथ प्राणेश्वर ईश्वरतत्वाची महादेव महादेवी 

९ निसर्गलिंग ह्यात निसर्गातील लिंगसदृश्य आकाराला लिंग म्हणून पुजले जाते उदा वड हा शक्तिलिंग आहे तो शक्तीचा पिसारा व पसारा मांडतो त्यामुळेच वटपौर्णिमेला बायका शक्तिलिंग म्हणून त्याची पूजा करतात आर्यानी ह्या वटपौर्णिमेचा सगळा अर्थच बदलून टाकला आहे ह्याउलट पर्वत हे शिवलिंग म्हणून पुजले जातात तर नदी ही मातृलिंग म्हणून पुजली जाते  

१० स्थानलिंग ह्यात त्या त्या स्थानाचे लिंग म्हणून शिवलिंग शक्तिलिंग वा प्रामुख्याने ईश्वरलिंगाची स्थापना केली जाते म्हणजे काशी नगराचा  काशिनाथ कोपरड्याचा कोपर्डेश्वर स्थानाचा  स्थानेश्वर रंकाळ्याच्या रंकाळेश्वर 

११ व्यवसायलिंग ह्यात व्यवसायाला अनुरूप शरीर वा रूप शोधले जाते उदा नटराज हे नृत्य व  अभिनयाचा व्यवसाय करणाऱ्यांसाठी आहे किंवा सतार वा वीणा वाजवणारी शक्ती प्रतिमा  ही गायकांसाठी आहे पुढे ती सरस्वती म्हणून प्रमोट केली गेली ते सोडा गंमतीचा भाग असा कि तिच्या हातातील शिववीणेला आजकाल रुद्रवीणा म्हंटले जाते असो यक्ष हे  रक्षणाचा व्यवसाय करणाऱ्यांसाठीचे व्यवसायलिंग आहे विश्वकर्मा हे  लाकूडकाम करणाऱ्या सर्वांचे व्यवसायलिंग आहे 

१२ युग्मलिंग ह्यात दोन तत्वांचे युग्म पुजले जाते उदा शिव आणि शक्ती ह्या दोन तत्वांचे मिळून झालेले अर्धनारीनरेश्वर ! पार्वतीच्या मांडीवरील गणपती किंवा गौरी आणि गणपती वैग्रे 

युरोपियन लोक भारतात आले तेव्हा ते हा अवाढव्य व गुंतागुंतीचा पसारा पाहून भांबावून गेले त्यामागचे तत्वज्ञान त्यांना माहित नसल्याने ग्रीक पॅगनिझमच्या दृष्टिकोनातून त्यांनी हा पसारा पाहिला त्यातच हे लोक सेक्सबाबत सोवळे त्यामुळे लिंग वैग्रे त्यांच्या आकलनाच्या आणि पचनाच्या पलीकडे होते त्यांना शैव व्हिजन कळलेच नाही अनेकदा तर शैवांच्यापासून लैंगिक पळ काढलेला बरा असा व्हिकटोरियन प्युरिटन विचार त्यांनी केला परिणामी युरोपियन साम्राज्यवादी  काळात शैव भारतीयांची प्रचंड पीछेहाट झाली 

श्रीधर तिळवे नाईक 
(शैव पुरोहितांच्यापुढे १६जुलै २०२३ रोजी दिलेल्या व्याख्यानावरून )

Thursday, May 17, 2018

संविधान आणि भीती कशाची आहे ?श्रीधर तिळवे नाईक

१ काँग्रेसबद्दल भीती फक्त आणीबाणीच्या काळात निर्माण झाली आणि इंदिरा गांधी हत्येनंतर शीखविरोधी दंगलीत गांधीहत्येनंतर अशीच भीती ब्राम्हणांच्यात निर्माण झाली होती असे जुने वृद्ध लोक सांगायचे म्हणजे भीती निर्माण करण्याबाबत काँग्रेस फार सोवळी आहे असे कुणीही मानू नये शिवाय गावोगावचे काँग्रेसचे सहकारसम्राट आणि अलीकडचे काही शिक्षणसम्राट व राजघराणीसम्राट भीती निर्माण करण्यात कुठे कमी पडतायत असे नाही बिहारमध्ये लालू आणि उत्तर प्रदेशात मुलायम हेही भीती निर्माण करण्यात कुठे कमी पडलेत असे दिसत नाही कम्युनिस्टांनी रशिया व चीन मध्ये भीती निर्माण करण्यात परमोच्च शिखर गाठले होते तेव्हा शासक समूह हा कुठेही आणि कसाही असला तरी भीती निर्माण करण्यात वाकबगार असतो ही वस्तुस्थिती ! किंबहुना राजकारण हा भय आणि भीती निर्माण करण्याचा कारखाना आहे सत्तेची अपरिमित असोशी व लालसा ही प्रत्येक माणसाच्या ठायी आहे आणि ती प्रत्येकालाच वेडं बनवते कुणी कलाक्षेत्रात आपली सत्ता निर्माण करतो तर कुणी प्रशासनात ही सत्ता आपल्या आयुष्यासंदर्भात आपल्या मर्डरपासून आपल्या मुलाच्या शिक्षणापर्यंत एकतर्फी निर्णय घेऊ शकते असे वाटणे म्हणजे भय आणि ह्या भयाचे प्रात्यक्षिक सत्ताकारी तांडव म्हणजे भीती .
२भाजप आत्ताचे संविधान रद्द करून मनू आदी स्मृतिकारांच्या स्मृतीनुसार धर्मशास्त्रानुसार ब्राह्मणी संविधान आणून इस्लामि देशांनी जसे शरियत लागू केले तसे हे ब्राह्मविधान निर्माण करून ते लागू करेल ही भाजपविषयीची भीती !ह्या भीतीला काही आधार नाही हे पटवणे हे भाजपच्या प्रवक्त्यांचे व विचारवंताचे काम आहे ते हे काम करत नाहीत उलट मनूचा पुतळा राजस्थान विधानसभेच्या आवारात निर्माण करून ते ही भीती वाढवतायत

३ प्रश्न असा आहे कि त्या त्या देशातील मुस्लिमांना जसे शरियत हवे होते तसे ह्या देशातील हिंदूंना मनूचे व इतरांचे धर्मशास्त्र हवे आहे का ?शैवांना अर्थ , काम आणि मोक्ष असे तीनच अक्ष हवे होते असे मी कायमच ओरडून सांगत असतो पण त्याचा एक मूलभूत अर्थ असा होतो कि शैवांना कायदेव्यवस्था धर्मानुसार न्हवे तर अर्थ आणि काम ह्या दोन अक्षांनुसार हवी असते शैवांच्या मते हे दोन्ही अक्ष अस्थिर व सतत काळानुसार बदलत असल्याने कायदेही सतत बदलणे अपरिहार्य आहे ह्यातील अर्थ हा सामाजिक आणि काम हा कौटुंबिक तर मोक्ष हा पूर्णपणे वैयक्तिक आहे ह्यामुळे बदलत्या कायद्यांना सतत मान्यता देणे हे शैवांच्या अंगवळणी पडलं आहे किंबहुना कायद्याबाबत शैवांची अटीट्युड who bothers अशीच आहे ह्याचा एक दुष्परिणाम असा झालाय कि कुणीही कोणताही कायदा आणला तरी शैव तो सहज स्वीकारतात त्याची साधी चिकित्साही न करता ! ह्या देशातील वैश्य शूद्र अतिशूद्र आणि आदिवासी ह्यांची मानसिकता ही शैव मानसिकता आहे आणि तिची कायद्याबाबतची निष्काळजी वृत्ती ही तिला अनेकदा गुलाम बनवण्यात महत्वाचा रोल बनवते त्यामुळेच उद्या भाजपने मनूचे नवे धर्मशास्त्र नवे संविधान म्हणून आणले तर शैव खरोखर त्याची चिकित्सा करतील का कि पुन्हा who bothers म्हणून खांदे उडवतील ? शैवांना सत्ताधारी म्हणून राजधानीत एक गणाधिपती हवा असतो तो स्वदेशी कि विदेशी हा प्रश्नही त्यांना पडत नाही किंबहुना त्यांच्या मानसिकतेत राजकारण ही फक्त करमणूक आहे आणि निवडणूक हा आणखी एक गणपती उत्सवासारखा उत्सव ! आपल्या आयुष्यावर तिचा काही सखोल परिणाम आहे असे त्यांना वाटतच नाही धसका घ्यावा अशी ही निष्काळजी वृत्ती आहे शैव विचारवंतांना खरी भीती ह्या निष्काळजी वृत्तीची वाटायला हवी

४ आता समजा उद्या भाजपने सगळ्यांचे आडाखे चुकवत आत्ताचे संविधान बदलून एक नवे समान नागरी कायदा पाळणारे काश्मीर वैग्रे राज्याचे स्वायत्त विशेष दर्जा रद्द करणारे सर्व प्रकारची समानता व समता जोपासणारे अतिशय आधुनिक असे संविधान आणले  तर काय करायचे ? माझे स्वतःचे स्पष्ट मत असे कि असे काही आत्तापेक्षा अधिक उत्तम व अव्वल दर्जाचे संविधान भाजप आणत असेल तर मी त्याचे स्वागत करायला एका पायावर तयार आहे किंबहुना काँग्रेसने असे संविधान आणण्याची जबाबदारी पार पाडली असती तर भाजपचा उदय झालाच नसता असे माझे मत आहे पण भीती अशी आहे कि असे काही न होता भाजप सर्व प्रकारची विषमता जोपासणारेच नवे संविधान आणेल आणि खरी गोची इथेच आहे भारत जाऊ द्या पण ज्या उत्तर प्रदेशात भाजपचे प्रचंड बहुमत आहे तिथेही भाजपने गोव्याप्रमाणे समान नागरी कायदा आणलेला नाही भाजप फक्त हिंदूंच्या भावनांशी खेळतंय ही शंकाच हिंदूंची खरी भीती आहे

जुनी पोस्ट ७/५ /१८

श्रीधर तिळवे नाईक

नितिन भरत वाघ तुमच्या प्रश्नांची उत्तरे पुढे मिळतील मी अद्यापही पुरोहित समुदायाबद्दलच लिहितोय











Tuesday, March 20, 2018

कर्नाटक सरकारने लिंगायत धर्माला स्वतंत्र धर्म म्हणून मान्यता दिली त्याबद्दल अभिनंदन ! लिंगायतांना हिंदूत टाकून त्यांची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न प्रथम ब्रिटिशांनी केला नंतर एतद्देशीयांनी ! मूळात ह्याची सुरवात श्रीपतीने केली होती . कुठलीही क्रांती वैदिकांच्या गळाला लावून तिची हवा काढून घेण्याचे तंत्र वैदिकांनी व्यवस्थित घोटवले आहे श्रीपतीने त्याची सुरवात केली आणि लिंगायत धर्मातही वर्ण आणि जातीव्यवस्था घुसली . स्वतंत्र धर्म म्हणून मागणी करतांना आम्ही वेद , वर्ण , जात मानत नाही असे मागणी करणाऱ्यांनी सांगितलय त्याचा प्रत्यय व्यवहारातही यावा नाहीतर अल्पसंख्यांक म्हणून मिळणारे फायदे लाटण्यासाठी केली गेलेली एक राजकीय चाल एव्हढेच ह्या घटनेचे महत्व राहील तेव्हा नवा धर्म हे उत्तमच आहे पण लिंगायत प्रत्यक्ष व्यवहारात जातीयता पाळताना दिसले तर हिंदूंच्यात आणि त्यांच्यात फरकच राहणार नाही
तेव्हा उत्सव साजरा करतांना जबाबदारीही ओळखलेली बरी . बसवेश्वरांचा लढा हा वर्ण जाती अंताचा लढा होता हे प्रत्येकाने नीट लक्ष्यात घेतले तर बरे !नाहीतर नाव बसवेश्वरांचे आणि करणी वैदिकांची असा दुट्टपीपणा होईल आणि सारे मुसळ पुन्हा केरात जाईल

श्रीधर तिळवे नाईक 

Saturday, December 19, 2015

साधक , सेंट आणि संत /शैवाचार्य श्रीधर तिळवे -नाईक 

मदर तेरेसा ह्यांना मिळालेल्या सेंट ह्या पदामुळे सध्या बरीच चर्चा चालू आहे . खरेतर नवशैवांनी ह्यात पडावे कि न पडावे हा एक प्रश्नच आहे . नवशैव धम्माचा विज्ञानाला संपूर्ण पाठींबा असला तरी विज्ञानाचीही कठोर चिकित्सा झाली पाहिजे असा आग्रह आहे . जगातले सर्वच धर्म कालबाह्य झाले असून जगाला धर्माची गरज राहिलेली नाही असे  मला वाटते पण त्याचबरोबर निर्वाण हा माझा अनुभव असल्याने त्याला ओलांडून जावे असे मला वाटत नाही . मात्र हे निर्वाण उसने देता येत नसल्याने त्याबद्दल फक्त शक्यता नोंदवून पुढे जावे हे सध्याच्या काळाला धरून आहे . चमत्कार हा भ्रमही असू शकतो किंवा स्वानुभव पण त्याला सार्वजनिक जीवनात कसलेही स्थान देता नये . दुर्देवाने सर्वच धर्म चमत्काराचे सामाजीकरण करून त्याचा धंदा करू पाहतात . ९९९९९. ९९९ % चमत्कार हे त्या त्या व्यक्तीला होणारा भ्रमच असतो . अशावेळी चमत्काराच्या आधारे सेंटत्व ठरवणे हेच मुळात बालिश आहे . पण ख्रिस्ती धर्माचा पायाच मुळी चमत्कार असल्याने त्यांना हे नाईलाजाने करावे लागते .जो चमत्कार करतो तोच सेंट अशी सेंटची व्याख्या आहे त्यामुळे हे सर्व सेंट ठरवण्यासाठी झाले आहे हे उघड आहे . संत हा शब्द वेगळा आहे . सेंट म्हणजे संत न्हवे . संत म्हणजे ज्याच्या सांत असण्याचा अंत झाला आहे आणि ज्याला मुक्ती प्राप्त झाली आहे असा !. साधक तो जो संत होण्यासाठी धडपडतो. महाराष्ट्रात निवृत्तीनाथ , सोपानदेव , चक्रधर , मुक्ताबाई , ज्ञानेश्वर ,नामदेव , गोरा  कुंभार , जनाबाई ,  एकनाथ , तुकाराम , बहिणाबाई , असे संत होवून गेले काही होता होता खोळंम्बले . काहींनी स्वताच्या मुक्तीपेक्षा समाजसुधारणा महत्वाची मानली जसे कि गाडगेबाबा . संत म्हणजे भक्ती मार्गाने निर्वाण प्राप्त करणारा साधक . त्याउलट जे निरीश्वरवादी ज्ञानमार्गाने निर्वाण प्राप्त करतात ते बुद्ध !संत ईश्वर मानतात बुद्ध ईश्वराला नकार देतात . त्यामुळेच संत अनंताच्या भाषेत बोलतात तर बुद्ध शून्याच्या ! ह्यांच्या नावानेही चमत्कार सांगितले जातात पण चमत्कार ही ऑफिशियल अट नसते ख्रिस्ती धर्मात मात्र ही ऑफिशियल अट आहे .  सार्वजनिक जीवनात चमत्कारांना अजिबात जागा असू नये असे माझे स्पष्ट मत आहे पण ख्रिस्ती धर्म तर चमत्कारांना सार्वजनिक करतो अशावेळी करायचे काय ? घटनेनुसार त्यांचा हा धार्मिक हक्क आहे . त्यामुळे आपण एवढेच म्हणू शकतो . '' आम्हाला हा चमत्कार मान्य नाही पण तुमच्या धार्मिक स्वातंत्र्याचा मी आदर करतो . 

शैवाचार्य श्रीधर तिळवे -नाईक