Wednesday, August 19, 2026

ज्ञान आणि चौथी नवता एक क्रांतीकारक प्रश्न श्रीधर तिळवे नाईक 

ज्ञानाच्या क्षेत्रात चौथ्यान नवतेने निर्माण केलेला सर्वात मोठा प्रश्न जर कुठला असेल तर तो म्हणजे निरीक्षकाच्या निरीक्षणामुळे निरीक्षण बदलते काय आणि वास्तवही reality बदलते काय ? आत्तापर्यंत निरीक्षण चक्क वास्तवालाच बदलत असेल असे कोणालाच वाटले नव्हते पण आता निरीक्षक आणि निरीक्षण हे दोघेही वास्तवाला बदलतात काय असा फार मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे म्हणजे मी जेव्हा एखाद्या व्यक्तीला पाहतो तेव्हा त्या व्यक्तीमध्येच फरक पडलेला असतो आणि हा फरक माझ्यामुळे पडलेला असतो आणि कदाचित माझ्या निरीक्षणामुळे सुद्धा हा फरक पडलेला असतो. आता हे सर्व काही अद्वैतामुळे होते का हा त्याहून मोठा प्रश्न! कारण अद्वैत असल्याशिवाय हे शक्यच नाही. आत्तापर्यंतचा ज्ञानाच्या क्षेत्रातील सर्व सर्व खटाटोप हा पुरोगामी कालखंडामध्ये पूर्ण द्वैतावर आधारित होता तिथे निरीक्षक आणि निरीक्षण दोन भिन्न गोष्टी होत्या त्यामुळे निरीक्षण हे ऑब्जेक्टिव्ह असणे शक्य होते परंतु क्वांटम युगामध्ये अचानक निरीक्षकाची पोझिशन महत्वाची झाली आणि त्यामुळे निरीक्षकाच्या पोझिशनमुळे माया (म्हणजे वास्तव) वेगळी वेगळी नजर येते वेगळे वेगळे नजर येते असे समीकरण रूढ झाले होते पण आता फक्त बदल निरीक्षणामध्ये राहिलेला नाही तर थेट निरीक्षणामुळे आणि निरीक्षकामुळे वास्तवातच बदल होतो का असा हा प्रश्न आहे आणि अनेकांना यातला ज्ञानाचा अजीबो गरीब खेळ कळत नाहीये. एका अर्थाने आपण ज्ञानाच्या अद्वैतामध्ये आलेलो आहोत म्हणजे मी आणि ज्ञान हे वेगळे नाही माझे ज्ञान हे सुद्धा ज्ञातापेक्षा वेगळे नाही म्हणजेच ज्ञाता, ज्ञेय आणि ज्ञान या तिन्ही गोष्टी वेगळ्या नाहीत आणि म्हणूनच या तिघांच्यामुळे तिघांच्यातही फरक पडू शकतो 


या सगळ्यामुळे विज्ञानाच्या आत्तापर्यंतच्या सर्व ज्ञानाला सुरुंग लागणे अटळ आहे कारण आत्तापर्यंत आपण जे गृहीत धरले होते की ज्याचे ज्ञान होते ते वास्तव बदलत नाही ते स्थिर असते किंवा ते बदलत असले तरी त्याच्यावर जो ज्ञाता ज्ञान यांचा सुद्धा परिणाम होतो तो आपण कधीही गृहीत धरलेला नव्हता आता या सगळ्या प्रकारांमधून नेटवर्क बद्दलच प्रचंड मोठी शंका निर्माण होते याचे कारण आत्तापर्यंत आपण नेटवर्क हे कायमच विशिष्ट अद्वैत आणि पूर्ण द्वैत यांच्या आधारे उभा करत होतो परंतु आता पुढच्या जर काय आर्टिबायलॉजिकल इंटेलिजन्स संदर्भात स्टेप्स म्हणजे पायऱ्या आपण जर का टाकायला गेलो तर त्या बायोलॉजिकल पायऱ्या अतिशय कठीण होत जाणार आहेत कारण तुम्ही जे बनवायला जाल ते तुमच्या नुसारच बदलणार आहे बनणार आहे . यातूनच आणखी काही प्रश्न निर्माण होतात ते म्हणजे अतिप्रत्यक्ष प्रमाण पुन्हा एकदा विचारात घ्यावे लागणार आहे का आणि त्याचा नेमका सिग्निफिकन्स काय असेल ? आत्तापर्यंत अति प्रत्यक्ष प्रमाणाची चर्चा फक्त मोक्षाच्या संदर्भात होत होती आणि आता ती विज्ञानाच्या कक्षेत आणावी लागेल अशी चिन्हे दिसायला लागलेली आहेत प्रश्न असा आहे की हे अतिप्रत्यक्ष प्रमाण नेटवर्कमध्ये कसे आणायचे ? दिसायला या सर्व गोष्टी आपणाला साध्या सरळ दिसतात पण त्या साध्या सरळ नाहीत . कारण एकदा का आपण ज्ञानाच्या संदर्भात अद्वैत स्वीकारले तर एक गोष्ट नक्की आहे ती म्हणजे दूरवरच्या ताऱ्याशी सुद्धा मी कनेक्टेड आहे याचाच अर्थ माझे नेटवर्क आखे ब्रम्हांड आणि शिवांड आहे हे काहीसे मोक्षाच्या जास्त जवळ जाणारे असले तरी प्रत्यक्ष आपलिकेशन मध्ये नेमके काय होणार हे सांगणे फार कठीण आहे ज्यांना मोक्ष मिळालाय त्यांना काही यात प्रॉब्लेम वाटणार नाही किंबहुना मला तो वाटलेला नाही पण ज्यांना तो मिळालेला नाही त्यांच्या संदर्भात नेमका याचा काय सिग्निफिकन्स होईल ते सांगता येणे फार कठीण आहे . याचा एक नैतिकतेच्या दृष्टीने चांगला परिणाम म्हणजे तुम्ही जर वाईट वागाल तर तुमचे वाईट वागणे समोरच्याच्या आयुष्यात फरक टाकेलच टाकेल परंतु तुमच्या स्वतःमध्ये सुद्धा त्याच्या केवळ निरीक्षणामुळे आणि त्याच्यामध्ये घडलेल्या क्रियांच्या मुळे काही वाईट दुष्परिणाम होणार म्हणजेच ज्याला आपण प्राचीनकाळी पापाचे फळ तुम्हाला स्वतःलाच मिळते असे जे म्हटले जात होते त्यामध्ये बरेचसे तथ्य आहे असे वाटण्याची किंवा असे सिद्ध होण्याची शक्यता नाकारता येत नाही . थोडक्यात कर्माचे फळ ज्ञानाला आणि जिचे ज्ञान होते आहे त्या वस्तूच्या वास्तवाला सुद्धा मिळते असे आता आध्यात्मिक भाषेत सांगता येते भारतामध्ये आपल्याकडे चर्चा अनेकदा मोक्षाच्या क्षेत्रातच प्रथम होते त्यामुळे मी ही चर्चा करत आहे याचा अर्थ मी सर्वज्ञ आहे असा कृपया घेऊ नका तसा मी नाहीये हे मला माहिती आहे पण या अंगाने एका नवीन विज्ञानाची शक्यता आता पुन्हा एकदा निर्माण होते आहे आणि हे चौथ्या नवतेचे विज्ञान असेल आणि ते आत्तापर्यंत चालत आलेल्या पोस्ट क्वांटम विज्ञानासारखे सुद्धा असणार नाही हे लक्षात घ्या . थोडक्यात चौथ्या नवतेचा ज्ञानाच्या संदर्भातला पोस्ट क्वांटम ट्रांजेक्शन ट्रान्झिशन काळ संपलेला आहे आणि आपण एका नव्या उत्तर जालीय कालखंडामध्ये प्रवेश करत आहोत .

श्रीधर तिळवे नाईक 



 गाणपत्य संप्रदाय आणि गणपती श्रीधर तिळवे नाईक 


गणपत्य संप्रदाय हा मूळचा पंचसिद्धातून निर्माण झालेला संप्रदाय आहे. शैव श्रुतीमध्ये शंकर , पार्वती , नंदी , स्कंद यांच्या बरोबरीने ज्ञानतंत्राचा पहिला शिष्य ज्याने ज्ञानतंत्राच्या साह्याने मोक्ष मिळवला असा शंकरांचा शिष्य सिद्ध म्हणून गणपतीला ओळखले जाते तो रंगाने मूळचा काळा होता परंतु नंतर ब्राह्मण परंपरेत तो गोरा होत गेला अर्थातच त्याचे तोंड अजिबात हत्तीचे नव्हते तर माणसाचेच होते कारण तो माणूस होता मात्र हत्ती वर नियंत्रण ठेवण्यात आणि अंकुश ठेवण्यात तो अतिशय प्रवीण होता म्हणूनच पुढे ज्ञान तंत्रामध्ये अंकुश ठेवणे या गोष्टीला कमालीचे महत्त्व प्राप्त झालेले दिसते अगदी गणपतीच्या नंतरच्या मूर्तींच्या मध्ये सुद्धा अनेकदा हा अंकुश येतो 


वैदिक लोकांनी ऋग्वेदामध्ये गणपती हा शब्द वापरला आहे परंतु प्रत्यक्षात त्या गणपतीचा अर्थ काय होतो हा एक अत्यंत वादग्रस्त प्रश्न आहे अलीकडच्या काळात तो गणपतीचा उल्लेख मानला जात असला तरी प्राचीन काळामध्ये तो तसा होता की नाही हा एक फार मोठा प्रश्न आहे मुळातच गण ही शैव संकल्पना हळूहळू वैदिक लोकांच्यात प्रवेश करताना दिसते सुरुवातीच्या काळात ती नसावी असेच वाटते सर्वसाधारणपणे दिसते ते असे की ऋग्वेदामध्ये गण आहे पण गणपती नाही आणि असला तर तो यज्ञविनाशक आहे त्यामुळेच त्याला विघ्न कर्ता म्हटले आहे 

नंतर मात्र मरुतगणाचा अधिपती रुद्र आहे म्हणजे शंकर आहे याच गणामध्ये असलेला हनुमान त्यामुळेच शंकराचा अवतार झाला अशी संकल्पना उदयाला आली 


यजुर्वेदामध्ये मात्र आश्चर्यकारकरीत्या सर्वच गण हे 

रुद्राचीच पूजा करतात म्हणजेच सर्व गणांचा देव हा रुद्र आहे आता हे आश्चर्यकारक आहे परंतु मुळातच अनेक अवैदिक गण या काळामध्ये माहित झाले होते आणि ते शंकराची पूजा करतात हेही सर्वांना माहीत झाले होते साहजिकच या काळामध्ये विशेषत : यजुर्वेदामध्ये गणपती स्वीकारला गेला आणि म्हणूनच तुम्हाला असे दिसेल की श्रमण धर्मांच्या मध्ये गणपतीची पूजा आज सुद्धा रूढ आहे अगदी जैन धर्मामध्ये तर ती खूपच आहे कारण वृषभनाथ ज्या आदिनाथांच्या पासून ज्ञानतंत्र शिकले त्यांच्यापासूनच गणपती हा सुद्धा ज्ञानतंत्र शिकला असे मानले जाते त्यामुळे एका अर्थाने तो शिष्य बंधू आहे त्यामुळेच जैन लोक आनंदाने गणपतीची पूजा करतात अनेक जैन घरांच्या मध्ये गणपती बसतो सुद्धा आणि ते स्वाभाविक आहे कारण तो त्यांच्या भूतकाळाचा एक अटळ भाग आहे परंतु बौद्ध धर्मामध्ये अगदी जापान सारख्या प्रदेशात सुद्धा गणपती दिसतो कारण शेवटी श्रमण परंपरेमध्ये गणपतीला ज्ञानतंत्राचा सिद्ध म्हणून खूप मान आहे 


पुढे पुढे तर रुद्र हा भूत आणि पिशाच यांना मारतो अशी संकल्पना आली याचा अर्थ स्पष्ट आहे रुद्र ही देवता अनार्य लोकांच्या विनाशासाठी जन्माला घातली गेली बहुदा या काळामध्ये अनार्य - आर्य संघर्ष वाढलेला असावा 


थोडे पुढे गुह्यसूत्रात गणपती हा स्पष्टपणे विघ्न निर्माण करणारा देव आहे त्याच्यामुळे बायकांना नवरे मिळत नाहीत राजाला राज्य मिळत नाहीत आणि विद्वानांना आदर मिळत नाही असा उल्लेख आहे 

बोधायन सूत्रात गणपतीला जी प्रार्थना केली जाते ती त्याने आमच्या यज्ञापासून तू दूर राहा आम्हाला त्रास देऊ नकोस अशा स्वरूपाची आहे गणपती अवैदिक देवता आहे हे इथे स्पष्ट आहे 


वराह पुराणांमध्ये यमाच्या विनंतीवरून शंकराने गणपतीला निर्माण केले अशी पहिली निर्माण कथा येते इथेच गणपतीच्या निर्माण कथेचे ब्राह्मणीकरण सुरू होते 


अग्निपुराणामध्ये ब्रह्मा विष्णू महेश यांनी अत्यंत जाणीवपूर्वक अडथळे यावेत म्हणून गणपतीला अडथळे निर्माण करण्यासाठी जन्माला घातले अशी निर्माणकथा सांगितली आहे 


मत्स्यपुराणामध्ये गणपतीची तिसरी निर्माण कथा येते आणि हीच कथा आता प्रचलित झाली आहे ती म्हणजे गणपती हा पार्वती पुत्र आहे मात्र इथे ब्रह्माने त्याला विनायक केलेले आहे 


शैव पुराणे जेव्हा पंडित लोकांच्याकडून निर्माण व्हायला सुरुवात झाली तेव्हा त्यांच्या पुढचे प्रश्न वेगळे होते कारण एकीकडे त्यांना शैव श्रुती शाबूत ठेवायची होती तर दुसरीकडे वैदिक श्रुतीचा मानही ठेवायचा होता साहजिकच लिंग पुराणामध्ये गणपतीचा प्रथम उल्लेख येतो तो विघ्नहर्ता म्हणजेच संकटाचे नाश करणारा म्हणून येतो इथून पुढे गणपती हा विघ्न आणणारा नसून विघ्न नाहीसा करणारा असा देव आहे अशी कथा आहे 

लिंग पुराण हे मुळातच शिव ही मुख्य देवता केंद्र स्थानावरून हटवून त्या जागी त्याचा पुत्र मुख्य देवता म्हणून पुढे आणणे हा हेतू ठेवून निर्माण झाले आहे साहजिकच आता शंकराची सर्व लक्षणे ही गणपतीला दिली गेलेली आहेत 


गणपतीची पूजा आत्ताच्या स्वरूपात केलीच जात नव्हती त्यामुळे साहजिकच गणपतीचे शिल्प किंवा मूर्ती शैव परंपरेमध्ये फारशी आढळत नाही आणि आढळली तरी ती नेहमीच काळया रंगात होती या मूर्तींच्यापैकी आता फक्त एकाच ठिकाणी मूर्ती शिल्लक राहिलेली आहे कदाचित उत्खननामध्ये आणखीन काही मुर्त्या सापडू शकतात त्यांना जे तोंड आहे ते माणसाचे आहे हत्तीचे नाही कारण शैव श्रुतीमध्ये गणपती हा शंकराचा पुत्र आहे तो कृष्णवर्ण आहे आणि शंकरांच्याकडून मोक्षाच्या ज्ञानतंत्राचा उपदेश घेणारा त्यांचा आद्य शिष्य आहे ज्ञानतंत्रातला प्रत्येक मनुष्य त्याला म्हणूनच नमस्कार करतो अगदी ज्ञानेश्वरसुद्धा ओम नमोजी आद्या म्हणूनच सुरुवात करतात याचे कारण उघड आहे तो शैव असल्याने साहजिकच तो पंडितांचा पहिला आद्यबिंदू आहे त्यामुळेच आद्यबिंदू म्हणून सर्व पंडित हे गणपतीची पूजा करत होते त्यांच्यासाठी तोच आरंभ आहे कारण ज्ञान तंत्राचा आरंभ हा त्याला दिलेल्या उपदेशापासून होतो हे पंडित जेव्हा ब्राह्मण झाले तेव्हा मग गणपतीच्या स्वरूपामध्ये फरक पडत गेला आणि तो रंगाने गोरा झाला आणि मुख्य म्हणजे पार्वतीचा मुलगा तिने स्वतः तयार केला ही संकल्पना उदयाला आली . आपण आपल्याच देवताचे विरुपीकरण करतो हे या लोकांना कळले नाही माझे म्हणणे नेहमीच हे असते की तुम्हाला ब्राह्मण राहायचे असेल तर तुम्ही ब्राह्मण रहा पण तुम्ही शैव धर्माचा संपूर्ण त्याग करा आम्ही दोन्हींच्याकडून फायदे उपटतो ही जी काय तुमची वृत्ती आहे ती चालणार नाही 


याच लोकांनी लिंग पुराण वगैरे शैव पुराणे रचली. कारण हे लोक मूळचे पंडित असल्यामुळे अनेक मूळच्या शैव कथा या लोकांच्याकडे वारसा हक्काने होत्या त्यांनी स्वतःचे ब्राह्मणत्व सिद्ध करण्यासाठी पुराणे निर्माण करताना युरेशियन परंपरेला जे बदल हवे होते ते बदल करून दिले 


ज्याला आज गणपती म्हटले जाते त्याचे पहिले शिल्प त्यामुळेच प्रथम मथुरेत सापडते ते साधारण चौथ्या शतकातले आहे त्यानंतर उदय गिरीच्या गुंफात ते सापडते भुमरा येथील शिव मंदिरात प्रथम आपणाला गणपतीची सोंडमूर्ती दिसते 


भवभूती हा शैव संन्यासी होता त्यामुळे त्याच्या मालतीमाधव मध्ये गणपतीच्या पूजेचा प्रथम उल्लेख येतो (माधव हे नाव प्रथम शंकराचे होते नंतर ते कृष्णालाही दिले गेले हे लक्षात घेतले पाहिजे किंबहुना महादेव या शब्दाचे माधव हे अपभ्रंश झालेले रूप आहे )


 गाणपत्य संप्रदायामध्ये भक्तीच्या द्वारे मोक्षाला पोहोचलेला पहिला मराठी संत म्हणून मोरया गोसावी या संताचा उल्लेख करावा लागतो ते चिंचवड पुणे मधले असल्याने साहजिकच पुण्यामध्ये गणपतीचा सर्वाधिक जयजयकार चालतो आपण गणपती बाप्पा मोरया म्हणतो त्याचे खरे कारण हे आहे की गणपती बाप्पाला पुजत जो शून्यापर्यंत पोहोचला त्या संताचे नाव मोरया होते म्हणून आपण त्या दोघांचे नाव एकत्र घेतो यानेच मराठीतील अष्टविनायक संप्रदायाची स्थापना केली आणि हे अष्टविनायक केंद्रस्थानी आणले हा बाराव्या शतकामध्ये होता एवढेच आता आपल्याला माहिती आहे अर्थातच त्याचे ब्राह्मणीकरण होऊन हल्ली सर्वच गोष्टी बदललेल्या दिसतात 


अष्टविनायक ही एक विशिष्ट पद्धतीची तांत्रिक रचना आहे सात चक्रांशी तिचा संबंध आहे आणि आठवा अर्थातच तिसरा डोळा जो उघडतो तो आहे अष्टविनायकाची पूजा करणारे लोक आता या भक्ति साधने पासून इतके तुटलेले आहेत की त्यांना आपण अष्टविनायकाची भक्ती कशी करावी हे सुद्धा माहित नाही दंतकथांच्या प्रदेशांमध्ये मूळचा उद्देश हरवलेला आहे महाराष्ट्रातले सुरुवातीचे पेशवे हे या संप्रदायातले होते आणि त्यामुळेच गणपती हे त्यांचे कुलदैवत होते गाणपत्य संप्रदायामध्ये वर्ण आणि जात मानली जात नाही हे आपण लक्षात घेतले पाहिजे त्यामुळेच बाजीराव पेशव्याचा एक सेनापती ज्यांना आज पूर्वाश्रमीचे महार म्हटले जाते त्यांच्यातून आलेला होता आणि बाजीराव त्याच्याबरोबर बसून जेवण घेत होता किंबहुना वर्ण आणि जात व्यवस्थेला या संप्रदायाने प्रचंड विरोध केलेला आहे त्यामुळेच गणपतीचे कुठलेही मंदिर हे वर्ण आणि जातीच्या आणि धर्माच्या नावाखाली बंद ठेवता येत नाही त्याचे दर्शन सर्वांना खुलेच असले पाहिजे किंबहुना मोरया गोसावी या संताचे जे कार्य होते ते यासंदर्भात अतिशय महत्त्वाचे होते सर्व अष्टविनायकांची मंदिरे सर्वांनाच खुली असली पाहिजे आणि श्रीमंताला सुद्धा रांगेनेच दर्शन घ्यावे लागेल हा त्यांचा उपदेश होता तो सध्या बाजूला केला जात आहे म्हणून हे सांगावे लागत आहे 


गणपती बाप्पा मोरया ही केवळ घोषणा नाही तो साधनेचा मंत्र आहे हे आता लक्षातच राहिलेले नाही त्याचा मूळ अर्थ तूच माझा बाप आहेस आणि तुझ्या खेरीज कोणी नाही तुझ्यात मला विलीन करून घे असा आहे हा संप्रदाय अर्थातच गोसावी संप्रदायाचा एक भाग आहे महाराष्ट्रामध्ये मुळातच गाणपत्य झालेल्या पंडितांना गोसावी म्हटले जात होते बाळ सिताराम मर्ढेकर यांचे घराणे हे मूळचे गोसावी घराणे होते आणि त्यामुळेच मर्ढेकर आधुनिक कविता लिहू शकले कारण घरात प्रगती वाद अस्तित्वात होता आपल्याला अनेकदा ही कनेक्शन्स कळत नाहीत किंबहुना ती आपणाला कळून घ्यायची नसतात पण ती अनेकदा असतात असो हा संप्रदाय अवैदिक असल्याने त्याचा फारसा उल्लेख आपणाला दिसत नाही 


नाथ संप्रदायामधून हेरंब संप्रदाय जो आला तो हेरंबनाथ या नाथसंप्रदायी सिद्ध व्यक्तीने स्थापन केला होता तो नेपाळचा की महाराष्ट्राचा हा एक फार मोठा वाद आहे एकेकाळी महाराष्ट्रात याचा सुद्धा प्रभाव होता या हेरंबनाथाची साधना सुद्धा जैन साधनेने प्रभावित होती आणि त्यामुळे साहजिकच दिगंबर संप्रदायाचा त्याच्यावर प्रभाव होता त्याच्या या प्रभावाचा ठसा या संप्रदायावर सुद्धा उमटलेला दिसतो (जैन धर्म लोकांनी त्याला क्लेम कसे केले नाही हाच प्रश्न पडतो)

हेरंब तंत्र असे मानते की पाच प्रकारच्या मुद्रा अवगत केल्या की आपणाला मोक्ष मिळतो यातील सहावी मुद्रा ही साहजिकच त्यामुळे मोदमुद्रा आहे 

१ दंतमुद्रा : दात हे वाणीचे पहारेकरी असतात त्यामुळे सर्वात प्रथम जो वाणीवर नियंत्रण ठेवतो तो मग अनेक गोष्टींच्यावर नियंत्रण ठेवू शकतो म्हणून या संप्रदायांमध्ये साधनेची सुरुवात दंत साधने पासून होते यात सर्वात प्रथम वाणीवरचे नियंत्रण प्राप्त करणे हाच आरंभ असतो 


२ पाश मुद्रा : ही आपण पाशामध्ये बांधले गेलो आहोत आहोत याचे झालेले ज्ञान दर्शवते आता मी सर्व पाशांना हाताच्या मुठीत ठेवू शकतो असा त्याचा अर्थ आहे इथून पुढे कामवासनेवर , अन्न वासनेवर, जलवासनेवर आणि वायुवासनेवर नियंत्रण मिळवले जाते 


३अक्ष मुद्रा : ही सर्वसाधारणपणे अक्षमाला या स्वरूपात दाखवली जाते आणि तिचा अर्थ मला अर्थ काम मोक्ष हे तिन्ही अक्ष कळलेले आहेत आणि आता मी मोक्ष या महा अक्षाच्या दिशेने साधनाप्रवास करत आहे त्याची ती निदर्शक आहे इथे धारणा आणि ध्यान यांना महत्त्व दिले जाते

४ अंकुश मुद्रा:ही सर्व वासनांच्यावर इंद्रियांच्यावर आणि स्वतःच्या अहंकारावर नियंत्रण ठेवणारी मुद्रा म्हणून येते  

५ अभय मुद्रा : म्हणजे भयापासून आणि अहंकारापासून मुक्ती होय कारण सर्वात शेवटी मरणाचे भय येते अभय मुद्रा तुम्हाला या सर्व भयांच्या पासून मुक्त करते 

६ मोद मुद्रा : ही शेवटची मुद्रा आहे कारण मदाचा म्हणजे अहम- अंत झाल्यावर तुम्ही मोद होता म्हणजेच मोक्ष मिळाल्यानंतर तुम्ही मोद म्हणजेच आनंदाला उपलब्ध होता हा आनंद चिर स्थायी असतो (मोदक हा याच संप्रदायाने जन्माला घातला असे म्हटले जाते तो मुळात मोद म्हणजे आनंदाचा मुद्राकार आहे आणि म्हणूनच तो बनवताना विशिष्ट पद्धतीने बनवला जातो त्याचा आकार कंपल्सरी चक्राकार ठेवावा लागतो तुम्ही चौकोनी किंवा त्रिकोणी मोद बनवू शकत नाही आणि तो गोड असावा लागतो ) मोक्ष मिळाल्यानंतर माणसाचे आयुष्य गोड होऊन जाते 


दुर्दैवाची गोष्ट अशी की हा मूळचा अर्थ नष्ट झाला आणि त्या जागी काही भलत्याच गोष्टी आल्या मुख्य म्हणजे दहा हात आले आणि हळूहळू मुख्य दिशा नाहीशी झाली 


पाच दिवसाचा गणपती हा या हेरंब संप्रदायाने आणला या पाच दिवसांमध्ये या पाच साधना मुद्रांची साधना करायची असते आणि पाचव्या दिवशी जेव्हा तुमच्या अहंकाराचे विसर्जन होते तेव्हा तुम्हाला सहाव्या मुद्रेचा लाभ होतो म्हणजे मोक्ष मिळतो आणि मोक्ष मुद्रा प्राप्त होते असो हेरंबोपनिषद , विनायक तंत्र वगैरे ग्रंथांमध्ये नंतर यांची माहिती आलेली दिसते पण ती मूळ साधनेपासून तुटलेलीच आहे


साधारणपणे दहाव्या शतकानंतर गणपती हाच ब्रह्म आहे ही संकल्पना अधिकाधिक दृढ होत अनेकांनी गणपतीला आदिदेवतेचा मान द्यायला सुरुवात केली  


मूळचा गणपती उत्सव का आला वगैरे वगैरे वर मी एक स्वतंत्र लेख मागच्या कुठल्यातरी गणेशोत्सवाला टाकला होता त्यामुळे त्यात जात नाही आता थोड्या वेगळ्या अंगाने आणखी काही माहिती द्यावी म्हणून हा लेखन प्रपंच केला 


या गणपती उत्सवात निदान काही अंशी तरी तुम्ही गणपतीच्या खऱ्या साधनेकडे वळावे अशी अपेक्षा करून हा लेख संपवतो 

जय गणेश हर हर महादेव 


श्रीधर तिळवे नाईक

Thursday, August 6, 2026

 गोंड परंपरा आणि शैव धर्माची निर्मिती श्रीधर तिळवे नाईक 


भारतामधील आदिवासी परंपरा अजूनही सर्वात प्राचीन असलेल्या शैव-धर्माच्या अनेक आठवणी जपून आहेत प्रत्येक आदिवासी परंपरेची स्वतःची म्हणून कथा आहे ती समजून घेणे अत्यंत अवघड जाते याचे कारण असे अनेक शब्द आहेत जे आता आपणाला कळतच नाही अनेक शब्द असे आहेत उदाहरणार्थ मेंदू हे आदिवासी लोकांनी दिलेले आहेत परंतु आपणाला ते आदिवासी आहेत हे सुद्धा माहित नाही 


भारतातील गोंड परंपरा मात्र अत्यंत सशक्तपणे शैव-श्रुतीच्या घटना अजूनही सांगते आहे आदिवासी लोकांच्यात आजही राजा हा शंभू मानला जातो आणि ते शंकराला शंभूच म्हणतात पहिला शंभू कधी झाला याविषयी एक अंदाज वर्तवता येतो आणि तो साधारणपणे इसवी सन पूर्व 11000 च्या आसपास असावा याचे कारण असे की गोंड परंपरेमध्ये शैव धर्माची किंवा शंभू धर्माची स्थापना ही 49 व्या शंभूच्या (४९ वा संभु म दाऊ)कारकीर्दीमध्ये झालेली आहे त्या आधीचे 48 शंभू हे नेमके कोण होते याचाही एक अंदाज या परंपरेमध्ये आहे मात्र निश्चित वर्णनांचा अभाव आहे एक गोष्ट नक्की आहे ती म्हणजे शंभू किंवा शंभू ही एक शतकण शतके चाललेली परंपरा होती आणि साधारणपणे इसवी सन पूर्व आठ हजार ला शैव श्रुतीला गोंड समाजामध्ये धर्माचे स्वरूप देण्यात आले ह्या शंभूचे कार्यालय पंचमढी होते हे निर्विवादपणे मानले जाते रुपो लंग पहांदी पारी कुपार लिंगो यानेच कोया पुनेम म्हणजे म्हणजे सत्याकडे नेणारा मार्ग स्थापन केला इतकेच नव्हे तर त्याने 33 शिष्य तयार केले काही ठिकाणी हे 33 शिष्य अनाथ होते असेही मानले जाते प्रत्यक्षामध्ये मला स्वतःला ही शक्यता वाटत नाही याचे कारण आदिवासी लोकांच्या मध्ये सहसा कोणी अनाथ असत नाही मात्र काही गोंड परंपरेमध्ये ते अनाथ होते असे सांगितले जाते शंभू ने या 33 लोकांना 33 नगर बांधून दिले आणि त्यांना या 33 नगरांचे अधिपती बनवले आणि यामध्ये लिंगोचा प्रचंड वाटा होता किंबहुना मार्गदर्शकाचे काम त्याने केलेले आहे किंबहुना लिंगो या शब्दाचा अर्थ लिंगाविषयी मार्गदर्शन करणारा असा होतो भारतातले सर्व आदिम नगरे ही या 49 व्या संभूने बसवलेली होती आद्य नगर ज्याला आज आपण काशी म्हणतो ते पहिल्या शंकराने वसवले होते त्याच्याच ढाच्याच्या आधारावर ही 33 नगरे वसवली गेली होती त्या काळामध्ये मेटलचा म्हणजे धातूचा शोध लागलेला नव्हता त्यामुळे लाकूड आणि दगड हाच आधार होता हे आपण लक्षात घेतले पाहिजे त्यामुळेच दगडावर दगड ठेवत बांधकाम करण्याची विशिष्ट कला भारतामध्ये आदिवासी लोकांनी विकसित केली होती जी 1850 पर्यंत वडारी लोकांनी शाबूत ठेवली होती हे आपण लक्षात घेतले पाहिजे आणि शंकराची अनेक मंदिरे ही अशी दगडावर दगड ठेवत विकसित केली गेलेली आहेत किंवा मग मोठ्याच्या मोठा दगड हा कोरून काढून त्याचे मंदिर बनवलेले आहे उदाहरणार्थ कैलास मंदिर ही शैव आदिवासी परंपरा आहे या नगरांच्या मध्ये सगेसोयरे यांनी बनलेले सग वसवले गेले आजही "सगेसोयरे" हा शब्द मराठीत प्रचलित आहे आणि त्याचबरोबर सगळे असाही शब्द आहे त्यांची उत्पत्ती आदिवासी परंपरेत आहे माझ्या कवितेमध्ये मी अनेकदा सगळे हा शब्द वेगवेगळ्या पद्धतीने वापरतो त्याला कारण ही आदिवासी परंपरा आहे जे करायचे ते सगळ्यांसाठी जे करायचे ते सगळ्यांनी अशी ही परंपरा आहे शंकराने निर्माण केलेले गण नंतर कसे स्वायत्त होत गेले त्याचे सर्वोत्कृष्ट उदाहरण म्हणजे गोंड गण होय हा सर्वात मोठा गण होता आणि बहुदा पहिला शंकर हा याच गणातून आलेला असावा शंकराच्या आयुष्यासंदर्भामध्ये जेवढे तपशील या गणामध्ये आपणाला दिसतात तेवढे ते दुसऱ्या समाजांच्या मध्ये दिसत नाहीत महाराष्ट्रातल्या पैशाची गणामध्ये असे तपशील मिळतात कारण याच भाषेमध्ये बृहद कथा सरित्सा सागर निर्माण झाले महाराष्ट्राची शैव परंपरा त्यामध्ये तपशीलवार नोंदवलेली आहे मात्र त्याआधीच्या सर्व गोष्टी या आदिवासी परंपरांच्या मध्येच दिसतात तिथे संभू हा शब्द जास्त येतो कारण तो राजाचा निर्देशक आहे आणि शंकर हा पहिला शंभू आहे मराठ्यांच्या भाषेमध्ये पहिला संभाजी आहे 


शंकराने प्रथम जंबुद्वीप पाच खंडात विभागला आणि उत्तर वायव्य हा भाग स्वतःकडे ठेवून पूर्व ईशान्य भाग पार्वतीला जो पूर्वेला होता एक भाग पश्चिमेला जो गणपती आणि परशुराम यांच्याकडे होता एक भाग दक्षिणेकडे ज्यात महाराष्ट्र सुद्धा येतो जो स्कंधाकडे मराठी भाषेत खंडोबा कडे सोपवला गेला आणि मध्यभाग ज्यात आत्ताचे बिहार सुद्धा येते हा नंदीकडे सोपवला गेला शंकराने उत्तर आणि वायव्य हे दोन्ही भाग आपल्याकडे ठेवले कैलास आणि थेट बांगला उपसागर पर्यंतचा भाग हा पार्वतीकडे आला आणि म्हणूनच तिथे आज सुद्धा दुर्गा उत्सव प्रचंड प्रमाणामध्ये साजरा केला जातो पश्चिम भाग गणपती कडे आला आणि म्हणूनच गणपती उत्सव येथे सर्वात जास्त साजरा होतो तर दक्षिण हा स्कंधाकडे गेल्याने तिथे अय्यप्पा वगैरे स्कंद रूपांचे उत्सव सर्वात जास्त मोठ्या प्रमाणात साजरे होतात मध्यभागामध्ये नंदीचे उत्सव एकेकाळी फार मोठ्या प्रमाणात होत अलीकडे खुद्द आदिवासी लोकांना त्याचा विसर पडलेला आहे मात्र बैल हे आदरणीय बनण्याचे सर्वात मोठे कारण ते नंदीचे कुलचिन्ह होते 


गोंडशैव धर्मामध्ये सुद्धा पंचखंड महत्त्वाचे झाले आणि तिथे सुद्धा पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर आणि मध्य असे पाच खंड आपणाला दिसतात खंड म्हणजे भूप्रदेश होय त्यातून येणाऱ्या उत्पन्नाला खंडणी म्हटले जाते आणि आजही हा शब्द प्रचलित आहे जो खंड वसूल करतो आणि नंतर व्यवस्थित वाटून देतो त्याला खंडोबा म्हणतात पान सुपारी हे शिवलिंगाचे प्रतीक आहे त्यातील सुपारीला सुद्धा खांड म्हटले जाते धार असलेल्या पात्याला सुद्धा त्यामुळेच खांडवी किंवा खांडोळी म्हटले जाते किंवा तुझ्या देहाची मी खांडोळी करेन म्हणजे तुकडे तुकडे करेन असे म्हटले जाते तेही यातूनच आलेले आहे महाराष्ट्रात आपण दसरा किंवा विजयादशमी साजरा करत नाही तर खंडे नवमी त्यामुळे साजरी करतो पान म्हणजे शक्ती लिंग आणि सुपारी म्हणजे शिवलिंग होय आणि म्हणूनच सर्व शैव लोकांच्या प्रत्येक विधीमध्ये किंवा संस्कारामध्ये किंवा प्रत्येक उत्सवामध्ये पान सुपारी दिली जाते घेतली जाते एकदा पान सुपारी दिली की तुम्ही ते वचन पाळायलाच हवे अशी सक्ती आहे कारण तुम्ही साक्षात शिवलिंगाची देवाण-घेवाण केलेली आहे आणि शिव आणि शक्ती यांना साक्षी ठेवलेले आहे असा त्याचा अर्थ असतो (अगदी अंडरवर्ल्डमधले लोक सुद्धा सुपारी घेतली की तोडता येत नाही असे म्हणतात त्याचे कारण यातच आहे)


गोंड परंपरेनुसार पंचखंड धरतीचा मध्यभाग पेंकमेढी कोर गण चिन्ह हरण (हरण निवडण्याचे कारण ते सूर्याचा अंश स्वतःत बाळगते ही या काळातली समजूत होय या काळामध्ये सूर्याला सर्वात मोठे व प्रभावी महालिंग मानले जात होते ) , पूर्व भाग सयमाल गुट्टाकोर गण चिन्ह वाघ (याचा थेट संबंध बेंगाल टायगर शी आहे), पश्चिम भाग येरगुट्टाकोर गण चिन्ह गेंडा( या काळात महाराष्ट्र आणि गुजरात मध्ये अपवादात्मक वेळेला सिंध आणि राजस्थानमध्ये गेंडे प्रचंड प्रमाणात होते ) , उत्तर भाग उम्मोगुट्टाकोर गण चिन्ह म्हैस उत्तर (ह्या काळामध्ये हिमालयाच्या पायथ्याशी असलेली उत्तर जितकी सुरक्षित आता वाटते तितकी नव्हती हे लक्षात घेतले पाहिजे मुख्य म्हणजे गंगा आणि यमुनेला येणारा पूर प्रचंड असायचा आणि या पुरामध्ये दलदलीमध्ये राहण्याची आणि टिकण्याची सर्वाधिक क्षमता ही म्हशींच्याकडे होती त्यातूनच पुढे महिषासुरमर्दिनी ही संकल्पना डेव्हलप झालेली आहे) आणि दक्षिणी भाग अयफोगुट्टाकोर गण चिन्ह हत्ती( या काळामध्ये कर्नाटक आणि केरळ मध्ये असलेले हत्ती प्रचंड संख्येने होते हे सांगण्याची गरज सुद्धा नाही) असे होते काही परंपरानुसार प्रत्यक्षामध्ये गोंड लोकांनी या काळामध्ये संपूर्ण भारत जिंकला होता आणि या काळामध्ये त्यांचे मुख्य गण चिन्ह हत्ती म्हणजेच नाग होते नाग या शब्दाचा अर्थ नंतर बदलला असला तरी प्रत्यक्षात मूळचा अर्थ नाग म्हणजे हत्ती असा आहे म्हणूनच प्रत्येक गणाचा अधिपती म्हणजेच गणपती हत्तीवर बसतो सर्वच मंदिरांच्यावर विशेषतः शैव मंदिरांच्यावर आपणाला हत्ती अनेकदा कोरलेला दिसतो कारण तो गणाच्या एकीकरणाचे ,समृद्धीचे, शहाणपणाचे आणि बळाचे प्रतीक आहे गोंडवनातील लोकांचा हत्ती हाच या काळामध्ये गण चिन्ह बनत गेलेला दिसतो जिला आज आपण इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन म्हणतो तिचा बराचसा मध्यभाग हा गोंड संस्कृतीने व्यापला होता विदर्भ आणि मध्यप्रदेशात यासंदर्भात अधिक उत्खनन होणे आवश्यक आहे हत्ती म्हणजेच नाग म्हणूनच या संस्कृतीला नाग संस्कृती म्हणून सुद्धा नंतर ओळखले जाऊ लागले आणि या नाग संस्कृतीवर प्रचंड प्रभाव हा शैव धर्माचा होता पुढे नाग या शब्दाचा अर्थ कोब्रा असा झाला आणि शंकराच्या मूर्तीच्या गळ्यात नाग म्हणून कोबरा आला प्रत्यक्षामध्ये हा साप कुंडलिनीचे प्रतीक आहे म्हणून तो पाठीच्या कण्यात दाखवला गेला पाहिजे तो गळ्यात आला याचे कारण मूर्ती पूजेत अनेकदा मूर्तीला सोयीस्कर असे बदल मूर्तिकार करतात 


या गोंड परंपरेतच जेव्हा गोंडशैव धर्माची स्थापना झाली तेव्हा अनेक नियम विशेषत: सामाजिक नियम अस्तित्वात आले त्यातील एक नियम म्हणजे विवाह हा स्वतःच्या सगामध्ये न करता दुसऱ्या सगामध्येच करणे खरे तर याची सुरुवात सुद्धा शंकराने केली होती त्याने चक्क दुसऱ्या देवगणामधील पार्वतीला विवाह करून आणले होते देवगण हा या काळामध्ये हिमालयाच्या पायथ्याशी राहत होता इतकेच नव्हे तर स्वतःच्या सगांमधील माणसाची हत्या करायला पूर्णपणे मनाई करण्यात आली सगेसंबंधी हा शब्द मुळातच सगामधले संबंधित लोक या अर्थाने प्रचलित आहे 


या पाचही भागांचा कंट्रोल किंवा नियंत्रण हे मध्यभागाकडे होते साहजिकच तो सर्वाधिक महत्त्वाचा होता जर का गोंड संपूर्ण भारतभर पसरले होते असा जर का त्याचा अर्थ असेल तर आपणाला हा कंट्रोल किंवा नियंत्रण महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशाकडे असावे असे मानायला जागा आहे 


आद्य धर्म म्हणून आणखी एका धर्माचा उदय या काळामध्ये झालेला आहे 


या दोन आद्य धर्मांच्या फाउंडेशन स्टोननीच ज्याला आज धर्म म्हटले जाते त्याचा पाया घातला मात्र मूळ शंकरांच्या उपदेशामध्ये धर्म हा अक्ष नव्हता हे आपण आधीच पाहिले आहे किंबहुना शैव लोकांच्यात सुद्धा या काळात धर्माला धर्म असा शब्द नव्हता तर चांगले आचरण सुअचरण अशाच अर्थाने शब्द प्रचलित होते जसे गोंड गणामध्ये धर्माला कोया पूनेम हा शब्द आहे चांगले आचरण करणे हा त्याचा सैद्धांतिक पाया आहे एका अर्थाने भारतानेच आणि मुख्य म्हणजे शैव श्रुतीनीच सर्वात पहिला धर्म किंवा सर्वात पहिले धर्म दिलेले आहेत आणि त्यांच्या आधारानेच पुढचे अनेक धर्म आणि धम्म निर्माण झालेले आहेत 


भारताचा इतिहास हा आदिवासी लोकांना वगळून लिहिण्याची धार्मिक परंपरा आहे पण मला असे वाटते की तो काळ संपला आणि संपला नसेल तर आता शैव विचारवंतांनी व लोकांनी तो संपवावा 


श्रीधर तिळवे नाईक

Saturday, August 1, 2026

 आशुतोष दिवाण यांनी अलीकडे म्हणजे आजच एक टिपणी टाकली आहे त्या अंगाने हे लिखाण करत आहे तिचा संदर्भ कळावा म्हणून प्रथम त्यांची टिपणी टाकतो ते म्हणतात,"

तिळवे सर,

आपण नेहमी शैव-वैष्णव हा प्रश्न मांडत असता आणि आता शैवाची पिछेहाट होत आहे याबद्दल लॅमेंट करत असता.

आता भारतात देखील मुस्लिम धर्म आपली लोकसंख्या वाढवत नेऊन येथे आपले वर्चस्व वाढवत नेत आहे हे देखील आपल्या लिखाणातून दिसते.(याचा विचार किंवा काळजी करणे म्हणजे धर्मांध हिन्दुत्ववादी असणे नाही हे प्रथम XXXकरांनी समजून घेणे गरजेचे आहे!)

या लॅमेंट मागे,

शैव संप्रदाय हे काम वैष्णव संप्रदायापेक्षा जास्त सामर्थ्याने करेल असे आपणास वाटते का?तसा काही ऐतिहासिक दाखला आहे का?का असे काही नसून शैव संप्रदाय जास्त न्याय्य नैसर्गिक आहे किंवा तुमचा तिकडे नैसर्गिक कल आहे?असे काही आहे.

योग्य वाटले तर ऊत्तर द्या.कदाचित आपल्या प्रदीर्घ लिखाणात हे असेल पण माझ्या वाचनात आले नाही.

धन्यवाद."


प्रथम आपले आभार! मुळात माझे मांडणी ही शैव विरुद्ध वैष्णव अशी नाही तर ती या देशातल्या आर्य लोकांच्या आधीच्या लोकांच्या असलेल्या श्रुती जी प्रथम शैव श्रुती होती नंतर जिला ब्राह्मण लोकांनी तंत्रश्रुती म्हणायला सुरुवात केली विरुद्ध या देशात आलेल्या युरेशियन लोकांची श्रुती म्हणजेच तंत्र अथवा शैव श्रुती विरुद्ध युरेशियन श्रुती जिला नंतर ब्राह्मण धर्माने वैदिक श्रुती म्हणायला सुरुवात केली अशा द्वंद्वातून केली गेलेली मांडणी आहे या मांडणीला एक जागतिक संदर्भ सुद्धा आहे वैष्णव धर्म हा युरेशियन श्रुती मधला वैदिक धर्म ब्राह्मण धर्म यांच्या नंतर जन्मलेला तिसरा धर्म आहे जो वर्ण आणि जातीव्यवस्था स्वीकारतो स्मृति ग्रंथांचे प्रामाण्य स्वीकारतो 


यातील वैदिक धर्माशी माझे फारसे भांडण नाहीये कारण वैदिक धर्म हा जेव्हा आला तेव्हा तो श्रद्धा या स्वरूपात होता आणि ही ऋग्वेदिक श्रद्धा जन्मदत्त वर्णव्यवस्था मानत नव्हती पुढे मग कालांतराने पुरुष सूक्त ब्राह्मण लोकांनी घुसवले आणि वर्ण जाती व्यवस्था ऑथेंटिक बनवली पण जगभरात मुळात हे मान्य आहे की हे सुक्त नंतर घुसवलेले आहे 


भारतामध्ये गेली हजार वर्षे वैष्णव धर्म प्रचंड डॉमिनेट करतो आहे आणि हे डॉमिनेशन इतके आहे की हिंदू धर्माचा धर्मग्रंथ म्हणून हे लोक वैष्णव असलेली भगवतगीता मान्य करतात आणि तिला इतर सर्व हिंदूंनी म्हणजे सर्व शैव लोकांनी सुद्धा स्वीकारावी असा आग्रह करतात आता जर का गीता हा वैष्णव धर्मग्रंथ असेल तर हिंदूधर्म हा हिंदू धर्म कसा आणि ह्या हिंदू धर्माचे शैव लोक कसे काय भाग होऊ शकतात कारण तुम्ही तर धर्मग्रंथ म्हणून तुमचा वैष्णव धर्मग्रंथ लादत आहात तो शैव लोकांनी का स्वीकारावा ? या संदर्भात तुम्ही कसलेही स्पष्टीकरण देत नाही आणि कोर्टात जर ही गोष्ट प्रमाणित असेल तर मग सार्वजनिक जीवनात ती किती मोठ्या प्रमाणामध्ये आणली जात असेल आणि राबवली जात असेल ते स्पष्ट आहे एकीकडे शैव धर्म हा शैव पंथ आहे अशी मांडणी करायची आणि तो हिंदूंचा पंथ आहे अशी मांडणी करायची आणि प्रत्यक्ष मात्र धर्मग्रंथ म्हणून वैष्णवग्रंथ लादायचा यातला विरोधाभा स्पष्ट आहे मुळात या मांडणी मधूनच स्पष्ट व्हावे की हिंदू हा सुद्धा धर्म म्हणून युरेशियन एक्सटेन्शन आहे आणि म्हणून मग मांडणी शैव विरुद्ध वैष्णव अशी करावी लागते 


माझी स्वतःची हिंदू धर्माची व्याख्या ही सर्व भारतीय धर्म असे आहे ज्यामध्ये जैन आणि बौद्ध सुद्धा येतात किंबहुना हिंदू हा धर्म नसून ती संस्कृती आहे असे मी मानतो आणि माझ्या मते अनेक हिंदुत्ववादी ही गोष्ट स्वीकारतात अलीकडे भागवत यांनी सुद्धा ही मांडणी केली होती पण ती त्यांना स्वतःलाच टिकवता आली नाही याचे कारण ब्राह्मण धर्माचे पुन्हा एकदा हिंदुत्ववादामध्ये वाढत चाललेले वर्चस्व आहे याचा एक परिणाम असा होतो की जागतिक पातळीवर इस्लाम हा सर्वात मोठा धोका आहे तो आपले वर्चस्व वाढवत नेऊन शेवटी संपूर्ण जगच इस्लाममय करेल असे तर्कदृष्ट्या दिसते कारण लोकसंख्या त्या पद्धतीने वाढत आहे आणि त्याचबरोबर स्वतःच्या कुराण या धर्मसंहिते वरचा जबरदस्त विश्वासही! 


प्रश्न असा आहे की मग एकीकडे वर्ण आणि जात यांच्याशी लढायचे असेल तर वैष्णव धर्माशी लढावे लागते कारण तो धर्म वर्ण आणि जात या दोन्हींचे समर्थन करतो आणि तुम्ही जर का अलीकडची त्या धर्माच्या आचार्यांची अवतरणे ऐकलीत विधाने ऐकलीत की हे लोक पुन्हा एकदा वर्ण आणि जाती व्यवस्था आणायला निघालेले आहेत ते स्पष्ट होते आणि हे होणार नाही याची कसलीही खात्री नाही यातून मग होते असे की वैष्णव लोक हे इस्लामला मदत करतात हा आतापर्यंतचा इतिहास आहे इस्लाम विरोधातल्या सर्व लढाया ह्या प्रामुख्याने शैवधर्मी लोकांनी लढलेल्या लढाया आहेत म्हणजे औरंगजेबविरुद्ध जी लढाई आहे ती संभाजी महाराजांची आहे आणि ते शैव आहेत त्या उलट औरंगजेबाने युद्ध जिंकावे म्हणून ब्राह्मणांनी यज्ञ केलेले आहेत ही वस्तुस्थिती आहे याचे कारण काय याची खोल मी मांसा केली तर आपणाला स्पष्टपणे दिसते की ब्राह्मण हा वर्ण हा स्पष्टपणे भगत आहे आणि भगत हे नेहमीच व्यावसायिक असतात त्यांना फक्त आपला फायदा दिसत असतो आणि नेमकी हीच गोष्ट ब्राह्मण लोकांच्या बाबत झालेली आहे ते नेहमीच फक्त स्वतःचा फायदा बघतात आणि यामुळे अनेकदा त्यांचा सत्यानाश झालेला दिसतो प्रश्न असा आहे की सर्वच ब्राह्मण खरोखर ब्राह्मण आहेत का तर माझी यासंदर्भातली मांडणी अशी की जे आत्ताचे ब्राह्मण आहेत त्यापैकी जवळजवळ 70 ते 80 टक्के लोक हे मूळचे पंडित आहेत ते शैव आहेत आणि ते जाती वर्णव्यवस्था मानत नव्हते म्हणूनच मी नेहमी पुरोगामी ब्राम्हणांना सांगतो की तुम्ही आता स्वतःला पंडित म्हणवुन घ्या त्याशिवाय वर्ण जाती व्यवस्थेची येऊ घातलेली सिस्टीम अडवता येणे शक्य नाही जर का ब्राह्मण ह्या सिस्टिमला सामील झाले तर मग या देशांमध्ये पुन्हा एकदा अनर्थ माजणार आहे मी जर चुकलो नाही तर इस्लामला ही गोष्ट मदत करणारी ठरेल ओवीसी सारख्या लोकांच्या हे लक्षात आलेले आहे त्यामुळेच जसा भाजपचा वैष्णव चेहरा उदयाला यायला लागला तसे तसे ओवेसी भाजपचे गुणगान करायला लागले ही युतीची सुरुवात आहे ब्राह्मण वर्ण मग तो ब्राह्मणधर्मी असो किंवा वैष्णव धर्मी असो किंवा अलीकडच्या काळात हिंदू धर्मीय असो हा कळत नकळत स्वतःला उच्च ठेवण्यातच सार्थक मानतो यातून त्याची मुक्तता करण्याचा एकच मार्ग मला दिसतो तो म्हणजे ब्राह्मणांनी पंडित होणे आणि त्यांनी पंडित व्हायचे असेल तर त्यांना शैव धर्म स्वीकारणे खेरीज पर्याय नाही तो त्यांचा मूळचा धर्म असल्यामुळे त्यांना ते सहज शक्य आहे आणि एकदा का पंडित वाढले आणि ब्राह्मण कमी झाले तर मग इस्लामच्या खतऱ्यापासून आणि ब्राह्मण धर्माच्या वर्ण जाती व्यवस्थेपासून भारताला वाचवता येऊ शकते कारण शेवटी ज्ञानी लोक काय म्हणतात हे फार महत्त्वाचे असते दुर्दैवाने अलीकडे भाजप अशा ज्ञानी लोकांना प्रमोट करतो आहे जे वर्ण जाती व्यवस्थेचे समर्थक किंवा छुपे समर्थक आहेत किंवा मग जे भाजपचे मिंधे आहेत 


काँग्रेसशी माझे भांडण चालू आहे ते काँग्रेसच्या इस्लाम बाबतच्या धोरणावरून ! काँग्रेस इस्लाम बाबतचे आपले धोरण बदलेल असे आता दिसत नाही या लोकांनी समान नागरी कायदा करायला हवा होता तो त्यांनी केला नाही किंबहुना नेहरूंच्या नावाने जिथे बोंबा मारणे आवश्यक आहे त्यातल्या ज्या जागा आहेत त्यातली ही एक जागा आहे पण त्या बाबतीत भाजप लोक कधी बोलत नाहीत कारण मग हिंदुत्ववादी लोकांनी त्याचे स्वतंत्र हिंदू कोड बिल कसे मागितले हे पुढे येईल आणि त्यांना ते येऊ द्यायचे नाही संस्कृत या भाषेला या लोकांनी कसा विरोध केला ते पुढे येईल तेही त्यांना होऊ द्यायचे नाही संस्कृत वरचा आपला अधिकार सोडायचा नाही म्हणूनच अलीकडे हिंदी आणण्याचा डाव खेळला गेला 


समतेबाबत शैव धर्म हा अधिक समतावादी आहे म्हणून माझा त्याच्याकडे कल आहे आपल्याकडे अनेकदा बौद्ध धर्म हा समतावादी मानला जातो परंतु प्रत्यक्षात बौद्ध धर्मामध्ये गुलामगिरीचे समर्थन असते शैवधर्म हा असा एकमेव धर्म आहे की जो गुलामगिरी मानत नाही त्यामुळे साहजिकच माझा तिकडे कल आहे बसवेश्वर शिवाजी महाराज संभाजी महाराज पहिले बाजीराव होळकर व महात्मा फुले यांनी त्याची पुरोगामी पार्श्वभूमी ही अतिशय व्यवस्थितपणे सांभाळलेली आहे म्हणून ऐतिहासिक पातळीवर सुद्धा तो जास्त वैष्णवांच्या पेक्षा प्रभावी आहे विशेषतः पुढे पुढे जाण्यात ! त्यामुळेच इस्लामविरुद्धची लढाई आज ना उद्या शैव लोकांनाच लढावी लागेल असे माझे स्पष्ट मत आहे बौद्ध लोक याबाबतीत मुस्लिमांना मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही अशी चिन्हे दिसत आहेत त्यामुळे तुम्ही म्हणता तसा तो नैसर्गिक कल नसून सांस्कृतिक कल आहे असे म्हणता येईल शिवाय जे मुस्लिम लोक समान नागरी कायदा स्वीकारायला तयार आहेत त्यांच्यासाठी सुद्धा शिवाजी महाराज , संभाजी महाराज आणि महात्मा फुले यांनी व्यवस्थित पुरोगामी जागा शैव-धर्मामध्ये तयार केलेली आहे त्यामुळे मुस्लिम लोकांच्या सामावून जाण्याच्या शक्यता घेण्याच्या शक्यता शैव धर्मात जास्त मोठ्या प्रमाणात आहेत आणि मुख्य म्हणजे त्या आधुनिकतेच्या दिशेने नेण्यात जास्त शक्तिशाली आहेत आला तर तुमच्या बरोबर नाही आलात तर तुमच्या विना आणि आमच्याविरुद्ध लढला तर हर हर महादेव सरळ युद्ध अशा तिन्ही शक्यता फक्त शैव-धर्मामध्येच दिसतात 


आता प्रश्न असा की अंतिमतः हिंदुत्ववादी लोक कुठे जाणार ? तर आत्तापर्यंतचा इतिहास पाहिला तर हे इस्लाम बरोबर युती करणार आणि बाराव्या शतकापासून ब्राह्मण आणि मुस्लिम यांची युती आली आणि जिने भक्तीचा गौरव केला वाढवला आणि अंधश्रद्धा वाढवल्या ज्ञानाच्या विरोधात चळवळी उभा केल्या अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य नाकारले तशीच युती पुन्हा 21व्या शतकात होणे अटळ आहे या युतीत ब्राह्मण धर्माचे नुकसान झाले आणि इस्लामचे नुकसान झाले पुन्हा ही युती झाली तर या दोघांचे नुकसान होऊन शेवटी शैव लोकांना त्यांच्या विरोधात उभे राहावे लागेल


इतिहासाची साक्ष काढली तरी पुन्हा पुन्हा दिसते की शैव जेव्हा एकत्र येतात मग ते शिख म्हणून एकत्र येवोत किंवा मराठा म्हणून एकत्र येऊन किंवा जाट म्हणून एकत्र येऊन ते लढतात परंतु ते वैष्णव झाल्यानंतर मात्र चक्क दिल्लीची चाकरी करायला लागतात वैष्णव झाल्यानंतर आणि जय कृष्ण म्हणायला लागल्यानंतर सगळे राजपूत कसे मुगल राजवटीची सेवा करायला लागले ते स्पष्ट दिसते 


सर्वात वाईट गोष्ट जर काय असेल तर ती म्हणजे शैवधर्माला वर्ण जाती व्यवस्थेचा स्वीकार करायला लावणे अजूनही शैवधर्मी लोक हा अजेंडा स्वीकारायला तयार नाहीत पण एकदा का त्यांनी तो स्वीकारला तर मात्र भारतामध्ये इस्लामिक राजवटी सारखी राजवट आल्याशिवाय राहणार नाही त्यामुळेच मग शंकराला अत्यंत जाणीवपूर्वक रुद्र म्हणणे शंकराचे रुद्रीकरण करणे आणि अनेकदा त्यानेच वेद निर्माण केले किंवा वेदांना मान्यता दिली असे दाखवणे त्याच्या नावाने वर्ण जातीच्या अंगाने काही कथा लिहिणे जेणेकरून जणू काय शंकरांना वर्ण जाती व्यवस्था मान्यच होती असे चित्रण व्हावे अशा अनेक गोष्टी अत्यंत पद्धतशीरपणे सध्या केल्या जात आहेत यामध्ये हिंदुत्ववादाचे किती नुकसान होणार आहे याची कल्पना सुद्धा अनेकांना नाही हिंदुत्ववादाने सावध होणे अत्यंत आवश्यक आहे अन्यथा हिंदुत्ववादाच्या नावाने ब्राह्मणवाद येणे अटळ हा देश राष्ट्रीय आणि राज्यीय आत्महत्या करू शकतो त्याने ती इतिहासात अनेकदा केलेली आहे म्हणूनच सावधान करण्यासाठी म्हणून ही मांडणी सतत चाललेली आहे मी हिंदू हा शब्द भारतात जन्मलेले सर्व धर्म या अर्थानेच वापरत असतो आणि त्या लोकांचे भले करणे हे हिंदुत्ववादाचे आद्य कर्तव्य आहे असे मानतो आणि जर का हिंदुत्ववादी हे लोक करणार नसतील आणि ते फक्त ब्राह्मणवादाच्या नावाखाली वर्ण जाती व्यवस्था आणि वर्ण वर्चस्व सांस्कृतिक ताटात वाढणार असतील तर ते ताट स्वीकारण्याची माझी तयारी नाही


आता राहिला प्रश्न तो अर्थव्यवस्थेचा ! मला स्वतःला उजवे धोरण काय करते ते पहायचे होते मी स्वतः बसवेश्वरांच्या कल्याणवादी धोरणाला मानतो मी स्वतः याला मध्यकल्याणवाद म्हणतो या उजव्या धोरणाने मध्यकल्याणवादाला किती मदत केली याचे मूल्यमापन आता करणे आवश्यक झालेले आहे जर का हिंदुत्ववादाच्या नावाखाली लोकांचे कल्याण होणार नसेल तर मग हिंदुत्ववाद आला काय आणि न आला काय ? हिंदुत्ववाद हा फक्त अडाणी आणि अंबानी यांचे भले करण्यासाठी जन्मलेला नाही तो सर्व लोकांचे कल्याण करण्यासाठी झटला पाहिजे जर तो तसा झटत नसेल तर मग त्याला आर्थिक पातळीवर सुद्धा मी विरोध करेन या संदर्भात मोदींची या टर्मची राजवट संपली की मग मी सावकाश लिहिन कारण उजव्या धोरणाला सुद्धा पंधरा वर्षे दिली गेली पाहिजे असे माझे मत होते आता म्हणाल तर मी फार अतिरेकी उजव्या धोरणाच्या बाजूने नाही सरकारचे काम लोकांचे कल्याण करणे असे असते ते जर का होत नसेल तर मात्र मोदींनी आपल्या सर्व धोरणांचा आर्थिक धोरणांचा फेरविचार करायला हवा असे माझे स्पष्ट मत आहे मी हिंदुत्ववादी मंचावर जात नाही याचे सर्वात मोठे कारण हिंदुत्ववादावर टीका करण्याचा सुद्धा माझा अधिकार मी त्यामुळे अबाधित ठेवतो मोक्षकाने आणि सिद्धाने आपले स्वातंत्र्य जपलेच पाहिजे असे माझे स्पष्ट मत आहे 


श्रीधर तिळवे नाईक

Thursday, July 30, 2026

 कम्युनिस्ट शैवविरोधी का आहेत ? श्रीधर तिळवे नाईक 


भारतात सर्वात पुरोगामी म्हणून समाजवादी आणि कम्युनिस्ट लोक मिरवत असतात म्हणून आता ह्या लोकांच्या शैव समाजाविषयीच्या धारणा काय आहेत मुळात धारणा आहेत का हे तपासण्याची वेळ आली आहे 


मार्क्सच्या भारताविषयीच्या लेखनात शैव हा शब्द एकदाही आलेला नाही आपण हे समजू शकतो कारण मार्क्स युरोपियन लेखनातून भारत समजून घेत होता 


कम्म्युनिझमविषयी पहिला संबंध हा लेनिनमुळे आला आणि लेनिनच्या कार्याविषयी व क्रांतीविषयी आदर दाखवणारे दोन्ही नेते हे चक्क हिंदुत्ववादी होते लोकमान्य टिळक आणि बिपीनचंद्र पाल ह्यामागचे कारण उघड आहे जहालांना हिंसक क्रांतीचे वावडे न्हवते जे मवाळांना होते गदर पार्टीचे लाला हरदयाळ हेही जहालांशी जोडले गेले होते गमतीचा भाग म्हणजे खिलाफत चळवळीतील काही मुस्लिम सोविएत रशियाकडून ब्रिटिशविरोधी मदत मिळेल म्हणून रशियात गेले होते कारण लेनिनने भांडवलशाही साम्राज्यशाहीत रूपांतरित होते असे सिद्धांतन केले होते हे बघण्याजोगं आहे कि मुस्लिम राष्ट्रीय स्वातंत्र्यासाठी नाही तर खलिफ़त स्टेटच्या रक्षणासाठी रशियाला गेले आणि इकडे ब्रिटिश सरकारने कम्म्युनिझम हा मुस्लिमविरोधी असल्याचा फतवा काढून त्यांना कॉर्नर केले (त्यावेळीही फतवे असे राजकारणाचे भाग होते ) १९२० साली ऑल इंडिया ट्रेंड युनियन काँग्रेस स्थापन झाली मात्र ती कुठल्याच राजकीय पक्षाने स्थापन केली न्हवती गांधींचा राजकीय प्रभाव थांबवण्यासाठी १९२१ साली श्रीपाद अमृत डांगे ह्यांनी एक गांधी व्हर्सेस लेनिन नावाची पुस्तिका काढली ह्या पुस्तिकेचा एक दुष्परिणाम असा झाला कि भारतीय प्रोलिट्रीयत वर्गाचे गांधी हेच प्रतिनिधी आहेत हे शिक्कमोर्तब झाले आणि त्यांचा मार्ग योग्य नसल्याने लेनिनकडे वळा असे सांगण्यात आले कोण कुठला रशियात बसलेला लेनिन त्याला इथल्या भारतीयांनी आदर्श का मानावा ? पण परकीय नेत्यांच्याकडे तोंड करून बसण्याची कम्युनिस्टांची सवय ह्या पुस्तकांपासून सुरु झाली आणि कम्म्युनिझमचे विरोधक म्हणून हिंदुइझम व हिंदू हेही स्थिर झाले साहजिकच हिंदू धर्म हा कसा प्रोलिटरीयत वर्गाच्या हितसंबंधाच्या विरोधी आहे हे सिद्ध करण्याची जबाबदारी कम्युनिस्टांच्यावर आहे असा गैरसमज पसरला आणि कम्युनिस्ट हिंदूंना हाणत सुटले हा देश धर्म स्थापन करणारा देश आहे ही गोष्टच विसरली गेली सर्वात वाईट म्हणजे गांधींच्यात ट्रॅप झाल्याने ह्या देशातील प्रोलिटरीयट वर्गाचा धर्म हिंदू आहे अशी गैरसमजूत कम्म्युनिस्टांनी करून घेतली हा आंधळेपणा होता प्रत्यक्षात प्रोलिटरीएट वर्गाचा धर्म शैव होता आणि कम्युनिस्टांना हे अजूनही कळलेलं नाही 


१९२० ला सीपीआयची स्थापना ताश्कंदमध्ये झाली कारण ब्रिटिशांनी कम्युनिस्टांना भारतात घातलेली बंदी ! स्वामी विवेकानंद आणि अरबिंदो घोष ह्यांनी तयार केलेल्या पार्श्वभूमीमुळे बंगाल्यांनी (मानवेंद्रनाथ रॉय त्यांची पत्नी एल्विन रॉय अबानी मुखर्जी व त्यांची पत्नी ह्यांनी ) हा पक्ष स्थापन केला हे सर्व बंगाली शाक्त ब्राम्हण होते तरीही ह्यांना शाक्त दर्शनावर लिहावेसे वाटले नाही किंवा आपला धर्म काय आहे हे तपासवासा वाटला नाही 


सुरवातीपासूनच कम्युनिस्ट पार्टीच्या संस्थापन कार्यात मुस्लिमांचा वाटा महत्वाचा होता कारण त्यांना सुरवातीला खलिफत साठी कम्युनिझम सोयीचा वाटत होता आणि रशिया त्यासाठी मदत करेल अशी आशा होती 


२५ डिसेम्बर १९२५ ला झालेल्या साम्यवादी अधिवेशनात स्वतःला सत्यभक्त म्हणवणाऱ्याने कम्म्युनिझमच्या रशियाकरणाविरुद्ध आवाज उठवून कम्युनिझमचे भारतीयकरण होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले इतके कम्म्युनिस्ट ह्या काळात रशियन झाले होते अर्थात त्याला प्रतिसाद मिळाला नाही 


आता रशियात डुबक्या घेणाऱ्या कम्युनिस्टांना जिथे तत्कालीन आवाज करणाऱ्या हिंदू धर्माकडे नीट पाहायला फुरसद न्हवती तिथे ते आवाजच न उरलेल्या शैवांच्याकडे काय बघणार ?


कम्युनिस्टांचा नालायकपणा हाही नाही . नालायकपणा हा आहे कि भारतीय तत्वज्ञानाची चिकित्सा करताना सगळे कम्युनिस्ट फक्त आर्य दर्शनांचाच विचार करतात तुम्हाला अनार्य दर्शने दिसत नाहीत ? हा काय भुक्कडपणा आहे ? हिंदूवादी आणि हिंदुत्ववादी आर्यांच्या दर्शनाचा विचार करतात हे मी समजू शकतो कारण हे मुळात एलिट लोकांचे पक्ष आहेत पण तुम्ही श्रमिकांचे कैवारी म्हणवता आदिवासींचे कैवारी म्हणवता आणि तुम्हाला त्यांनी मांडलेली शैव दर्शने साध्या चिकित्सेसाठी घेता येत नाहीत ?कि श्रमिकांना विचार करता येत न्हवता हा भुक्कड पाश्चात्य विचाराने तुम्ही इतके आंधळे झाला कि तुम्हाला इथल्याच श्रमिकांची दर्शने दिसायची बंद झाली ?


आर्य संस्कृती आणि शैव संस्कृती ह्यांच्यातील वाद हा शोषक ऐदी संस्कृती आणि शोषित शूद्र ठरवल्य्या गेलेल्या संस्कृतीतील वाद आहे शूद्र दर्जा हा कायमस्वरूपी स्वस्त कामगार मिळावा म्हणून केलेली योजना असते म्हणूनच शैव सतत वैष्णवीझमबद्दल बोंबा मारत असतात श्रीकृष्ण हा नामधारी क्षत्रिय असतो आणि तो प्रत्यक्षात सैनिकांना फळांची अपेक्षा न करता लढाईत मर असा उपदेश करत असतो हातात शस्त्र न घेणाऱ्या ब्राम्हणांचा तो प्रतिनिधी असतो तो बिनदिक्कत वैश्य शूद्र ह्यांना पाप योनी म्हणत असतो म्हणून त्याच्याविरुद्ध उभे ठाकावे लागते 


आपला कामगार वर्ग नेमका कुठला धर्म पाळतो का पाळतो ह्याची चिकित्सासुद्धा तुम्हाला करावीशी वाटत नसेल तर त्याचा अर्थ तुम्ही स्वतःच्या आर्य संस्कृतीत डुबक्या घेत आहात असा होतो कामगारवर्ग फक्त गणपती आणि शिवजयंती ह्यांच्याच जयंतीला आणि महाशिवरात्र व कुंभमेळ्याला एव्हढ्या मोठ्या प्रमाणात का जमतो ह्याची काही चिकित्सा कराल कि नाही ?


असो कम्युनिझमशिवाय शैवांचे घोडे पूर्वीही कधी अडले न्हवते आम्ही काही श्रमसंस्कृती मार्क्सकडुन शिकलेलो नाही आमच्यात ती शिव आणि बस्वेश्वरांकडून आलेली आहे 


श्रीधर तिळवे नाईक

Sunday, July 26, 2026

 भगवान शंकरानीं तंत्र हा शब्द का वापरला श्रीधर तिळवे नाईक 


सर्वात प्रथम आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे जगात प्रथम आदिमयुग आले ते कसे होते याचा पुरेसा अंदाज आलेला नाही त्यानंतर मात्र साधारण पंचवीस हजार ते पंधरा हजार बीसी या कालखंडामध्ये काही ठिकाणी श्रद्धा उदयाला यायला लागल्या त्यातून श्रद्धेची म्हणून एक संस्कृती उदयाला आली विशेषता भारतात हे मोठ्या प्रमाणात घडले साहजिकच त्यातून हळूहळू जमातींच्या संस्कृती निर्माण व्हायला लागल्या ज्या टोळ्यांच्या पुरत्याच मर्यादित होत्या प्रत्येक टोळीची स्वतःची म्हणून एक श्रद्धा पद्धत होती आणि ती त्यानुसारच जगत असे भगवान शंकरांचा कालखंड हा इसवी सन पूर्व 10000 च्या आसपास आहे त्याने त्यांनी स्वतःचा शोध घ्यायला सुरुवात केली आणि त्यातून त्यांना जे गवसले त्याला त्यांनी डोळा अक्ष असे म्हटले आणि हळूहळू तिसरा डोळा म्हणायला सुरुवात केली. पुढे या तिसऱ्या अक्षाला महाक्षय आणि पुढे मोक्ष म्हणण्यात येऊ लागले मोक्षाची ही मांडणी आधीच्या श्रद्धा संस्कृती पेक्षा पूर्ण वेगळी होती. श्रद्धेच्या केंद्रस्थानी मंत्र असत आणि ज्याला हे मंत्र अवगत असत आणि या मंत्रांशी निगडित विधी अवगत असत त्याला मांत्रिक म्हणत ही संस्कृती मंत्र संस्कृती होती. मंत्राचे दोन अर्थ होते एक यातून भारी दुसरा शहाणपण जडीत हळूहळू मांत्रिकांचे वर्चस्व इतके वाढत गेले की शहाणपण जडीत मंत्रांचा काळ जवळ जवळ नाहीसा झाला अशावेळी भगवान शंकर आले त्यांनी यामांत्रिक संस्कृतीला आव्हान दिले चॅलेंज दिले या संस्कृतीचा पायाच मंत्राने रचल्यामुळे त्या विरोधात काही वेगळा शब्द देणे आवश्यक होते म्हणून त्यांनी तंत्र हा शब्द दिला अलीकडे या शब्दाला टेक्नॉलॉजी हा अर्थ प्राप्त झाला असला तरी पूर्वीच्या काळात असा अर्थ नव्हता पूर्वीच्या काळात त्याला टेकनिक या अर्थानेच वापरले जात होते श्रद्धेच्या केंद्रस्थानी असलेला मंत्र या मोक्ष संस्कृतीने हटवला आणि त्या जागी तंत्र केंद्रस्थानी आणले म्हणूनच पुढील काळात तांत्रिक श्रुती असाही शब्द वारंवार वापरलेला दिसतो काही शैवांनी त्या ऐवजी तंत्रधर्म असा शब्द वापरलेला आहे खरंतर तंत्र म्हणजे मोक्ष मिळवण्याची टेक्निक अशी ११४ टेक्निक्स भगवान शंकर यांनी सांगितली ती सर्व 

१ शरीर उपाय किंवा योग उपाय

२ ज्ञान उपाय

३ क्रिया उपाय ह्याला वैष्णवांनी पुढे कर्मयोग म्हटले

४ शाक्त उपाय

५ भावोपाय याला पुढे भक्ती म्हटले गेले


अशी पाच उपायात विभागली गेली. ज्यांना पंच उपाय पंचोपाय म्हटले गेले आज सुद्धा तंत्र हा शब्द प्रामुख्याने टेक्निक या अर्थानेच वापरला जातो तर यातूनच पुढे तंत्रज्ञान विकसित झालेले आहे जिला आज आपण टेक्नॉलॉजी असे म्हणतो शरीराला पुढे यंत्र असा शब्द रूढ झाला आणि प्रत्येक शरीराला उद्देशून तो वापरला गेला


वैदिक संस्कृती भारतात आली तेव्हा ती स्वतःचे मंत्र घेऊन आली मंत्र रचणाऱ्या लोकांना ऋषी म्हणण्यात आले पुढे नंतरच्या पिढ्यातील पुरोहितांनी हे मंत्र आपल्या ताब्यात घेऊन ते अपौरुषेय आहेत असे सांगून बळकावले ज्या ऋषींनी ते रचले त्यांना हटवण्याचाच हा प्रोग्राम होता या पुरोहितांना या मांत्रिकांना पुढे ब्राह्मण असा शब्द रुढ झाला आजही ब्राह्मण मंत्रच म्हणतात मात्र ते स्वतःला मांत्रिक म्हणवून घेत नाहीत कारण मांत्रिक हा शब्द मूळचा अनार्य शब्द आहे तंत्राच्या मार्गाने जाऊन मोक्ष साधना करणाऱ्या लोकांना तांत्रिक असे म्हटले जाऊ लागले. पुढे पुढे हा शब्द बदनाम करण्यात आला आणि आता तर तो निगेटिव्ह अर्थानेच रूळ झालेला आहे किंबहुना ही एक कोण कॉन्स्पिरसी आहे 


भारतामध्ये ज्या काही गोष्टींचा शोध लागला त्यातील एक कॉटन होती त्यामुळेच भगवान शंकराने सांगितलेली सर्व तंत्रे ही सूत सुत्त म्हणून जतन केली गेली ज्याचे संस्कृत मध्ये सूत्र झाले पाली अर्ध मागधित सुत्त झाले पुढें सूक्त झाले 


ही सर्व तंत्रे मौखिक परंपरेद्वारे जतन केली गेली आहेत याबाबतीत वैदिक काय किंवा शैव काय दोघेही सारखेच आहेत शैवांच्यात प्रामुख्याने गुरु ज्यांचे नंतर गुरव झाले आचार्य आणि पंडित यांनी शतकानूशतके ही सूत्रे सांभाळलेली दिसतात पुढे गुरव लोकांनी ज्ञानोपासना सोडली आणि ते कर्मकांडात अडकून गेले पंडित आणि आचार्य हे हळूहळू इसवी सन १२०० नंतर वैदिक परंपरेत दाखल होऊ लागले त्यातूनच तंत्र श्रुतीचा क्षय होऊ लागला मात्र लोकसंस्कृतीत मात्र ती कायमच टिकून राहिली आणि आजही ती टिकून आहे मंत्राला आव्हान देणारी ही तंत्रसंस्कृती आता स्वतःच सूत्रांना मंत्र मानते जगाच्या इतिहासात हे नेहमीच घडलेले आहे अनेकांना तर पैसा कसा कमावता येईल एवढेच पहायचे आहे बहुजन समाजाशी काही बांधिलकी असायला हवी ही जाणीवच नष्ट झाली त्याच्या परिणामी शैवधर्म आहे शैव मंदिरे अस्तित्वात आहेत पण शेव श्रुती मात्र अस्तित्वात नाही असा काहीतरी विरोधाभास तयार झालेला आहे त्यातच शैव पंडितांनी वैदिकांच्या प्रमाणे अनेक भाकडकथा रचायला सुरुवात केली भाकड ग्रंथ रचायला सुरुवात केले आणि मूळ उपदेश बाजूला पडले आता वेळ आलेली आहे की आपण मूळ तंत्रे व्यवस्थितपणे मांडावीत गेली ४० वर्ष मी ते करतोच आहे 


श्रीधर तिळवे नाईक