Wednesday, August 19, 2026

ज्ञान आणि चौथी नवता एक क्रांतीकारक प्रश्न श्रीधर तिळवे नाईक 

ज्ञानाच्या क्षेत्रात चौथ्यान नवतेने निर्माण केलेला सर्वात मोठा प्रश्न जर कुठला असेल तर तो म्हणजे निरीक्षकाच्या निरीक्षणामुळे निरीक्षण बदलते काय आणि वास्तवही reality बदलते काय ? आत्तापर्यंत निरीक्षण चक्क वास्तवालाच बदलत असेल असे कोणालाच वाटले नव्हते पण आता निरीक्षक आणि निरीक्षण हे दोघेही वास्तवाला बदलतात काय असा फार मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे म्हणजे मी जेव्हा एखाद्या व्यक्तीला पाहतो तेव्हा त्या व्यक्तीमध्येच फरक पडलेला असतो आणि हा फरक माझ्यामुळे पडलेला असतो आणि कदाचित माझ्या निरीक्षणामुळे सुद्धा हा फरक पडलेला असतो. आता हे सर्व काही अद्वैतामुळे होते का हा त्याहून मोठा प्रश्न! कारण अद्वैत असल्याशिवाय हे शक्यच नाही. आत्तापर्यंतचा ज्ञानाच्या क्षेत्रातील सर्व सर्व खटाटोप हा पुरोगामी कालखंडामध्ये पूर्ण द्वैतावर आधारित होता तिथे निरीक्षक आणि निरीक्षण दोन भिन्न गोष्टी होत्या त्यामुळे निरीक्षण हे ऑब्जेक्टिव्ह असणे शक्य होते परंतु क्वांटम युगामध्ये अचानक निरीक्षकाची पोझिशन महत्वाची झाली आणि त्यामुळे निरीक्षकाच्या पोझिशनमुळे माया (म्हणजे वास्तव) वेगळी वेगळी नजर येते वेगळे वेगळे नजर येते असे समीकरण रूढ झाले होते पण आता फक्त बदल निरीक्षणामध्ये राहिलेला नाही तर थेट निरीक्षणामुळे आणि निरीक्षकामुळे वास्तवातच बदल होतो का असा हा प्रश्न आहे आणि अनेकांना यातला ज्ञानाचा अजीबो गरीब खेळ कळत नाहीये. एका अर्थाने आपण ज्ञानाच्या अद्वैतामध्ये आलेलो आहोत म्हणजे मी आणि ज्ञान हे वेगळे नाही माझे ज्ञान हे सुद्धा ज्ञातापेक्षा वेगळे नाही म्हणजेच ज्ञाता, ज्ञेय आणि ज्ञान या तिन्ही गोष्टी वेगळ्या नाहीत आणि म्हणूनच या तिघांच्यामुळे तिघांच्यातही फरक पडू शकतो 


या सगळ्यामुळे विज्ञानाच्या आत्तापर्यंतच्या सर्व ज्ञानाला सुरुंग लागणे अटळ आहे कारण आत्तापर्यंत आपण जे गृहीत धरले होते की ज्याचे ज्ञान होते ते वास्तव बदलत नाही ते स्थिर असते किंवा ते बदलत असले तरी त्याच्यावर जो ज्ञाता ज्ञान यांचा सुद्धा परिणाम होतो तो आपण कधीही गृहीत धरलेला नव्हता आता या सगळ्या प्रकारांमधून नेटवर्क बद्दलच प्रचंड मोठी शंका निर्माण होते याचे कारण आत्तापर्यंत आपण नेटवर्क हे कायमच विशिष्ट अद्वैत आणि पूर्ण द्वैत यांच्या आधारे उभा करत होतो परंतु आता पुढच्या जर काय आर्टिबायलॉजिकल इंटेलिजन्स संदर्भात स्टेप्स म्हणजे पायऱ्या आपण जर का टाकायला गेलो तर त्या बायोलॉजिकल पायऱ्या अतिशय कठीण होत जाणार आहेत कारण तुम्ही जे बनवायला जाल ते तुमच्या नुसारच बदलणार आहे बनणार आहे . यातूनच आणखी काही प्रश्न निर्माण होतात ते म्हणजे अतिप्रत्यक्ष प्रमाण पुन्हा एकदा विचारात घ्यावे लागणार आहे का आणि त्याचा नेमका सिग्निफिकन्स काय असेल ? आत्तापर्यंत अति प्रत्यक्ष प्रमाणाची चर्चा फक्त मोक्षाच्या संदर्भात होत होती आणि आता ती विज्ञानाच्या कक्षेत आणावी लागेल अशी चिन्हे दिसायला लागलेली आहेत प्रश्न असा आहे की हे अतिप्रत्यक्ष प्रमाण नेटवर्कमध्ये कसे आणायचे ? दिसायला या सर्व गोष्टी आपणाला साध्या सरळ दिसतात पण त्या साध्या सरळ नाहीत . कारण एकदा का आपण ज्ञानाच्या संदर्भात अद्वैत स्वीकारले तर एक गोष्ट नक्की आहे ती म्हणजे दूरवरच्या ताऱ्याशी सुद्धा मी कनेक्टेड आहे याचाच अर्थ माझे नेटवर्क आखे ब्रम्हांड आणि शिवांड आहे हे काहीसे मोक्षाच्या जास्त जवळ जाणारे असले तरी प्रत्यक्ष आपलिकेशन मध्ये नेमके काय होणार हे सांगणे फार कठीण आहे ज्यांना मोक्ष मिळालाय त्यांना काही यात प्रॉब्लेम वाटणार नाही किंबहुना मला तो वाटलेला नाही पण ज्यांना तो मिळालेला नाही त्यांच्या संदर्भात नेमका याचा काय सिग्निफिकन्स होईल ते सांगता येणे फार कठीण आहे . याचा एक नैतिकतेच्या दृष्टीने चांगला परिणाम म्हणजे तुम्ही जर वाईट वागाल तर तुमचे वाईट वागणे समोरच्याच्या आयुष्यात फरक टाकेलच टाकेल परंतु तुमच्या स्वतःमध्ये सुद्धा त्याच्या केवळ निरीक्षणामुळे आणि त्याच्यामध्ये घडलेल्या क्रियांच्या मुळे काही वाईट दुष्परिणाम होणार म्हणजेच ज्याला आपण प्राचीनकाळी पापाचे फळ तुम्हाला स्वतःलाच मिळते असे जे म्हटले जात होते त्यामध्ये बरेचसे तथ्य आहे असे वाटण्याची किंवा असे सिद्ध होण्याची शक्यता नाकारता येत नाही . थोडक्यात कर्माचे फळ ज्ञानाला आणि जिचे ज्ञान होते आहे त्या वस्तूच्या वास्तवाला सुद्धा मिळते असे आता आध्यात्मिक भाषेत सांगता येते भारतामध्ये आपल्याकडे चर्चा अनेकदा मोक्षाच्या क्षेत्रातच प्रथम होते त्यामुळे मी ही चर्चा करत आहे याचा अर्थ मी सर्वज्ञ आहे असा कृपया घेऊ नका तसा मी नाहीये हे मला माहिती आहे पण या अंगाने एका नवीन विज्ञानाची शक्यता आता पुन्हा एकदा निर्माण होते आहे आणि हे चौथ्या नवतेचे विज्ञान असेल आणि ते आत्तापर्यंत चालत आलेल्या पोस्ट क्वांटम विज्ञानासारखे सुद्धा असणार नाही हे लक्षात घ्या . थोडक्यात चौथ्या नवतेचा ज्ञानाच्या संदर्भातला पोस्ट क्वांटम ट्रांजेक्शन ट्रान्झिशन काळ संपलेला आहे आणि आपण एका नव्या उत्तर जालीय कालखंडामध्ये प्रवेश करत आहोत .

श्रीधर तिळवे नाईक 



No comments:

Post a Comment