पार्वती आईसाठी एक कविता
महालिंग तर स्रीलिंग आहे पार्वती आई
मग पुरुषी शिवलिंग
आणि स्त्रैण शक्तीलिंग
आम्ही सर्वच महायोनीची लेकरे आहोत
जी तुला रिपीट करायला जन्मलो आहोत
शिव आणि तू
ह्यांचा समतोल
ईश्वर होतो
आणि तो ढळला
कि लोक ईश्वरावरून भांडतात
मी वीरशैव असूनही तुझ्या दारी येत नाही
तुझ्या करोडो महापद्म खिडक्यातली
एक खिडकी
माझ्यावर नजर ठेवणारी असेल
जाणतो
शेवटी तू महाआई आहेस
आम्ही क्षणांचे जगद्पती
ह्या उचापतीतून त्या उचापतीत प्रवास करणारे
कुठल्या स्टेशनावर उतरायचे
तेही माहित नसणारे
म्हणूनच तुझा नवरा
आम्ही स्टेशन म्हणून वापरतो
आणि तुझ्यात उतरतो
तुझा मायाळू मुका ही आमची मुक्ती आहे
कपाळावरचे शेवटचे विधिलिखित !
घे !
श्रीधर तिळवे -नाईक
No comments:
Post a Comment