थोडाही प्रतिसाद /श्रीधर तिळवे नाईक
थोडाही प्रतिसाद
आवाज शाबूत राखतो
अन्यथा कंठही
अनावश्यक वाटतो
आयुष्यभर हूल दे
पण थोडीशी चाहूल दे
निर्वाणाविना मरेन
तेव्हा इतका दिलासा हवा
जो आहे
त्याच्यासाठी आयुष्य वाया घालवले
श्रीधर तिळवे नाईक
(डेकॅथलॉन -अनकॅटेगरीकल /भक्ती ह्या काव्यफायलीतून )
No comments:
Post a Comment